Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

शिवछत्रसाल संवादातील महाराजांचा कृष्ण उपदेश...

 


" हे पराक्रमी राजन आपण आपल्या शत्रूंचा नाश करा आणि विजय संपादन कर. आपल्या देशावर अधिकार मिळवून तेथे आपले राज्य स्थापन करा. बादशहाच्या सैन्याची पर्वा करू नका. कपटी तुर्कांवर विश्वास ठेवू नका. त्यांचा नाश करा. ते तुझ्यावर आक्रमण करतील तर मी तुझे सहाय्य करीन. तुला स्वतंत्र ठेवण्याचे मी वचन देतो. मोगल ज्या-ज्या वेळी माझ्यावर चालून आले त्या त्या वेळी भवानी देवीने मला साहाय्य केले. देवी भवानीच्या कृपेमुळे मला मोगलांच्या प्रचंड शक्तीची मुळीच भीती वाटत नाही. त्यांनी माझ्यावर उमराव पाठविले, त्यांच्यावर मी माझी तलवार धरली आहे. त्याचप्रमाणे आपण त्यांचा संहार करावा. यासाठी आपण सत्वर आपल्या देशाला परत जा, सैन्य तयार करा. तुम्ही अंतकरणात भगवान श्रीकृष्ण साठवून ठेवा आणि घ्या तलवार हातात! तो सर्वांचा रक्षण करता आहे, हा निर्धार असू द्या! आणि मोगलांना बुंदेलखंडातून हाकलून लावा. सदैव आपल्या हातात नागवी तलवार बाळगून युद्धासाठी तयार राहा. परमेश्वर तुम्हाला जरूर यश मिळवून देईन. रणांगणात शौर्य गाजविणे हाच क्षत्रियांचा धर्म आहे. यात मृत्यू आला तर स्वर्ग प्राप्त होतो आणि जय मिळाल्यास राज्य आणि अमर कीर्ती यांचा लाभ होतो. यासाठी तुम्ही आपल्या देशाला जाऊन विजय संपादन करा.."

असे बोलून महाराजांनी छत्रसाल राजाला तलवार भेट दिली असे 'छत्रप्रकाश' या समकालीन ग्रंथात वर्णिले आहे.

शिवाजी महाराज आणि छत्रसाल यांची भेट म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. महाराजांनी मोगल सत्ते विरुद्ध जो लढा पुकारला होता त्याचे भारतव्यापी स्वरूप या घटनेने सिद्ध झाले. इतकेच नव्हे तर या घटनेचे परिणाम पुढे मराठ्यांच्या उत्तरेकडील राजकारणात त्यांना फार उपयोगी पडले. 

शिवाजी महाराजांकडून स्फूर्ती घेऊन छत्रसालने बुंदेलखंडात स्वतंत्र राज्याची स्थापना केली आणि पुढे मोहम्मद बंगश ने बुंदेलखंडावर स्वारी केली त्यावेळी छत्रसालाने जुने स्नेहसंबंधाची आठवणं करून मदतीसाठी बाजीराव पेशव्याकडे धाव घेतली. बाजीरावाच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले. या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावास नजर केला. एवढेच नाही तर सोयरसंबंधही केला. मराठी व बुंदेले यांच्या या सहकार्यातूनच मराठ्यांचा बुंदेल खंडात यमुना तीरापर्यंत जम बसला आणि दिल्लीची सत्ता त्यांच्या टप्प्यात आली.

असो, असा हा तेजस्वी इतिहास सर्वांना माहीत आहे. पण आज महाराज आणि छत्रसाल यांच्या भेटीची आठवण व्हावी ती श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या योगाने..


महाराज छत्रसाल राजाला उपदेश देताना म्हणतात की-"तुम्ही अंतकरणात भगवान श्रीकृष्ण साठवून ठेवा आणि घ्या तलवार हातात! तो सर्वांचा रक्षण करता आहे, हा निर्धार असू द्या! "

बुंदेलखंड आणि मथुरा वृंदावन यातील भौगोलिक जवळीकता असली तरीही येथे श्रीकृष्ण मनात ठेवून निर्धाराने कृती करा, अर्थात प्रबळ अशा मोगलांशी लढण्यासाठी कृष्ण नितीने तलवार चालवा. कृष्णनीती म्हणजे महाराजांच्या राजकारणातली आणि रणांगणातली गनिमी कावा नितीच नव्हे काय.?

श्री विष्णूंनी नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपू मारला तो गनिमीकाव्याने...

श्रीकृष्णाने कंस पछाडला, कालयवन परास्त केला,, जरासंध मारला ते आपल्या कृष्णनितीने.!

पांडवांनी कौरव सेना परास्त केली... ती सुद्धा श्रीकृष्ण नीतीच्या तत्त्वाने.!!

असे अनेक उदाहरणं प्रसंग शिवचरित्राशी जुळतात. म्हणून वाटतं महाराजांचा गनिमी कावा अर्थात कृष्णनीती होय.! कृष्ण नितीतून प्रेरणा घेऊन महाराजांनी गनिमी तंत्र वापरले.! 

छत्रपती महाराजांनी अफजल मारला, कारतलब खान खिंडीत कोंडला, शास्ताखान पळविला ते गनिमी काव्याच्या तंत्राने! तीच कृष्णनीती होय..!

कदाचित महाराजांना छत्रसाल राजा ला हाच उपदेश द्यावयाचा असेल की केवळ तलवारीच्या ताकदीने भागणार नाही तर अंतकरणात श्रीकृष्ण घेऊन चला... विजय तुमचाच असेल..!

भारताच्या गौरवशाली इतिहासाला आम्ही पोथीपुराण समजले.. मात्र महापुरुष ग्रंथातून दिव्य प्राप्त करतात,, कारण इतिहासातूनच भविष्याचा मार्ग निघतो.! म्हणून असो तो इतिहासाचा ध्यास..ज्यातून कळे भविष्याचा कयास..!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

||फक्तइतिहास||

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts