Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

निजामाच्या काही विनोदी कथा-हुक्का आणि कॉफी


पहिला निजाम हा अत्यंत धोरणी आणि कर्तबगार होऊन गेला.
त्याचा चिटणीस मन्साराम याने त्याचे चरित्र लिहिले आहे. या ग्रंथाचे नाव मासिरे निजामी. याशिवाय रिसालाये दरबारे आसफिया हा ग्रंथ त्यांने लिहिला असून या दोन्ही ग्रंथात त्याने निजामाच्या दरबारातील रितीरिवाज यांचे वर्णन केले आहे.
मन्सारामाला अनेक वर्षे निजामाचा सहवास लाभल्यामुळे त्यांने नमूद केलेल्या आठवणी मनोरंजक आहेत. त्यातील एक उदाहरण त्याच्याच शब्दात पहा..
"स्वर्गात कसे होणार.."
निजामाचा बक्षी तहव्वूरखान हा असून निजामाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. एके दिवशी तो निजामाच्या दरबारातून उठून बाहेर गेला. निजामाचा खिजमतगार मकबूल जवळच उभा होता. निजामाने त्याला हलकेच सांगितले की तहव्वूरखान हा बाहेर जाऊन काय करतो ते पाहून ये. थोड्या वेळाने मकबूल परत आला, त्याने सांगितले "तहव्वूरखान हा बाहेर जाऊन आपल्या घोड्याच्या खोगिरीवरील जाजम जमिनीवर अंथरतो आणि हुक्का ओढीत बसतो." निजाम हा हुक्का ओढीत नसे आणि ते त्याला आवडत नसे. तहव्वूरखान परत आल्यानंतर निजामाने त्याला म्हटले,"तहव्वूरखान बहादुर,तुम्हाला माहीतच आहे की आपल्या धर्मकल्पनेप्रमाणे परलोकात जी काही आग आहे ही सगळी नरकातच आहे. स्वर्गात अग्नी नसतो. मला एका गोष्टीची काळजी वाटते. आपल्यापैकी ज्यांना हुक्का ओढण्याची सवय आहे, त्यांचे स्वर्गात कसे होणार..? तेथे हुक्क्याकरिता त्यांना आग कोठून मिळणार.?"
तहव्वूरखानाने ओळखले की हे सगळे आपल्याला उद्देशून आहे. तो मोठा विनोदी आणि हजरजबाबी होता. निजामाला कॉफी पिण्याची सवय असे. खानाने म्हटले,"सरकार हुक्के ओढणाऱ्यांना काळजी करण्याचे कारण नाही. स्वर्गात आपल्याला कॉफी लागणारच. त्याकरिता कुठून तरी शेगडी येईलच. त्यातीलच काही निखारे घेऊन हुक्केवाले आपली गरज भागवतील!" हे ऐकून निजामाने स्मित केले.
-मन्साराम,निजामाच्या काही आठवणी..
||फक्त इतिहास||


1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

निजाम आणि बाजीरावची एक पोस्ट-
भूमी कठीण आणि आकाश दूर..!

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts