Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

विश्वास पानिपतात गेला.?

"...सगळे सरदार बादशहासमोर (अब्दाली) गेले आणि त्यांनी विजयाबद्दल त्याचे अभिनंदन केले. बादशहाने स्वार होऊन मैदानाची दुरून पाहणी केली आणि तो आपल्या छावणीच्या तंबूत दाखल झाला. सरदार लोक आपापल्या तंबूकडे गेले. अजून दिवस मावळण्यास एक घटिका अवकाश होता. बर्खूर्दारखानाच्या दुराणी (अफगाण) शिपायांनी विश्वासरावाचा हत्ती आणि त्याच्या अंगावरील अलंकार काढून घेऊन विश्वासरावाचे शव पालखीत घालून शुजाउद्दौल्याकडे (अयोध्येचा नवाब) आणले. शुजाउद्दौल्याने त्यांना दोन हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. आणि शव आपल्या रक्षणाखाली घेतले.....

.....अहमदशहाने शुजाउद्दौल्याला आज्ञा केली की विश्वासरावाचे प्रेत आम्ही पाहू इच्छितो. ते पाठवून द्या. त्याप्रमाणे शुजाउद्दौल्याने प्रेत बादशहाकडे पाठविले. शहावलीखान (अहमदशहा अब्दालीचा वजीर) आणि इतर अफगाण आणि हिंदुस्थानी सरदार यांनी विश्वासरावाचे प्रेत पाहिले. आणि ते म्हणू लागले की अशा वर्णाचा आणि सुंदर बांध्याचा मनुष्य आमच्या आजपर्यंत पाहण्यात आला नाही. त्याचा वर्ण चंपक फुलासारखा होता. तो नाजुक बांध्याचा होता. त्याची गात्रे रेखीव होती. त्याचे हात मांडीपर्यंत पोहोचले होते. त्याचे डोळे अर्धे उघडे होते. मृत असूनही त्याच्या चेहेऱ्यावर कांती कायम होती. असे वाटे की तो झोपेत आहे. त्याच्या मानेवर दोन्ही कानाच्यामध्ये तलवारीची जखम होती. ही जखम अर्ध्या बोटाएवढी खोल होती. त्याच्या भुवईपाशी बाणाची एक जखम होती. तेथे एक बोटभर कातडे निघाले होते. पण ते शरीराला चिकटून होते. त्याच्या अंगावर रक्ताचा एकही डाग नव्हता.

दुराणी शिपायांनी एकच गर्दी केली. ते म्हणू लागले की हा दख्खनचा बादशहा होता. त्याचे प्रेत वाळवून देशी नेले पाहिजे. शेवटी विश्वासरावाचे प्रेत तेथून काढून बर्खूर्दारखानाचा दिवाण मोतीलाल याच्या तंबूत ठेवण्यात आले....

..शुजाउद्दौल्याला ही बातमी कळताच तो अहमदशहाकडे गेला आणि शहावलीखानाच्या संमतीने म्हणाला-

"वैर हे जिवंतपणी असते. हिंदुस्थानात परंपरा अशी आहे की विजयानंतर शत्रूच्या मृत सरदाराचे दहन अगर दफन त्यांच्या पद्धतीप्रमाणे करवावे. असे करण्यातच लौकिक आहे. याच्याविरुद्ध वागले तर बदनामी होईल. आपण या देशात थोडेच दिवस राहाणार आहात. आम्हाला नेहमी त्यांच्याशी (मराठ्यांशी) संबंध आहे. विश्वासरावाला आमच्या ताब्यात देण्यात यावे. हिंदुधर्माप्रमाणे त्याचे दहन करवू."

मित्रांनो,काशिराज हा शुजाउद्दौलाचा वकील, त्याने प्रत्यक्ष अनुभवलेला वरील प्रसंग आपल्या ग्रंथात विदित केला आहे..!

ज्या विश्वासरावला मात्र वीस वर्षाच्या उमेदीत वीर मरण आले त्याची हेटाळणी आम्ही महाराष्ट्रीय 'विश्वास पानिपतात गेला' या म्हणीतून करू लागलो..? जोत्यावर बसून कोत्या मनाचं प्रदर्शन करणारे आम्ही..! शुजाउद्दौला सारख्याला शत्रुपक्षातील माणसाला त्याच्या कोवळ्या वयातील बलिदानाची किव यावी, मात्र इतकी वर्षे झाली तरी आम्ही विश्वासरावांच्या मरणाला साधी किंमत दिली नाही.! उलटपक्षी दिली उपेक्षा आणि हेटाळणीच.!

वीरांच्या या भूमीत वीरांना हीच का ती मानवंदना..???

रणभूमीत मृत्युमुखी पडलेला, मातृभूमीसाठी लढलेला वीर तो वीरच असतो त्याला कुठली जात नसते.!

रणांगणात मरणाऱ्या योद्ध्चेया मुल्यमापन त्याच्या कर्तुत्वा वरून करावे की जातीवरून..?

कोवळ्या वयात रण कुंडात सडे पणाने उतरून वीर मरण स्वीकारणाऱ्या या योद्धाच्या बलिदानावर आमचा 'विश्वास आहे'.!!!

म्हणूनच विश्वासराव आमच्या मनात विराजमान आहे.!!!

पानिपतातील या उपेक्षित योद्ध्याला फक्तइतिहासची मानवंदना!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

#panipat #vishwasrao peshwa

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts