Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

भूमी कठीण आणि आकाश दूर...


...कोल्हापूरकर संभाजीराजा आणि सुलतानजी निंबाळकर या मराठी शक्ती निजामाला येऊन मिळाल्या!!
आपण आता शाहू महाराज आणि बाजीराव यांचा सहज पाडाव करून मराठ्यांच्या घोड्यांना वेसण घालू या तोर्‍यात निजाम वागू लागला.
सुलतानजीने विस हजारांचे सैन्य उभे करून आपण बाजीरावचा मोड करू असे निजामाला आश्वासन दिले.! आणि निजामाला आता आकाश ठेंगणे वाटू लागले.!!
निजामाच्या हालचाली सुरु झाल्या बरोबर सुरुवातीस शाहूमहाराज गडबडले. कारणही तसे होते, सुलतानजी सारखा असामी आणि संभाजी राजे निजामाला सामील होणे म्हणजे मोठे आव्हान होते!
पण मराठ्यांची शक्ती त्यांच्या संख्येत नव्हती, होती त्यांच्या इराद्यात!
आणि त्यासाठी शिवशंभु नंतर बाजीराव सारखा महायोद्धा जणू नियतीनेच निर्धारित केला होता!
बाजीरावाने नोव्हेंबर १७२७ ते मार्च १७२८ या काळात निजामाशी प्रखर संघर्ष करून त्याला पालखेड येथे कोंडले.!
अखेर निजामाला शाहू महाराजांचा चौथाई सरदेशमुखीचा अधिकार मान्य करून कोल्हापूरकर संभाजीराजाला आपल्या छावणीतून बाहेर पाठवावे लागले.!
आणि मराठी सरदार दावजी सोमवंशी, गोरखोजी भापकर, सत्यसिंग भोसले, फत्तेसिंह भोसले हे चौथाई वसूल करीत निजामाच्या राज्यातून स्वैर संचार करु लागले.!!
पेशवे दप्तर खंड १० पान क्र. ६६ वरील निजामाच्या सल्लागाराचे उद्गार की,
सुलतानजिचा इतका भरवसा नबाब साहेबांना होता जे वीस हजार फौज मिळवून बाजीराव यास मोडेल परंतु काहीच नाही जाहले!

निजाम मात्र आपले अपयश लपवण्यासाठी नेहमीप्रमाणे दिल्लीच्या मोगल बादशाहाला दोष देऊ लागला. मात्र निजामाचा अधिकारी आणि 'हवाले खवाकीं' या निजाम चरित्राचा लेखक मोहम्मद कासिम म्हणतो-

बादशहाचे काय धोरण राहील याबद्दल त्याला खात्री नव्हती. निरुपाय होऊन त्याने तह केला पण या घटनेने त्याला अतिशय वाईट वाटले. शोकातिरेकामुळे त्याने किती दिवस नीट जेवण खावन नाही केले. अनेक वेळा तो आपली मनगटे जाऊन म्हणे-
'अफसोस, अफसोस आमचे गाफील बादशहा माझ्यासारख्या निरपराधी माणसाच्या मागे लागले आहेत, असे ते करणार नाहीत अशी मला थोडीशी जरी खात्री वाटली तर एक वर्षाच्या आत या दृष्ट जमातीला (मराठे) मी दक्षिणेतून काढून लावीन, त्यांचे नावही शिल्लक ठेवणार नाही. पण काय करावे "भूमी कठीण आणि आकाश दूर" अशी स्थिती झाली आहे.!!
- प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..