कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क
टोका येथील सिद्धेश्वर मंदिर- उत्तरेतील शिल्पकलेचा आविष्कार
सिद्धेश्वर मंदिर-टोके, हे मंदिर औरंगाबाद जिल्ह्यात नेवासा येथून सहा किमी. अंतरावर आहे. मंदिरांचा प्रकार म्हणजे हिंदुस्थानी किंवा नागर शैली होय.
नाशिकचे काळाराम मंदिर, त्रंबकेश्वर चे मंदिर, गोदा प्रवरा संगमावरील कायगाव व टोके येथील शिवमंदिरे तसेच नेवासे येथील मोहिनीराज मंदिर ही देवालय या प्रकारातली आहेत.
यांचे एक वैशिष्ट्य असे की यापैकी कोणतेच सतराशेसाठ च्या आधीचे नाही. दुसरी उल्लेखनीय गोष्ट अशी की ही मंदिरे बांधणाऱ्याचा इंदूरदरबार, ग्वाल्हेर दरबार म्हणजेच माळवा प्रांत किंवा दिल्लीशी प्रत्यक्ष संबंध होता.
कोणी सावकारी साठी, कोणी चाकरीसाठी या ठिकाणचे पेशव्यांचे वकील म्हणून आपापली गावे सोडून तिकडे बराच काळ स्थायिक झालेले होते. थोडाफार धनसंचय झाल्यावर त्यांनी आपल्या जहागिरीच्या गावी किंवा मूळ गावी जाऊन मंदिरे बांधली. तीच मंदिरे नाशिक, नेवासा, कायगाव आणि टोका येथे पाहायला मिळतात.
नवीन परिचय झालेल्या त्या मुलखातील मंदिर शैली व त्यासाठी कदाचित त्या प्रदेशातील कारागीरही त्यांनी महाराष्ट्रात आपापल्या गावी आणले व मंदिर निर्माण केले. तेव्हा जे मंदिराचे रुप साकारले ते म्हणजेच हिंदुस्तानी किंवा नागर शैली होय.
हिंदुस्तानी मंदिरे संपूर्ण दगडी बांधणीची आहेत तसेच येथील काळा दगड असला तरी तो गुळगुळीत केला आहे आणि बांधकाम सफाईदार केले आहे. या मंदिरांचा पदविन्यास हा यादव मंदिरापेक्षा बराच निराळा आहे. गाभारा, अंतराळ, मंडप व मुखमंडप हीच प्रमुख अंगे असली तरी येथे चौरसाच्या चौकटीतून कोठेही सुटका झालेली नाही.
गाभारा आतून चौरस आहे तसा बाहेरूनही. बाहेरच्या भिंतीची जाडी मध्यभागी उभ्या पठानी वाढविलेली असते व त्यामुळे यादव मंदिरा सारखेच रथ निर्माण होतात.
टोके येथील सिद्धेश्वर मंदिर भव्य परिसरात असून त्याला तटबंदी आहे. प्रमुख द्वार भव्य असून हिंदुस्तानी पद्धतीचे आहे. काटकोनातील द्वार आणि महिरपी तसेच द्वारावरील गॅलरी हिंदुस्तानी पद्धतीची आहे.
मंदिरात विष्णू शिव आणि शक्ती अशी तीन मंदिरे आहेत आहे.
विष्णू मंदिर-
विष्णू मंदिर भव्य असून त्यासमोर वज्रासनात गरुड बसलेला आहे. या मंदिराच्या बाह्य भिंतीवर विष्णूची रूपे कोरलेली आहेत.
विष्णू मंदिरासमोरील पंख तुटलेला गरुड
विष्णू मंदिर
विष्णू मंदिराच्या भिंतीवरील वराह आणि वामन अवतार
विष्णू मंदिराचा बाह्यभाग
शिव मंदिर-
शिव मंदिरासमोर भव्य नंदी असून एका व्यक्तीवर मत्स्यभेद करणाऱ्या अर्जुनाचा शिल्पपट कोरलेला आहे. याशिवाय श्री कृष्ण लीला, गणेश लीला यांचे शिल्पपट कोरलेले आहे.
शिवमंदिराच्या भिंतीवरील श्री कृष्ण लीला गणेश लीला आदी शिल्पपट
वरील शिल्प पटातील श्री कृष्ण लीला-कालियामर्दन शिल्प
देवी मंदिर-
देवीचे मंदिर तारा कृती आहे. या मंदिरालाही राजस्थानी पद्धतीची भोसरी आहे.
देवीचे मंदिर थोडे लहान असून बाह्य भिंतीवर देवीची विविध रूपे कोरलेली आहेत.
तारा कृती देवी मंदिर व त्यावरील देवी शिल्प
राजस्थानी-मोगल कला परंपरांचा प्रभाव किती खोलवर पोहोचला होता व हा शिल्प प्रकार साकार करण्यात मराठी शिल्पकारांनी किती यश मिळविले होते याची यथातथ्य कल्पना टोके येथील सिद्धेश्वर मंदिरातील दगडी ओहरी व स्तंभावरून येते.
उत्तरी बांधणीचे खांब आणि ओसरी
ओहरी संपूर्ण दगडी बांधणीची आहे. दोन्ही बाजूला सुरुच्या अत्यंत घाटदार खांबाच्या ओळी आहेत. स्तंभाच्या ओळी जोडण्यासाठी दगडाच्या मेहरपीच्या कमानी आहेत. दोन्हीसाठी साधा काळा पत्थर वापरलेला आहे व दोन्हीवर कसलेही विशेष नक्षीकाम नाही पण त्यांचे आकारमान इतके डौलदार आहे त्यांची मांडणी अशा कल्पकतेने केलेली आहे की पाहणाऱ्यांचे मनावर हे शिल्प कायमचा ठसा उमटवून जाते.
मग औरंगाबाद वरून जाताना किंवा येताना दहा मिनिटे थांबून एकदा तरी बघा महाराष्ट्राचा अनमोल वारसा.!
महाराष्ट्राचे पुरातत्त्व यातून माहिती घेतल्यानंतर आम्ही मंदिराला प्रत्यक्ष भेट देऊन व्हिडिओ बनवला आहे, त्यामधून मंदिराचे वर्णन व विश्लेषण समजणे सोपे जाईल.
असो,. आपल्या हेमाडपंथी मंदिरा मध्ये हे मंदिर पाहुण्यासारखे वाटते उत्तरेतील..!
... मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांच्या धर्तीवर बांधलेले महाराष्ट्रातील एक सुरेख देऊळ.!... वारसा माझ्या महाराष्ट्राचा.!.. साक्षीदार इतिहासाचा.!
||फक्तइतिहास||
प्राचीन मंदिराविषयी अधिक वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा-
Great, temples and stories of Maharashtra
ReplyDeleteThanks...
ReplyDelete