Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

आग्र्याच्या दरबारात शिव-शंभू...


गुलामिच्या साम्राज्यात स्वाभिमानाचे स्थान घट्ट करणाऱ्या या घटणेला कुवर रामसिंगाचा सरदार परकालदास याचा दिवान कल्याणदास साक्षिदार होता. बिकानेरच्या दफ्तरखान्यात त्याची पत्रे उपलब्ध आहेत.

पदोपदी झालेल्या मानहानीने महाराजांच्या मनात राग धुमसत होता. आणि आता दरबारातील या वागणूकीनेतर त्यांचा प्रक्षोभ झाला. रागात ते रामसिंगावर बरसले-
"तुम देख्यौ, तुम्हारा बाप देख्यौ, तुम्हारा पातशाही देख्यौ. मै ऐसा आदमी हों यू मुझे जसवंतसिंगसो तले गौर करने खड़ा रख्यौ. मै तुम्हारा मनसीब छोड्या. मुझे खडा तो करीनासर रख्या होता.."
रामसिंग त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होता..
महाराज गरजले-
"म्हारो मरण आयो. यो तो तुम मुझे मारौगे या मै अपघात कर मरोंगा. मेरा सर काटकर ले जावो. मै पादशाके हुजूर नही चालता.."
या गोंधळाची बातमी आतापर्यंत बादशहास लागली होती. त्याने मुल्तफितखान, आकिलखान(दिवाने खासचा व्यवस्थापक)  व मुखलिसखान यांना सांगून पाठविले की, शिवाजीचे समाधान करा, खिल्लत द्या "
मात्र महाराजांनी ती खिल्लत स्वीकारलीच नाही ..
" मै पादशहाकी मनसब नही करता. चाकर नही रहता. मुझे माऱ्यो चाहे मारो. कैदमे किया चाहे कैद करो. मै सरोपाव न पहरो.."

आणि त्यांचे ते रॊद्ररूप तेथे खालमानेनं उभ्या असलेल्या हिंदुस्थानच्या तमाम राजांनी पाहिलं. आनंद ओसरला अन् दरबार सुन्न पडला. आणि  महाराज तेजस्वी सिंहासारखे ताठमानेने दरबारातून निघून गेले. रामसिंग सोबत होता. महाराजांनी बादशहाची पुनश्च कधीच भेट घेतली नाही.
मात्र या भेटीची दखल खुद्द नियतीनेच घेतली. राजकारणवश कधी शत्रूच्या चाकरीत जावेच लागले तरी ती लाचार होऊन न करावी. आणि कुठल्याही परिस्थितीत आपला स्वाभिमान चाकरीखाली जाऊ नये. असेच मर्म या घटनेचे बाल शंभूराजांच्या काळजावर उमटले ते कायमचं. ‌हाच तो अंगार जो पुढे पुनश्च उफाळून आला, गुलामिच्या दरबारातून- रॊद्रशंभू बनून!
........ शौर्यशंभू " पॄ. ५१

||फक्तइतिहास||
http://www.faktitihas.blogspot.in

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts