Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

दारा शिकोह।।



मुगल घराण्यातील भारतातील अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्व म्हणजे शहाजहान बादशहाचा मोठा मुलगा मोहम्मद दारा शिकोह. दाराचा ओढा जन्मापासूनच विविध धर्माच्या अभ्यासाकडे होता. त्याने यहुदी, ख्रिस्ती आणि वैदिक वाङ़्यमयाचा अभ्यास केला. संस्कृतच्या विद्वान पंडितांना त्याने विविध प्रकारे आश्रय दिला. यासाठी कट्टर लोकांकडून व औरंगजेबाकडून त्याची नेहमीच निर्भत्सना झाली.
त्याचा संस्कृत आणि फारशी या दोन्ही भाषांचा व्यासंग दांडगा होता. त्याने भगवद्गीतेचे फारसी भाषांतर केले. ६५ उपनिषदांची फारसी भाषांतरे करविली. या फारसी भाषांतरावरून नंतर युरोपिअन लोकांनी त्यांची लॅटिन भाषांतरे केली आणि त्या लॅटीन अनुवादावरूनच युरोपला विशेषता: जर्मनीला उपनिषदांचा परिचय झाला.
असो,
उपनिषदांबद्दल दारा म्हणतो-
"मी हिंदूंचे धर्मग्रंथ अभ्यासिले. हिंदू हे अद्वैताचे विरोधी नाहीत. त्यांच्या चार वेदात आढळणारे अद्वैत तत्वज्ञान उपनिषदातून ग्रंथीत करण्यात आले आहे. उपनिषदे म्हणजे अद्वैताचा समुद्र होय. म्हणून मी त्यांचे भाषांतर केले. कोणत्याही तत्वाचा उलगडा उपनिषदांच्या द्वारे होऊ शकतो. सृष्टीतील पहिला ग्रंथ म्हणजे उपनिषद् होत. अद्वैत सागराला पुरवठा करणारा हा अखंड झरा होय. पुराणातील आणि उपनिषदातील तत्वज्ञानात साम्य आहे. कुराणात ज्या पौरुषेय ग्रंथाचा उल्लेख आला आहे ते म्हणजे उपनिषद्च होत, दुसरे असू शकत नाहीत."

दाराने योगवशिष्ठाचे फारसी भाषांतर करविले आणि त्याला स्वतः प्रस्तावना लिहिली. त्या प्रस्तावनेत तो म्हणतो-
"रात्री मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मला तेजपुंज दोन व्यक्ती दिसल्या. मी त्यांच्याकडे नकळत ओढला गेलो. त्यापैकी एकाने (वसिष्ठांनी) मोठ्या ममतेने माझ्या पाठीवर हात ठेवला. आणि दुसऱ्या व्यक्तीकडे वळून म्हंटले, 'प्रभू रामचंद्र, हा पहा सत्यशोधनाच्या मार्गातील पथिक.'
हे ऐकून, प्रभू श्रीरामचंद्राने स्मित हास्य केले आणि मला प्रसाद दिला. मला जाग आली. माझी खात्री झाली की मी योगवशिष्ठाचे भाषांतर करावे अशी प्रभू रामचंद्राची आज्ञा आहे. मला तीव्र इच्छा झाली. ती आज्ञा मी पार पाडली"
असे हे दाराचे मनीचे भाव त्याच्या मुखातून व्यक्त झाल्यावर त्याच्या अध्यात्मिक ज्ञानाची पातळी कळते. अनेक वर्षापासून पानांवर ओवीबद्ध झालेले धर्माचे तत्वज्ञान त्याला प्राप्त झाले होते.
दाराचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे 'मज्मुअलबहरैन' हा होय. सन १६५५ मध्ये त्याने हा ग्रंथ लिहिला. १६५८ मध्ये  या ग्रंथाचा त्याने संस्कृत अनुवाद केला. हिंदू आणि मुस्लिम अध्यात्म मार्गातील साम्य दाखवून दोन्ही तत्त्वज्ञानात काही भेद नाही हे दाखविण्याचा दाराने यात प्रयत्न केला आहे. या ग्रंथाचे त्याने संस्कृत भाषांतर करून त्याचे नाव 'समुद्रसंगम' ठेवले आहे. जणू विविध धर्माच्या नद्या एका सागरात विलीन होतात असेच काही तत्वज्ञान सांगण्याचा त्याचा प्रयत्न थोर आहे. मात्र वारसाहक्काच्या युद्धात पराजित झाल्यावर औरंगजेबाच्या हुकुमाने दारावर खटला भरवण्यात आला. इस्लाम धर्मापासून भ्रष्ट झाल्याचा त्यावर आरोप ठेवण्यात आला. काजींनी आरोपीची चौकशी करून त्याला धर्मभ्रष्ट  ठरविले आणि त्याला देहदंडाची शिक्षा सुनावली. त्यानुसार १० सप्टेंबर १६५९ रोजी दाराला ठार मारण्यात आले. त्यादिवशी जल्लाद त्याच्या कोठडीत शिरले. त्यांनी त्याला आणि त्याचा कोवळा मुलगा सिपहर यांना पकडून त्यांच्या गर्दानी छाटल्या.!!
जणू सत्य धर्मावर चालण्याची शिक्षा त्याला मिळाली!
कट्टर धर्म शास्त्रज्ञांना औरंगजेबाच्या या कृत्याने आनंदच झाला. एवढेच काय तर पुढेही काही मुस्लिम विद्वानांचे असेच मत झाले.
जसे सय्यद सुलेमान नदवी हे मोठे विद्वान होऊन गेले. सन १८५३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
ते म्हणतात,'दारा शिकोह च्या हाती मोगल साम्राज्य आले असते तर मुसलमानांचे राज्य अनेक वर्षेही टिकले असते; पण इस्लाम नष्ट झाला असता. उलट औरंगजेबाच्या हाती राज्य आल्याने मुसलमानांचे राज्य नष्ट झाले. पण इस्लाम जिवंत राहिला.'

अरेरे, विद्वान आणि धर्मशास्त्रज्ञ म्हणवणारे हे पंडित.! अशाच विचारसरणीमुळे अनेक मुस्लिम राज्यकर्ते आणि विद्वान हे भारतात राहूनही मनाने उपरेच राहिले!
असो,
दारा आठवणीत राहिला तो त्याच्या धार्मिकतेमुळे तर औरंगजेब धर्मांधतेचे मुळे.! औरंगजेब क्रूर धर्मांध होता तर दारा दयाळू आणि धार्मिक होता असे हे दोन ध्रुवाचे जणू टोकच नियतीने सोबतच निर्माण केले..! तसे निसर्ग आणि नियतीचा तो क्रमच आहे.!
- प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts