Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

युद्धाची बारूद शत्रूच्या गोटात: कुलमुखत्यार राणीयेसूबाई साहेब...



सिंहगड जिंकून घेतल्यानंतर औरंगजेब हा १ मे १७०३ रोजी पुण्यात आला. पुण्यात तो नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होता. त्यानंतर तो राजगड व तोरणा हे किल्ले जिंकून घेण्यासाठी पुण्यातून बाहेर पडला. पण बादशहाच्या पुण्यातील या मुक्कामात त्याने काय केले..?
मात्र दरबाराच्या बातमीपत्रात शोध घेतल्यास काही विचित्र नोंदी आढळतात. शिवाय औरंगजेबाचा चरित्रकार साकी मुस्तेदखान हा औरंगजेबाचा पत्रलेखक म्हणून त्यावेळी पुण्याच्या छावणीतच होता. तसेच औरंगजेबाच्या पत्रांचा संग्रह (अहकामे आलमगिरी) करणारा औरंगजेबाचा चिटणीस इनायतुल्ला हाही छावणीतच होता. औरंगजेबाचा निकटचा कारभारी आणि औरंगजेबाच्या आठवणी या ग्रंथाचा लेखक हमिदुद्दिन हा सुद्धा त्या काळात पुण्याच्या छावणीतच होता.
प्रस्तुत साधनांवरून पुण्यात औरंगजेबाची छावणी आजच्या स्वारगेटपासून गोळीबार मैदानाचे पलीकडे पसरली होती. खुद्द औरंगजेबाचा निवास स्थान अर्थात त्याचा गुलालबार तंबू हा स्वारगेट आणि गोलीबार मैदान यांच्या मध्ये भवानी पेठेच्या कोपऱ्यावर ओढ्याच्या काठावर होता.
छावणीतील माणसांची संख्या ४० ते ५० हजार असावी व सैनिकांची संख्या वीस ते पंचवीस हजार असावी असे तत्कालीन कागदपत्रातील नोंदीवरून वाटते.
पुण्याला येऊन आठ दिवस झाले नहीं तो औरंगजेबाने एक विलक्षण निर्णय घेतला.!

९ में १७०३ ही तारीख मराठ्यांच्या इतिहासातली कलाटणी देणारी ठरली.!
त्यादिवशी औरंगजेब बादशहाने आपला कारभारी हमीदुद्दीन खान याला बोलावून म्हंटले,
'तुम्ही शाहूकडे जा आणि त्यास म्हणावे कि तू मुसलमान हो'
त्याप्रमाणे हमीदुद्दीनखान शाहूकड़े गेला आणि त्यांने बादशाहचा निरोप संगीतला.
यावर शाहूने काय म्हटले असावे.???
शाहूने बादशहाच्या या इच्छेला ठाम नकार दिला!!!
ही गोष्ट बादशहाच्या दरबारच्या कागदपत्रात सहजपणे आली आहे.
शाहूवरील धर्मांतराचा हा प्रसंग म्हणजे महाराष्ट्रावर या निमित्ताने केवढे मोठ्ठे संकट आले होते याची कल्पनाही करवत नाही. पण सहज विचार मनात येतो की शाहूला हा निर्धार झाला कसा..???
वयाच्या आठव्या वर्षी बाल शाहूराजा मोगलांच्या कैदेत आला त्या वेळेपासून पुढील अठरा वर्षे त्याचे आयुष्य मोगलांच्या छावणीतच गेले. त्या बालवयात भोवतालच्या मोगली वातावरणाचे संस्कार त्याच्यावर व्हावयाचे ते होतच राहिले! अशा विपरीत परिस्थितीत आपल्या परंपरेबद्दल उदासीनता आणि परकीय संस्कृतीबद्दल आकर्षणही मनात बिंबणे काही अवघड नव्हते. अशा विपरीत परिस्थितीत शाहू राजाचा नकार म्हणजे एक आश्चर्य !!!
हे कसे घडले..????
शाहूच्या निर्धाराचे हे मूळ शोधून पाहता एक गोष्ट लक्षात येते ती ही की, शाहूच्या निर्बंधाच्या काळात त्याची आई राणी येसूबाई ही सतत त्याच्या पाठीशी उभी होती.!!!

त्या कठीण काळात आपल्या मुलावर योग्य तेच संस्कार व्हावेत याबद्दल तिने जीवाचा आटापिटा केला असला पाहिजे. त्यामुळे मुगल छावणीतील वातावरण काहीही असो, आईच्या सानिध्यात शाहू आपले संस्कार आणि आपला धर्म जगत होता आणि जोपासत होता हेच खरे.
तसेच शंभूराजांच्या ज्वलंत धर्माभिमानाची पुण्याईही मागे होतीच!!
शाहूने धर्मांतर केले असते तर महाराष्ट्राचा सगळा इतिहासच बदलला असता. मराठ्यांनी त्याची सत्ता माणली नसती, पण मराठ्यांच्या फळीला खिन्डार पडले असते. औरंगजेबाने त्याला जहागीर देऊन नबाब केले असते. मराठी मातीतली आम्ही माणसे आपलं स्वत्व गमावून बसलो असतो.!

शाहूचा आशीर्वाद पाठीशी घेऊन मराठ्यांनी अटकेपर्यंत मजल मारली नसती. मराठी राज्याचे अखिल भारतीय साम्राज्यात रूपांतरण झाले नसते.
'दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा' असे म्हणण्याची वेळ आली नसती.!
त्यामुळेच शाहूचा निर्धाराचा नकार ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कलाटणी देणारी घटना म्हणावी लागेल आणि त्या निर्णयामागे आपल्याला जाणवते ते राजमाता येसुबाईंचे प्रखर व्यक्तिमत्व!!

राजमाता येसूबाईंच्या रूपाने प्रत्यक्ष अंबाभवानीने त्या काळात शाहूचा आणि पर्यायाने महाराष्ट्राचा धर्म वाचविला असे जर कोणी माणसाला वाटले तर त्यात नवल वाटायला नको!

खरेतर या मातेने महाराष्ट्राच्या इतिहासात फार पूर्वीच मोलाची कामगिरी बजावली होती. १६८९  मध्ये शंभूराजांच्या बलिदानानंतर मोगलांचा वेढा रायगडास पडला. त्यावेळी राणी येसूबाईने राजारामाला किल्ल्याबाहेर काढले आणि पन्हाळ्याकडे पाठविले. त्याचा परिणाम असा झाला की भोसल्यांचे सर्व कुटुंब एकाच वेळी पकडून मोहीम संपवावी हा औरंगजेबाचा डाव उधळला गेला.!
पुढे राजारामने जिंजीला एक लाख सैन्य गोळा केले व ज्यामुळे मोगलांना आपले सैन्य महाराष्ट्राच्या बाहेर काढून जिंजीला पाठवावे लागले. या वेढ्यात सहा वर्ष मोगलांना वेळ घालवावा लागला. येसूबाईंच्या या मदतीमुळे सहा महिन्यात आटोपणारी ही मोहीम वीस वर्षे लांबली! औरंगजेबाची संपूर्ण हयात गेली आणि मोगलांची सत्ता संपुष्टात आली!
आणि यातूनही दिव्य ते शाहू राजांच्या रूपाने शत्रूच्या गोटात जोपासलेली युद्धाची बारुद!!!
ज्याने पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे साम्राज्यात रुपांतर घडवून आणले!!

"सखीराज्ञी जयती" या शिक्क्याने स्वराज्याची कुलमुखत्यार म्हणून ज्यांनी शंभूराजांना अखंड साथ दिली त्यांनीच शंभूतत्व त्यांच्या बलिदानानंतरही प्रत्यक्ष शत्रूच्या छावणीत जपले म्हणजे थोरच!!

औरंगेजेबाच्या मृत्यूनंतर, तब्बल १८ वर्ष मोगलांच्या कैदेत असलेले शाहु ह्यांची सुटका झाली तरी येसुबाईंची सुटका होऊ शकली नाही.!
मात्र शाहुराजांच्या सुटकेनंतर सात वर्षानंतर मराठ्यांनी दिल्लीत जाऊन आपल्या ताकदीच्या जोरावर राजमाता येसूबाईंना अटकेतून सोडवून आणले.
४ जुलै १७१९ रोजी म्हणजे साधारणपणे तीस वर्षांच्या प्रदीर्घ कैदेनंतर राजमाता येसूबाई मोगलांच्या कैदेतून दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या.!

धर्मांतराचा प्रसंग वाचून उगीच कोणी धार्मिक दृष्टिकोनातून विपरीत मत करू नका, कारण हा इतिहास आहे!!
जर खरेच शाहूने धर्म बदलला असता तर महाराष्ट्रात मराठ्यांचा पक्ष तरी राहिला असता काय.?
म्हणून तत्कालीन इतिहासातील या प्रसंगा पुरते तरी 'धर्म' या शब्दाचे महत्त्व आहे, हे कुणालाच टाळता येणार नाही..! कारण प्रसंग धार्मिक असला तरी परिणाम राजकीय आहेत.!
खरेतर जे तत्व व सत्व जपण्यासाठी शंभुराजे अनंत यातना सहन करत प्राणत्याग करतात, त्या तत्त्वामध्ये स्वातंत्र्य आणि स्वाभिमान, तर सत्वामध्ये मराठीमाती आणि हिंदू संस्कृतीचा अभिमान नव्हता काय..?
हेच तत्व आणि सत्व राणी येसूबाईंनी आपल्या मुलामध्ये हरप्रयत्ने अखेरपर्यंत जपले.
....आणि म्हणूनच लक्ष लक्ष गनिमाच्या गोटात स्वराज्याच्या युद्धाची बारूद अखंड जपणाऱ्या दुसऱ्या मांसाहेब अर्थात कुलमुखत्यार राणीयेसूबाई साहेब यांना मानाचा मुजरा!!!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts