Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

गुलामीतून मुक्ती:


स्वराज्यातील लोकांना कारवार बाजुला गुलाम म्हणून दोन ते तीन पागोड्याला इंग्रज व इतर युरोपियन विकत घेत. शिवाजी व संभाजी राजांनी आपल्या मुलुखात अशा विक्रीला आळा घालण्यासाठी त्यावर जबर कर बसविला. याने गुलामांच्या व्यापारात घट झाला. कारवारच्या इंग्रजांच्या ५ जुन १६८५ च्या पत्रातील मजकूर: 'गुलामांच्या बाबतीत लिहावयाचे तर घाटावर प्रत्येकी २ ते ३ पागोडे देउन गुलाम विकत घेणे शक्य आहे. परंतु विकत घेतलेल्या व विकत घेउन आणलेल्या प्रत्येक गुलामामागे शिवाजीच्या अमलापासून जकात द्यावी लागते. ही दरडोई जकात आता दर माणशी बारा पागोडे बसविली आहे. शिवाय अशी खरेदीही सहजासहजी होऊ देत नाहीत. शिवाय गुलामांच्या वापराबद्दलही अटीतटी लादल्या जातात. तरी आम्ही माणसे मिळविण्याचा प्रयत्न करु....'

संदर्भ: English factory records.

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts