Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

सातगाव भुसारी मंदिर समूह: Treasure of Vidarbha

सातगाव भुसारी हे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात एक लहानसे खेडे आहे. चिखली वरून बुलढाणा कडे जाताना सात किलोमीटर अंतरावर हातनी फाटा लागतो. येथून लोक सैलानी बाबा ला जातात. अर्थात सैलानी बाबाला जाण्यापूर्वी अलीकडेच सातगाव भुसारी हे लहानसं गाव लागतं. रस्त्याच्या अगदी डावीकडे बघितल्यावर काही मंदिरांचा समूह नजरेत भरतो. असेच माझेसुद्धा एकदा जाणे झाले. येथील मंदिर समूह बघितल्यावर विदर्भातील प्राचीनतम समृद्ध शिल्पकलेची जाणीव होऊन जाते.
येथील मंदिर समूह पूर्वी बरीच मंदिरे होती असे महाराष्ट्राचे पूरातत्त्व म्हणत. आज मात्र येथे तीन प्रमुख मंदिर दिसतात. त्यापैकी सर्वात प्रमुख आणि मोठे म्हणजे विष्णू मंदिर होय.
विष्णू मंदिर-
विष्णू मंदिर हे ताराकृती गर्भगृहाचे असून त्याला प्रशस्त असा सभामंडप आहे. या सभामंडपाला तीन द्वार आणि त्यावर तीन मुखमंडप आहेत. सभामंडपाचे छत उतरत्या बांधणीची आहे. 
छताचा भार तोलून धरणारे लघु स्तंभ
संपूर्ण छत हे लहान- लहान स्तंभांवर आधारलेले आहेत. आणि या सभामंडपाला कठड्या सारखी दिसणारी अर्ध भिंत आहे. या कड्याच्या भिंतीवर लहान-लहान स्तंभ आकृती कोरलेल्या आहेत. मध्ये हार नक्षी कोरलेली आहे. तसेच दोन स्तंभ आकृतीच्या मध्ये विविध मुद्रेची स्त्री शिल्पे कोरलेली आहेत.
कठड्यावरील कोरीव लघु स्तंभ आणि स्त्री शिल्पे
मुख्य मंडपाच्या आतील शब्द गोलाकार घुमट सारखे आहे. त्यात बोल पट्टा असून मध्यभागी पाकळ्यांचे झुंबर कोरलेले आहेत. या घुमटा भोवती चार कोप-यावर कीर्तिमुखे कोरलेली आहेत. असेच सभामंडपाच्या तिन्ही मुख मंडपाची रचना आहे.
तिन्ही मुख् मंडपाच्या छतावरील गोल घुमटाकार नक्षीकाम व झुंबर
सभामंडपाच्या मध्यभागी तुळ्यांमुळे चौरस निर्माण झालेला आहे. चौरसाच्या तुळ्यांवर आतून सप्तमातृका कोरलेल्या आहेत. मध्यभागी चौरसात झुंबर कोरलेले आहे.
मंदिराचे छत तोलून धरणाऱ्या तुळ्यांवर सप्तमातृका
स्तंभशीर्ष यावरील कीचक-
या चौरसाच्या चार कोप-यावर सभामंडपाचे प्रमुख चार स्तंभ खडे आहेत. सभामंडपाच्या बाहेरील स्तंभा प्रमाणे ते लघुतम नसून पूर्ण असलेले चार स्तंभ आहेत. अर्थात या सभामंडपाच्या छताचे हे प्रमुख चार स्तंभ होय. या स्तंभावर घट्ट-पल्लव आहे. आणि वर भारवाहक किचक आहेत. विशेष म्हणजे दोन कीचका मध्ये एक लहानसा चतुर्भुज किचक आहे. ह्या मंदिराच्या खांबाचे वैशिष्ट्य होय.
दोन भारवाहक किचकांमध्ये एक चतुर्भुज कीचक
येथील या विस्तीर्ण सभामंडपाच्या छताच्या आतील बाजूस उतरत्या कृष्णकमळाच्या पाकळ्यांची रचना केलेली आहे. अशी अप्रतिम रचना इतर कोठेही ही बघायला मिळणार नाही अशीच आहे. येथील कोल्हापूर नाचत बघून माउंट आबू पर्वतावरील दिलवाडा मंदिराची नक्कीच आठवण होईल. माउंट आबू पर्वतावरील दिलवाडा मंदिर सुद्धा मी बघितलं आहे.
कृष्णकमळाच्या उतरत्या पाकळ्यांचा संपूर्ण सभा मंडपाला वेढा आणि छतावरी दगडी झुंबर
मंदिराच्या गाभाऱ्या भोवती देव कोष्टके आहेत. मंदिराच्या पीठ आसनावर देवमुर्ती नाही. तरी पीठासन वरील देव आकृतीवरून मंदिराच्या देवतेचा अर्थ कळतो. सिंहासनाच्या खालच्या बाजूस दोन गजर प्रतिमा कोरलेल्या आहेत. मध्यभागी शंख-पुष्प धारी देवीची प्रतिमा आहे. सर्वात वर हात जोडलेला गरुड आहे. गरुड हे विष्णूचे वाहन असल्यामुळे या पीठांवरील मूर्ती विष्णूची होती हे स्पष्ट होते.
चंद्र शिळेच्या दोन्ही बाजूस कीर्तिमुखे आणि कुमुद
भद्रपीठा सनावर गज, देवी आणि सर्वात वर हात जोडलेला गरुड
मंदिराची शिखर निमुळते होत जाणारे नागर शैलीचे आहे. शिखराचा भाग ढासळला आहे.
या मंदिराच्या अगदी समोर एक लहानसे मंदिर आहे. याचे गर्भगृह असून बाहेर काही स्तंभ खडे आहेत. संपूर्ण मंदिर पडक्या अवस्थेत आहे. आतील बाजूस देव कोष्टके आहेत. गर्भगृहातील पीठासनावर मूर्ति नाही. हे कदाचित ब्रह्माचे मंदिर असावे.
त्याच्या शेजारीच एक नाला वाहतो. मला ओलांडून पलीकडे गेल्यास या समूहातील तिसरे मंदिर म्हणजेच महादेवाचे मंदिर दिसते.
महादेव मंदिर-
महादेवाचे मंदिर चौरस आकृती आहे. या मंदिराच्या अर्ध भिंतीवरही विष्णू मंदिर प्रमाणे लघु स्तंभ कोरलेले आहेत. नक्षी असून काही ही प्रतिमा कोरलेल्या आहेत.
द्वार-या मंदिराचे द्वार अतिशय कलापूर्ण असे आहे. सर्वात वर भूमितीय नक्षी कोरलेली आहे. मध्यभागी देवीची आकृती कोरलेली आहे. ती बहुदा पार्वती असावी. त्याखाली लाट पट्टीवर कोष्टकात पाच देवता आहेत. आणि ललाट बिंबावर श्री गणेश मूर्ती कोरलेली आहे.
द्वाराच्या बाजूस अर्धस्तंभ आहेत. सर्वात आतल्या बाजूस पुष्प हार नक्षी कोरलेली आहे. स्तंभाच्या बाजूस व्याल शाखा कोरलेली आहे.
मंदिराच्या आत मध्यभागी शिवपिंडी आहे. एका बाजूस नागदेवता कोरलेली आहे. मंदिराचे स्तंभ प्रचंड असून मध्यभागी घट्ट पल्लव आहेत.
असा हा अप्रतिम कलेचा अविष्कार अनुभवन्यासाठी चिखली वरून जवळच असलेल्या या मंदिर समूहाला भेट द्या.. मग तुम्हालाही अपरिमित खजिना मिळाल्याचा आनंद होईल.!!!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
||फक्तइतिहास||
..................................................... लेखन सीमा ||
सातगाव भुसारी मंदिर समूह येथे भेट घेऊन काढलेला व्हिडिओ बघा-

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts