Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

युद्धाची बारूद तीही शत्रूच्या शिबिरात""



मित्रांनो,
सन १९०७/८ मध्ये सावरकरांनी लंडनमध्ये अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून तेथेच स्वातंत्र्याचा जंग अखंड प्रज्वलीत ठेवण्यासाठी भारतीय क्रांतिकारकांसाठी एक बारूद निर्माण केली, ती म्हणजे-
'अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ.
मात्र मुद्रण स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या ब्रिटीश राज्यकर्त्यांनी त्यावर मुद्रणापूर्वीच बंदी घातली, आणि ती कायम असताही ज्याचे मुद्रण आणि गुप्त प्रसारण श्रीमती कामा, लाला हरदयाळ, हुतात्मा भगतसिंग, महानायक नेताजी सुभाषचंद्र आदि रणयोद्यांनी केले तो 'अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ क्रांतिकारकांना अखंड स्फूर्ती देणारा व भारतीयांस संघटीत करणारा मंत्र ठरला, लढण्यासाठी बारूद ठरला.
सशस्त्र क्रांतीबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात-
सशस्त्र क्रांतीचा मार्ग पूर्णपणे अव्यवहार्य, अशक्य नि हास्यास्पद आहे, एवढेच नव्हे तर तो आत्मघातकीही ठरेल असे सांगणाऱ्या लोकांना माझे उत्तर असे की इंग्रजांच्या हाताखाली असलेल्या त्या आपल्या भारतीय सैनिकांच्या हाती जी शस्त्रें आहेत ती आपलीच आहेत. ते सैनिक अशिक्षित असले तरी त्यांच्यातही स्वातंत्र्याची इच्छा असलीच पाहिजे. ती त्यांच्या अंत:करणातील स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलीत करा नि मग पहा परक्या इंग्रजांवरच तीच शस्त्रे कशी उलटतील ते ."
आणि सावरकर म्हणतात तसे चाळीस वर्षांत ही ज्योत प्रज्वलीत झाली तेव्हा दुसऱ्या महायुद्धात भारतीय सैन्य बंड करून उठलेच..!

सन १९५२ मध्ये 'अभिनव भारत' या आपल्या सशस्त्र क्रांतिकारक संघटणेचा सांगता समारंभ, ध्येयपूर्ती समारंभ पूणे येथे साजरा करताना त्या वेळी सावरकर म्हणाले-
"ब्रिटन देश जरी वाचला तरी त्या दोन महायुद्धांच्या माऱ्याखाली ब्रिटनच्या साम्राज्यशक्तीचा आणि उन्मत्तपणाचा चक्काचूर झाला..!
अर्थात..
अफाट अमुची ध्येयसक्ती..!
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ज्वलंत स्मृतीस कोटी-कोटी प्रणाम !!!
||फक्तइतिहास||

Comments

  1. Really sir u r description about maharastras history was really helpful .....kindly I supports u ...=PB

    ReplyDelete

Post a Comment

... मग कशी वाटली पोस्ट

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts