Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

'शौर्यशंभू' या ग्रंथा बाबत..

Scroll up..
राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार: पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे व पद्मश्री डॉ विजय भटकर हस्तेयांच्या लेखक प्रा रवि बाविस्कर यांना गड किल्ले संवर्धन आणि इतिहास लेखन या कार्यात केलेल्या मोलाच्या कामगिरीबद्दल राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान अखंड सात वर्ष अभ्यास करून व गड किल्ल्यांच्या मोहिमा करून छत्रपती संभाजी महाराजांवर 'शौर्यशंभू' हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन 7 जुलै 2016 रोजी नाशिक येथील कार्यक्रमात छत्रपतींचे तेरावे वंशज कोल्हापूर नरेश युवराज संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते शौर्यशंभू या ग्रंथाचे प्रकाशन झाले.! शिक्षक आमदार अमरावती विभाग मा. श्रीकांत जी देशपांडे, जय जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. भोजराजजी चव्हाण साहेब व वाशिम जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. दिलीपरावजी जाधव यांच्या हस्ते प्रा रवि आत्माराम बाविस्कर यांचा सत्कार व गुणगौरव! महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे शौर्यशंभू या ग्रंथास हार्दिक शुभेच्छा.! मा.आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते लेखकाचा सत्कार व लेखकाकडून ग्रंथ भेट.चिखली मतदार संघाचे आमदार राहुल भाऊ बोंद्रे आणि मुंगसाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष श्री दीपक भाऊ देशमाने यांच्या हस्ते लेखकाचा मेहकर येथे जाहीर सत्कार.
धन्यवाद जोहार..!!!

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts