Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

महादजींनी दिले वॉरेन हेस्टिंगला "कॅरेक्टर सर्टिफिकेट" ?


आज कॅरेक्टर सर्टिफिकेट सर्वश्रुत आहे. बऱ्याचदा नोकरीच्या संदर्भात याची गरज पडते. पण कधीकाळी याच सर्टिफिकेटची गरज प्रत्यक्ष एका इंग्रज गव्हर्नर जनरल ला पडावी म्हणजे आश्चर्य.!

होय पहिल्या इंग्रज मराठा युद्धात (१७७४-१७८३) इंग्रजांनी हार खाल्ली. मारच खाल्ला म्हणा! मराठ्यांचा विजय झाला! 

धूळ'धाण उडालेल्या या युद्धात इंग्रजांना विलक्षण खर्च आला. इंग्रजांना युद्धाचा काहीच लाभ झाला नाही. मग उद्या विलायतेत परत गेल्यावर कंपनीचे डायरेक्टर आपल्याला जाब विचारतील, "सांगा काय म्हणून युद्ध ओढवून घेतले आणि काय लाभ झाला..???"

या चिंतेने गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींग हा अस्वस्थ झाला होता. स्वतःच्या बचावासाठी त्याने काय करावे बरे...? कोणती पूर्वतयारी करावी...?

तर त्याने ठरवले की आपण कंपनीच्या डायरेक्टर्स समोर आपल्या चांगले पणाचे कॅरेक्टर सर्टिफिकेट प्रस्तुत करावे!!!

नाही का गंमत.!

त्यासाठी या गव्हर्नर जनरल ने महादजी शिंदे यांना फार विनंती केली, की कृपा करून मला एक कॅरेक्टर सर्टिफिकेट द्या..!!!

"मी भला माणूस आहे आणि भांडण पेशव्यांनी उकरून काढले म्हणून मला लढने भाग पडले!"

यावेळी अखिल हिंदुस्थानाचे राजकीय आणि सामरिक नेतृत्व महायोद्धा महादजी शिंदे यांच्याकडे होते. शिंदे यांनी वॉरन हेस्टींग ची विनंती धुडकावून लावली.! प्रस्तुत माहिती आपल्याला शिंद्यांच्या दरबारातील इंग्रज रेसिडेंट चा मुन्शी खैरुद्दिन यांनी लिहिलेल्या इब्रतनामा या ग्रंथात आणि पुना रेसिडेन्सी रेकॉर्ड मध्ये मिळते.

असो,

एका इंग्रज गव्हर्नर जनरल ने महादजी शिंदे यांना माझ्या भलेपणाचे सर्टिफिकेट द्या म्हणून विनंती करावी हा इतिहासातील मोठाच राजकीय विनोद.!

छत्रपती शिवशंभु नंतर बाजीराव आणि पश्चात महादजी शिंदे याच इतिहास पुरुषांमध्ये इतिहासाची आश्चर्ये आणि शत्रूंशी विनोद करण्याचे सामर्थ्य होते.!!!


म्हणूनच इतिहास वारंवार खानाचा फाटलेला कोथळा, शास्ताची छाटलेली तीन बोटे, सुरतेची धुरवळ!!!


लक्षावधी सैन्याचा अधिपती औरंगजेब याच्याशी दोन हात आणि भर दरबारात त्याला उतरवा लागलेला मोगल साम्राज्याचा कीमोश!!!


निजामाची धुळदान आणि मोगलांचे स्मशान !!!

आधुनिक युद्धतंत्र आणि शस्त्राचा उतरवलेला माज आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट चा मान.!!!

हे आम्हास जरी वारंवार सांगत असला तरी आमचे आश्चर्य अभिमान आणि आत्मविश्वास तसाच वाढीस जातो..!

हिंदुस्थानाच्या दिलेरजंगी महायोद्ध्यांना शतशः प्रणाम...!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

#mahadajiscindhiya, #faktitihas, #warrenhastings

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts