Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

मन-समझावंन: अर्थात शहातुराब यांचे मनाचे-श्लोक


सुमारे सव्वा तिनशे वर्षांपूर्वी शहा तुराब चिस्ती या सुफि कवीने समर्थांच्या 'मनाच्या श्लोकांचे' उर्दू भाषेत रूपांतर केले ते म्हणजे "मन-समझावंन"
सुफि संत शहा तुराबी यांच्या पाच ग्रंथांचा उल्लेख सापडतो.
१- ग्यानस्वरूप, २- मन-समजावंन, ३- जुहूरेकुली (सर्वसाक्षात्कार),
४- गुलझारे वहदत (अद्वैत सुमन), ५- रणंजुल असरा (रहस्य भांडार)

यापैकी मनसमजावंन हे समर्थांच्या मनाचे श्लोकाचे रूपांतर आहे.
गुरूच्या आज्ञेने शहा तुराब हे ठीक-ठिकाणी धर्म उपदेशाचे काम करीत असता भ्रमण करत तंजावरला पोहोचले. तंजावर येथे त्यांना मनाचे श्लोक या काव्याची प्रत मिळाली. शहा तुराब म्हणतात, ती पोथी (मनाचे श्लोक) वाचल्यावर माझ्या मनाचे कमळ प्रफुल्लित झाले, याचे रूपांतर करावे असे मला वाटू लागले'
तंजावरमें जीस दिन हुआ आके दाखिल सिताराम दासकी तो पोथी हे पाझिल ||
जवाब उसका केने हुआ शौक कामिल||

तंजावरला त्या काळात प्रतापसिंह राजेभोसले यांचे राज्य होते.(१७३९-६३)
त्यांचे राजगुरू सेतूभावस्वामी समर्थ शिष्य अनंतमौनी आणि मेरुस्वामी यांच्या परंपरेतील होत.
त्यावेळी त्यांचा मठ तंजावरमध्ये गाजत होता. सेतूभावस्वामी यांचे नाव हनुमंत स्वामी यांच्या बखरीत आले आहे. सज्जनगडाच्या मठाधिपतींच्या सांगण्यावरून सेतूभावस्वामी यांनी तंजावर येथून रामाच्या मूर्ती घडवून १७६३ च्या सुमारास त्या सज्जन गडाला पाठविल्या असा उल्लेख हनुमंत स्वामीच्या बखरीत मिळतो. 
शहा यांनी सेतूभावस्वामी यांच्यावरही स्तुतीपर कविता रचली आहे.
शहा तुराब काही दिवसांनी तंजावर सोडून तिरुवन्नामलाईला आले. भ्रमण करत जांब या गावी जात असताना मध्ये त्यांचे सन १७५० च्या सुमारास निधन झाले. त्यांनी रूपांतरित केलेल्या मनाच्या श्लोकांचे संपादन मुंबई विद्यापीठातील उर्दू भाषा विभागाचे प्रमुख डॉ. अब्दुल सत्तार दळवी यांनी सन १९६९ मध्ये केले.

समर्थ रादासस्वामी यांनी दासबोध-मनोबोध- आत्माराम, अभंग या स्वरूपात ग्रंथाद्वारे भक्तिबोधाचे प्रसारकार्य केले. त्यापैकी मनोबोधात त्यांनी २०५ श्लोक लिहिले असून ते ‘मनाचे श्लोक’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांत ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ अशा बिरूदावलीचे दहा श्लोक असून साधना कशी करावी, या विषयीचा उपदेश समर्थानी केला आहे.


'प्रभाते मनी राम चिंतीत जावा' ह्या श्लोकाचे रूपांतर शहा तुराब करताना म्हणतात-
सिफन (स्तुती) कर अवल (प्रथम) उसकी जो राम है गा।
उसी नाम के संग संग्राम है गा।
सदा राम के गाम सौं काम है गा।
हमे ध्यान उसका सुबह शाम है गा।

नको राम को ढूंढ चमन चमन में (बाग)|
न समुदर (समुद्र) मे है सातो गगन में|
जगा ज्योत उसकाच है सब सखन में (चेहरा)|
भऱ्या आत्माराम हर एक के तन में|
अलक नाम दिखता है मेरे नयन में|
है सारा सकत (शक्ती) सब गुरु के चरण में|

-परमेश्वर हा सर्वत्र आहे. याला अनेक नावांची हाक मारतात. कुणी अल्ला म्हणतात, कोणी राम म्हणतात. परंतु तो एकच आहे आणि त्याच्या नजरेत सगळे एकच आहेत. त्याला बाहेर शोधत काय बसता? तो तुमच्यामध्येच भरलेला आहे. गुरु च्या कृपेने तुम्हाला दिव्य ज्ञानाचा लाभ होईल आणि आत्मबोध होईल.

मनाच्या या श्लोकात मनाला उद्देशून उपदेश केलेला आहे तसाच प्रकार मन-समझावन या काव्यात आहे. जग हे नश्वर आहे, ऐहिक वस्तूत गुरफटून राहणे शहाणपणाचे नाही.परमेश्वराचे ध्यान करावे तू सर्व चराचरामध्ये भरलेला आहे.

जसे शहातुराब म्हणतात-

नही जिस कने खास हौर आम है गा |
वही साकिये बज्मे गुल्फाम है गा |
-परमेश्वरा पाशी हा मोठा हा लहानसा भेद नाही असा तो सृष्टीचा नियंता आहे.

अरे मन! उसे क्या है दुनिया का झांशा
लिया हाथ मे भीक का जिन्हे कांसा
अर्थात-
अरे मना, ज्याने आपल्या हातात भिक्षापात्र घेतले त्याच्या नजरेत या प्रपंचाचे लफडे कुठे आहे.?

अहे नाम साहब जलालो जमाल |
अर्थात-
तो अति सुंदर आणि तेजस्वी आहे.

अंधारे सौ करता हमेशा उजाला |
अर्थात-
तो अंधार दूर करतो.

न वो सब्ज न वो जर्द न वो सुर्ख काला |
अर्थात-
तो हिरवा नाही पिवळा नाही लाल नाही व काही नाही तो निर्गुण आहे.

अकल वो निरंकार निर्गुण निरंजन करे जंतर (जीवजंतू) सदा जिसके सुमरण।

शेवटी शहा तुराब म्हणतात-

डटा कहने वहदत (अद्वैत) में ऐं यार घोडा ।
ऐ दारउलफ्फनाह (नश्वर) सेतें मोहीन मोडा ।
परम पाक जुन्नार (जानवे) जिस वक्त तोडा |
उसी वक्त तसबिह (स्मरणी) मुसल्ले को (नमाजाची चादर) छोडा |
अर्थात-
अद्वैताच्या मैदानात आम्ही आमचा घोडा दौडवीला. ऐहिक गोष्टीपासून आम्ही मन फिरविले. सारांश ज्यादिवशी आम्ही पवित्र यज्ञोपवीत तोडले त्याच दिवशी आम्ही समाजाची चादर आणि स्मरणी फेकून दिली.

मन-समझावन काव्याचे असे हे स्वरूप आहै. समर्थांच्या मनाचे श्लोकाचे ते हुबेहूब भाषांतर नसले तरी शहा तुराब यांनी हे काव्य लिहिताना समर्थांचा मनोबोध समोर ठेवला आहे.

समर्थांच्या काव्याचा फार मोठा प्रभाव शहा तुराब यांच्यावर पडलेला आहे. तो इतका की दक्षिणी उर्दूमध्ये लिहिलेल्या आपल्या काव्यात त्यांनी हिंदु तत्वज्ञानपर शब्दांचा मुक्तपणे वापर केला आहे. ते स्वतः म्हणतात,' मी रामदासांच्या पोथीवर भाष्य करून मनोबोधाची गुढ दक्षिण भाषेत उकलले आहे.
ऐ उस्की मनकी कोधिका जवाब है
के जिसका रामदास जगमे किताब है।।
मराठी बातमे कोथी ओ बोल्या
मै उसका रग्झ सब दखनि मे बोल्या।।
भी उसका नाम मन समजावंन राखा
लेकिन सर बसत हिंदी है बाखा।।
-मन-समझावंन।।
llफक्तइतिहासll



प्रभू श्रीरामचंद्रचा एक भक्त-दारा शिकोह वाचण्यासाठी क्लिक करा-
दारा शिकोह 

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts