Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

"राजेश्री साहेबांचे शासन "





सन १६८१ मध्ये स्वराज्यात बादशहा आपल्या लक्ष फौजेसह दाखल झाला होता. स्वराज्यातील सरदार-वतनदारांना मनसबीचे अमीष देऊन तो आपल्याकडे खेचत होता. असेच बादशहाच्या अमीषाला अक्टोबर १६८५ मध्ये पून्याजवळील कारी चे सर्जेराव जेधे हा बळी पडला. याचा बाप कान्होजी जेधे हा शिवाजीमहाराजांचा एकनिष्ठ वतनदार होता. अफजलखान चालून आला त्यावेळी त्याने महाराजांची साथ सोडली नव्हती. पण त्याचा मुलगा सर्जेराव मोगलांस फितूर झाला. पण लवकरच पुणे भागात मोगलांचा पराभव झाल्याने तो पून्हा आपल्या वतनासाठी राजांचा काैल मागू लागला. त्यावर संभाजीराजांनी त्यास एक खरमरीत कानउघडणी करणारे आज्ञापत्र पाठविले. ते असे-

'....तरी तुम्ही आपला मुद्दा स्वामिचे सेवेसी लिहीला. त्यावरून हे आज्ञापत्र तुम्हास लिहिले. तरी आधी तुम्हीच सरासरी हरामखोरी केली की, वतनदार होऊन इमाने इतबारे वर्तावे ते गोष्ट न करीता स्वामिचे अन्न बहुत दिवस भक्षिलें. त्याचे सार्थक केलेत की स्वामिंच्या पायाशी दुर्बुद्धी धरून दोन दिवसांचे मोगल त्यांकडे जाऊन राहिलेस....याउपरीही गनिमाकडे राहणेच असेल तरी सुखे राहणे. तुमचा किसाब तो काय? ए क्षणी स्वामि आज्ञा करीतात तरी गनिम देखिल तुम्हास कापुन काढील हे बरे समजणे. हुजूराती खेरीज दुसरीकडे राबीता न करणे. जे वर्तमान लिहीणे ते स्वामिस लिहीत जाणे. तुमचे ठाई एकनिष्ठताच आहे ऐसे स्वामिस कळलियावरी जे आज्ञा करणे ते करून आज्ञापत्र सादर होईल. तेणेप्रमाणे वर्तणुक करणे...'

अर्थ-आमचे राज्यात जगला, वतन चालवले आणि आता दोन दिवसांच्या मोगलांना जाऊन मिळाले,सरासरी हरामखोरी केली. तुमची हस्ती ती काय? यावेळी आम्ही मनात आणलेच तर गनिमसुद्धा तुम्हाला कापून काढेल...
-संदर्भ: संभाजी कालीन पत्रसारसंग्रह

प्रस्तुत पत्रातून एका तेजस्वी आणि करारी शासकाची प्रतीमा बघावयास मिळते. स्वराज्यात पाच लाख मोगल उतरले तरी राजांचा निर्धार मोठा होता. तेथे निराशेचा लवलेशही नव्हता खासच.!
|| फक्त इतिहास||

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts