Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

मार्मिक भाष्यकार भिमसेन सक्सेना...


औरंगजेब बादशहाच्या अनेक चरित्र लेखकांपैकी भिमसेन सक्सेना हा एक फारसीत लिहणारा राजस्थानी लेखक होता.
शिवाजी महाराजांच्या साल्हेर विजयाचा, आग्र्याला जातांना औरंगाबादेस सपशिकनखानाशी झालेल्या भेटीचा, महाराजांनी मोगलांविरोधात कुतूबशाही व आदिलशाहीशी केलेल्या 'दख्खन युतीचा' तो साक्षिदार.
संभाजीराजांच्या बलिदानानंतर संताजी, धनाजी, नेमाजी यांच्या झंझावाती मोहिमा, जिंजीचा वेढा आणि मोगलांची किल्ले घेण्यासाठीची चाललेली धावपळ तो बघत होता.
आपल्या 'तारिके दिल्कुशा' या ऐतिहासिक फारसी ग्रंथात मोगल-मराठ्यांच्या युद्धाचा इतिहास लिहतांना तो बादशहावरही मार्मीक भाष्य करून जातो. तसे तो दतियाचा राजा राव दल्पत याच्या नोकरीत होता. राव दल्पतने त्याला दतियाकडे काही जहागिरी दिल्या होत्या. मात्र युद्धाच्या धामधुमीमुळे सन १७०० च्या सुमारास तो आर्थीक हालाखित होता. ऐके ठिकाणी तो लिहतो-
माझे उत्पन्न येईनाशे झाले. माझी दशा वरवर पा हता खालावली होती; पण मी ते मनाला लावून घेतले नाही. मला पूर्वीही पैशाचा लोभ नव्हता आणि आताही नाही. माणसे पैशाकडे पाहात नाहीत, नावलौकीकाची चाड ठेवतात. जो कीर्ती आणि नाव कमावण्याची ईच्छा धरतो तो खरा मर्द होय. माझ्या अनुभवावरून मला दिसून आले, की साधन सामग्री नसतानाही हिंमतीने वागणे हेच भूषणावह आहे.
फारसी कवीता-
हिंमत बलंद दार के निन्दे खुदा व खल्क
बाशद बकद्रे हिंमते तू एतिबारे तू"

माणसे अतिशय लोभी असतात हे माझ्या पाहाण्यात आले. आता आलमगीर बादशहाच पाहा. त्याला जगात काय कमी आहे बरे ! पण किल्ले जिंकून घेण्याचा काय विलक्षण लोभ त्याला आहे. दगडधोंड्यांच्या ढिगाऱ्यासाठी (किल्ल्यांसाठी) तो पाहा कसा रानोमाळ भटकत आहे. ही जर त्याची स्थिती तर जगात बहुसंख्य असलेल्या कमीबुद्धिच्या लोकांची कथा काय ?
|| फक्तइतिहास ||
http://www.faktitihas.blogspot.in

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts