Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

शिवाजी महाराजांचे मोगलांस उत्तर"


मित्रहो, लंडनच्या राॅयल एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथात एक फारसी हस्तलिखित आहे. या ग्रंथाचे नाव " खुतूते शिवाजी " म्हणजे शिवाजीची पत्रे असे आहे. या हस्तलिखिताची आणखी एक प्रत कलकत्ता येथील एशियाटिक सोसायटीत आहे.  सर जदुनाथ सरकार यांनी त्याची प्रत तयार करून आपल्या संग्रही ठेवली. तीची फोटो प्रत मुंबईच्या सरकारी दप्तरखान्यात आहे. यात 32 पत्रे आहेत. त्यातील एक पत्र शाईस्ताखानाची बोटे छाटल्यानंतर महाराजांनी औरंगजेब बादशहाच्या अधिकार्‍याला लिहलेले येथे सादर करीत आहे.

दूरदृष्टीच्या विचारवंतांना ही गोष्ट माहीत असावी की , गेली तीन वर्षात बादशहाचे प्रसिद्ध सेनापती या भागात येत आहेत. माझा मुलूख व किल्ले जिंकून घ्यावेत अशी बादशहांने त्यांना आज्ञा केली. अपार कष्ट रूपी घोड़ेदेखिल माझ्या या मुलूखात फिरू शकत नाहीत...
अदिलशहाकडून अफजलखान प्रचंड सैन्यानिशी आला. तो असमर्थ बनून नाश पावला. ही वस्तूस्थिती तुम्ही बादशहाला का कळविली नाही..? यामुळे तुमचा नाश टळेल.

अफजल नंतर अमीरूल शाईस्ताखान हा माझ्या उंच पर्वतांनी व खोल दर्यांनी युक्त अशा प्रदेशावर चालून आला. तीन वर्षे त्याने पराकाष्ठा केली. मी शिवाजीचा मुलूख जिंकून घेईन, असे त्याने बादशहाला कळविले. अशा खोट्या वृत्तीचा व्हायचा तोच परिणाम झाला. फजिती होऊन त्याला निघून जावे लागले. ही गोष्ट सूर्यप्रकाशाईतकी स्पष्ट आहे.

माझ्या देशाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य होय.स्वत:ची प्रतिष्ठा कायम राखण्याकरीता तुम्ही बादशहाला खोटे लिहून पाठवता. पण माझ्यावर परमेश्वराची कृपा आहे. या देशावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने येणारा कोणीही असो. त्याची ईच्छा फलद्रुप झाली नाही....

रक्ताच्या या नदीची भिती सर्व शहाण्यांना वाटते , कारण यातून आपली नाव सुरक्षित नेणे कुणालाच जमले नाही...... ! "

असे हे पत्र बादशहाच्या सेनापतींची परखडपणे कानउघडणी करणारे असून महाराजांचा स्वाभिमान व आत्मविश्वास व्यक्त करणारे असे आहे.
संदर्भ- खुतूते शिवाजी

||फक्तइतिहास||

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts