Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

पानिपताच्या मसलती: नजीब उद्दौल्याचे कारस्थान आणि अयोध्येचा नवाब..


मित्रांनो, मागील मसलतीत भाऊ आणि भाऊचे सरदार व सुरजमल यांच्या मसलतीचा भाग आला आहे. काशीराज पंडित जो अयोध्येचा नवाब सुजा उद्दौला याचा कारभारी होता तो पुढे आपल्या ग्रंथात म्हणतो-

“..भाऊने राजा सूरजमलच्या बडदास्तीकरिता फौज नेमून दिली. यामुळे राजा सूरजमलला चिंता उत्पन्न झाली.

मल्हारराव वगैरे सरदार त्याला म्हणाले, "घाई उपयोगाची नाही. योग्य वेळी जे करायचे ते करा. तूर्त भाऊच्या मर्जीस अनुसरून राहाणे योग्य होय."

या नंतर भाऊ अकबराबादेहून (आग्रा) कूच करून शहाजहानाबादेस पोहोचला. अहमदशहाचा वजीर शहावलीखान याचा नात्याने चुलत भाऊ असलेला याकूब अलीखान हा बादशाही किल्ल्यात होता. भाऊने एकदम

किल्याला वेढा घातला आणि किल्ला खाली करून या म्हणून सांगून पाठविले. आपापसात काही काळ गोळागोळी झाली. शेवटी याकूब अलीखानाला आपण टिकू शकू असे वाटेना. त्याने शहावलीखानाचा सल्ला घेतला. आणि

सरदारांच्या मार्फतीने बोलणी लावून तो किल्ल्याच्या बाहेर पडला. भाऊ आणि विश्वासराव हे किल्ल्यात बाखल झाले. बऱ्याच बादशाही वस्तू त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या. दिवाणेखासचे छत चांदीचे होते ते त्यांनी तोडले. आणि त्याची नाणी पाडली. भाऊने अशाच इतर काही गोष्टी केल्या. लोक बोलू लागले की भाऊचा हेतु असा दिसतो की हिंदुस्थानातील काही सरदार आणि नवाब यांना काढून टाकावे. आणि अहमदशहा राहाणार नाही. मग विश्वास रावाला दिल्लीच्या तक्तावर बसवावे. या गोष्टी तोंडी आणि वकीलांच्या पत्रव्यवहाराने शुजाउद्दौल्यापर्यंत पोहोचल्या होत्या. त्याप्रमाणे येथे लिहिल्या आहेत.

नंतर पावसाळा सुरू झाला. भाऊने शहाजहानाबादेत छावणी केली. तो स्वतः किल्ल्यात राहिला. त्याचे सैन्य बारा कोसपर्यंत ठिकठिकाणी पसरले होते. इकडे अहमदशहाची छावणी अनूपशहरजवळ गंगेच्या काठावर होती. नजीबुद्दौल्याला चहूकडची बातमी मिळत असे. त्याने सगळी हकीकत शहा बुराणीला कळविली. शहा दुराणी म्हणाला की शुजाउद्दौल्याला सर्वप्रकारे समाधान करून इकडे आणणे योग्य होय. असे न होवो की तो दुसऱ्या पक्षाला जाऊन मिळाला. त्याने आपल्या बरोबर मोठे सैन्य आणले काय किंवा लहान आणले काय त्याच्यावर काही अवलंबून नाही. तो कदाचित अनुकूल राहणार नाही. माझ्या हिंदुस्थानावरील सुरुवातीच्या मोहिमेत त्याचा बाप सफदरजंग आणि मी यांच्यात काही घटना घडल्या होत्या. त्यात माझे पाय टिकले नाहीत, याची जाणीवही शुजाउद्दौल्याला असून याची त्याला काळजी लागली आहे. तू स्वतः जाऊन शुजाउद्दौल्याचे समाधान करून माझ्यापाशी घेऊन ये. हे काम पत्रव्यवहाराने किंवा वकील पाठवून होणारे नाही. तू स्वत: तडक जाऊन शुजाउद्दौल्याला वजीर शहाबलीखान याने कौलकरार करून, त्याचे शिक्कामोर्तब करून कुराणाच्या प्रतीबरोबर शुजाउद्दौल्याने देण्याकरिता नजीबुद्दौल्ल्यापाशी दिल्या. नजीबखानाने आपल्याबरोबर दोन तीन हजारांचे सैन्य घेतले आणि तो तीन चार दिवसात मेहदी घाटापाशी गंगेवर पोहोचला. शुजाउद्दौल्याने सगळ्या गोष्टीला जागरूक राहाण्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टिने गंगेवर आपली छावणी ठेवली होती. गंगेच्या पलीकडील तीरावर नजीबुदौला एकाएकी आलेला पाहून शुजाउद्दौल्याने निरुपाय होऊन त्याची भेट घेतली. आणि त्याचा पाहुणचार केला. नजीबुद्दौल्याने शहा दुरण्णी आणि शहावलीखान यांनी लिहिलेली पत्रे आणि करारमार शुजाउौल्यापाशी दिली, आणि आपल्यातर्फे आणि शहा दुराणीच्या तर्फे समाधानाच्या गोष्टी सांगितल्या आणि जगात नेहमी कधी वर तर खाली असा अनुभव कसा येतो हे त्याला सांगितले. आणि म्हटले "मी तर स्वतःची आशा जवळ जवळ सोडली आहे. कारण भाऊ हा माझा शत्रू आहे. पण तुम्ही स्वतःच्या बचावाची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या पक्षाशी संघटण ठेवावे. भाऊ हा मुसलमानांचा मनःपूर्वक द्वेष करतो. त्याला शक्य झाले तर तो तुम्हाला काय आणि आम्हाला काय, कुणालाच सोडणार नाही. नशीबात जे व्हावयाचे ते होईल हे जरी खरे असले तरी आपल्याला शक्तीप्रमाणे हात पाय हलविणे हेच योग्य होय. केवळ स्नेहभावाने मी येथपर्यंत आलो आहे. तुम्हाला जे योग्य होईल असे वाटते ते करा."

मराठ्यांशी आपले संबंध आहेत. अब्दालीचा पक्ष सोडून देण्यातही शहाणपणा आणि दूर दृष्टी दिसून येत नाही. अशा प्रकारे त्यांचे संभाषण चार दिवसपर्यंत चालू होते. शेवटी शुजाउद्दौल्याने विचार केला की एकीकडे नजीबुद्दौला हा स्वत: येथे आला आहे. तो निराश होऊन येथून गेला तर शहाची नामुष्की झाल्यासारखे होईल. उलट मराठ्यांचे आणि आपले निकटचे संबंध आहेत. मराठ्यांचा जय झाला काय किंवा दुराणीचा झाला काय काळजीची परिस्थिती निर्माण होईलच. त्याने बेगमांना लखनौला रवाना केले. बेणी बहादुर यास आपल्या तर्फे राज्यावर नायब म्हणून नेमले. नंतर त्याने पूर्ण विचार करून आणि नजीबुद्दौल्याचा मान राखून शुजाउद्दौल्याने शहा दुराणीकडे जाण्याचा निश्चय केला नजीबुद्दौल्याला घेऊन कूच केले. अनूपशहर जवळ तो अहमदशहाला भेटला. अहमदशहाने त्याचा सत्कार केला, आणि त्याला म्हटले "मी तुला आपला मुलगा मानतो. तुझीच वाट पाहात होतो. आता पहा मराठ्यांचा धुव्वा कसा उडवितो ते." अहमदशहाने शुजाउद्दौल्यावर कृपेची वृष्टी केली. त्याने आपल्या फौजेत आज्ञा जाहीर केली की मोगल सफदर जंगाचा मुलगा शुजाउद्दौला हा आमच्या घराण्याचा खास पाहुणा आहे आणि मला आपल्या मुलापेक्षाही

शुजाउद्दौल्याच्या फौजेशी कोणीही भांडण करू नये. कोणी असे करील तर त्याचा वध करण्यात येईल. हा ईराणी अधिक प्रिय आहे. वजीर शहावलीखान हा सत्तर वर्षे वयाचा अत्यंत अनुभवी इसम होता. तो शुजाउद्दौल्याला आपला मुलगा म्हणे. त्यानेही शुजाउद्दौल्याचा बहुत आदरसत्कार केला. शुजाउद्दौल्याच्या छावणीत काही दुराणी शिपायांनी दांडगाई केली त्याबद्दल अहमदशहाने दोनशे शिपायांना शिक्षा केली. यानंतर कुणालाही दांडगाई करण्याची हिंमत झाली नाही.

ऐन पावसाळ्यात अहमदशहाने कूच केले. दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या समोर नदीच्या अलीकडील तीरावर त्याने छावणी केली. मराठ्यांची फौज नदीच्या पलीकडे होती. पावसाळ्याचे दिवस आणि नदीला पूर आलेला.

उभय दळापैकी कुणालाही नदीपार करणे शक्य झाले नाही.

भवानीशंकर हा औरंगाबादचा राहाणारा असून बुद्धिमान आणि चतुर होता. सदाशिव भाऊने त्याच्याबरोबर पत्र देऊन त्याला शुजाउद्दौल्याकडे पाठविले. त्यात त्याने लिहिले की तुमच्या आणि आमच्या घराण्यात स्नेह

चालत आला आहे. आमच्या सरदारांनी तुमच्या वडिलांना मदत केली आहे. तुम्ही प्रस्तुत प्रसंगी त्यांच्यांत का जाऊन मिळाला आहात. आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारे तसदी देऊ इच्छीत नाही. काही करा पण त्या पक्षाला मिळू नका. जर हे जमत नसेल आणि त्यांच्यापासून वेगळे राहाणे शक्य होत नसेल तर कुणाला तरी आमच्याकडे बोलणी करण्यासाठी पाठवा. दिल्लीचा रहिवाशी लाला संताराम याचा मुलगा राजा देवीदत्त हा उत्तम भाषण करणारा

होता. त्याला शुजाउद्दौल्याने भवानीशंकर बरोबर भाऊकडे पाठविले. मी काशिराज नेहमी मरहूम नबाबांच्या म्हणजे शुजाउद्दौल्याच्या हुजुरात असे. माझ्यावर त्यांची कृपा असे. त्यांनी स्वतः भवानीशंकर पंडित यास सांगितले की हे (मी, काशिराज) पण दक्षिणचे आहेत. शुजाउद्दौल्याच्या समोरच माझी आणि भवानीशंकरची भेट झाली आणि आम्ही दोघेही एका जातीचे आणि एकाच गावाचे रहिवाशी आहोत हे आम्हाला समजले. मी शुजाउद्दौल्याच्या पदरी आहे ही हकीकत भवानीशंकराने सदाशिवभाऊस सांगितली. भाऊने माझ्याकरिता मराठीत पत्र पाठविले होते..”

मित्रांनो,

पंडित काशीराज यांच्या लेखणीतून पानिपत युद्धा पूर्वीच्या या मसलती आम्हाला कळतात. नजीबाचे कारस्थान ज्यात नवाब आपल्याच पक्षात मिळावा यासाठी त्यांने केलेली धार्मिक अर्जावे समजतात. याच प्रचाराचे प्रतिबिंब आजही आम्हाला बघायला मिळते.

असो,

सुरजमल जाट राजाप्रमाणे अयोध्येचा नवाब हा सुद्धा उत्तरेतील महत्त्वाचा मोहरा होता. अर्थातच तो आपल्या बाजूने असेल तर आपल्याला रसदेची कमी होणार नाही हे अहमदशहा अब्दाली समजून होता. म्हणून त्याने नजीब खानाला सुजाला आपल्या पक्षात आणण्यासाठी पाठविले होते. त्यात नजीब यशस्वी होतो. मात्र आपल्या बापाला सफदर जंगाला ज्या मराठ्यांनी मदत केली, आपण आज त्यांच्या विरोधात जात आहोत याची चलबिचल त्याच्या मनात सारखी होत होती. ही अस्वस्थता पानिपतच्या नंतरही कायम राहिली. अशी ही युद्धनीती, राजनीति आणि त्याचे कारण धर्मकारण..!

संदर्भ स्रोत: सेतू माधव पगडी

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts