Skip to main content

Posts

Featured

शिरपूर: कथा अदृश्य विष्णू मंदिराची..

पुराणात ज्याचा उल्लेख श्रीपूर असा येतो ते म्हणजे प्राचीन काळातील समृद्धशाली ऐतिहासिक नगर शिरपूर.! अगदी ब्रिटिश काळात जेथे पोलीस यंत्रणेचे प्रमुख ठाणे होते जे मालेगाव पूर्वीचे आहे.  शिरपूर येथील संत श्री जानगीर महाराज संस्थान, विश्वकर्मा मंदिर, प्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ आणि दिगंबर पवळी जैन मंदिर, तुकामाई समाधी मंदिर, श्री बसवेश्वर मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर, राम मंदिर, भवानी आई मंदिर, अमानशहा बाबाची दर्गा हे सर्वास ठाऊक आहेत. मात्र याच नगरात कधीकाळी सुंदर दगडी बांधणीचे विष्णू मंदिर होते असे म्हटले तर..! तर चला भूतकाळातील अदृश्य रुपी देवालयाच्या शोधात..! काही दिवसांपूर्वीच करंजी येथील मंदिराविषयी चर्चा करताना डॉ. विजय उल्हामाले यांनी शिरपूर येथे श्रीविष्णू मूर्ती सापडल्याचा उल्लेख केला. ऐकल्यावर मोठे कुतुहल निर्माण झाले. म्हणून ती मूर्ती व इतर अवशेषांचा शोध घेण्यासाठी दुसऱ्याच दिवशी(१२ मे) शिरपूर जाण्याची योजिले. कारण इतिहास अनुभवण्यासाठी भूगोल गाठावाच लागतो.! सकाळी शिरपूर येथील विष्णू मूर्तीच्या शोधात भवानी संस्थान शिरपूर येथे पोहोचलो. येथे आल्यानंतर मंदिराच्या प्रांगणात एका प्रचंड मोठ्

Latest Posts

जानेफळ: इतिहास पुरुषांच्या भेटीचा दुर्लभ योग..!

करंजी: एक दिव्य दुर्लक्षित इतिहास..

सासनम्: निर्वासितांना मिळालेल्या अधिकाराची गोष्ट...

मधुर आंब्याची कटू फळे..!

बादशहा आणि सह्याद्रीची कबर..!

पानिपताच्या मसलती: नजीब उद्दौल्याचे कारस्थान आणि अयोध्येचा नवाब..

पंडित काशीराज यांच्या जबानीतून पानिपताची मसलत..

पानिपताचे अंतरंग....

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..