Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

Belkund Bridge-१३९ वर्षे जुने ब्रिटिश स्थापत्य..

 


मित्रांनो, पावसाळ्यामध्ये पुणे मुंबई जवळ असलेल्या सह्याद्री मुलखात विकेंड हॉलिडे ला माणसे घाटामधील नयनरम्य धबधबे, वाहणारे सुंदर नाले बघायला जातात. मात्र आमच्या या सातपुड्यात सुद्धा भरभरून निसर्गसौंदर्य ओसंडून वाहत आहे. तेच सौंदर्य नजरेत टिपून घेण्यासाठी रोड ट्रिप म्हणून मेळघाटकडे निघालो.

अकोट नंतर पोपटखेड येथून साधारणपणे घाट रस्त्याची सुरुवात होते. हा रस्ता खटकाली मार्गे पुढे हरिसाल कडे जातो. डोंगरकड्यावरून अनेक वळणे घेत वाहणाऱ्या या रस्त्यावरून अनेक लहान मोठे धबधबे दिसतात. त्यासाठी ब्रिटिश काळात अनेक छोट्या पुलांची निर्मिती केलेली आहे. मात्र यापैकी सर्वात सुंदर दृश्य म्हणजे “बेलकुंड ब्रिज” होय.

ऐतिहासिक दगडी कमान असलेला पूल म्हणजे ब्रिटिश कालीन स्थापत्यचा एक दर्जेदार नमुना आहे.

दोन वर्षांपूर्वी मेळघाट येथे सेन्सर्स साठी गेलो असता या भागात फिरण्याचा योग आला मात्र उन्हाळा असल्याने निसर्गाचा आस्वाद घेता आला नाही. पण त्याच वेळी मनात ठरविले की भर पावसात कधीतरी हा स्वर्ग नजरेच्या टप्प्यात साठवून ठेवायचा. आणि आता या पावसाळ्यात तो योग आला. 

मित्रांनो,

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात येणारा हा १३९ वर्षे जुना पूल आहे.

१८८६ मध्ये बांधलेल्या या पुलाला रस्त्याच्या अधूनमधून पुनरुत्थान करण्याव्यतिरिक्त कधीही मोठ्या दुरूस्तीची गरज भासली नाही. त्याचा संपूर्ण पाया, दगडी रचना, भिंती वगैरे सर्व मूळ आणि आजही सुस्थितीत आहेत! 

बेलकुंड नाल्यावरील या पुलावरील एका दगडावर एक लोखंडी प्लेट आहे. पुलाचा अभियंता RW Swinnerion आणि पर्यवेक्षक देवनाथ सानज होते. विशेष म्हणजे, RW Swinnerion हे एक AMICE या 1818 मध्ये लंडनमध्ये स्थापन झालेल्या जगातील पहिल्या व्यावसायिक अभियांत्रिकी संस्थेचे (The Institution of Civil Engineers) (ICE) सहयोगी सदस्य होते.



दोन वर्षांपूर्वी सेन्सस च्या योगाने इकडे येणे झाले त्यावेळी ही लोखंडी प्लेट अर्धवट दिसायची. आता मात्र ती चिखलात कुठेतरी दबून गेलेली आहे. 

असो,

निसर्गाचा हिरवा शालू नेसलेल्या या सातपुड्याच्या डोंगर रांगा आणि त्यावरून लहान-सहान ओढ्याच्या स्वरूपात वाहणारी चंदेरी नक्षी म्हणजे अप्रतिम अविष्कार..! तुडुंब भरून वाहणारा बेलकुंड नाला आणि त्यावर दिसणारा रुबाबदार दगडी अंगाचा हा फुल साक्षीदार आहे इतिहासाचा..!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

#Belkund_bridge, #melghat

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts