Search This Blog
बाजे लष्कराच्या ये छावणीत आपले स्वागत असे हुजूर..
- छावणी
- सफर माझी स्थळांची
- अज्ञातवासातील बार्शी टाकळी येथील कालिंका देवी मंदिर जिल्हा अकोला
- अद्भूत साक्षात्कार- लोणार.!(जिल्हा बुलढाणा)
- कलेचा अप्रतिम नमुना साकेगाव येथील साकेश्वर मंदीर(जिल्हा बुलडाणा)
- भेट कवी कलश यांच्या वाड्याला(जिल्हा कोल्हापूर)
- कान्नव बंगला-कारंजा येथील एका पुराण पुरूषाची भेट(जिल्हा अकोला)
- किल्ले बाळापूर-शंभुराजांची वर्हाडातील जहागीर(जिल्हा अकोला)
- जेव्हा थडगं बोलू लागतं-वाशीम येथील एका ब्रिटिश कालीन SP'चे घाडगे(जिल्हा वाशिम)
- टोका येथील सिद्धेश्वर मंदिर-उत्तरेतील शिल्पकलेचा आविष्कार(जिल्हा औरंगाबाद)
- किल्ले बाणकोट-कथा सांगतोय आर्थर पॉईंट ची
- रेवदंडा व कोरलाई-पोर्तुगीज खंडारे नव्हे ती आमुची शौर्य प्रतीके(जिल्हा रत्नागिरी)
- भुलेश्वर-माळशिरस एक अप्रतिम अनुभव(जिल्हा पुणे)
- स्त्रीशक्तीचा शौर्य स्तंभ-राजुरा (जिल्हा वाशिम)
- श्रीवर्धन हरिहरेश्वर-एक नयनरम्य भेट!
- सातगाव भुसारी मंदिर समूह (जिल्हा बुलढाणा)
- केशवाची एक प्राचीन मूर्ती: कुपटा (जिल्हा वाशिम)
- गणपतीचा वाडा:मैराळडोह-शतकापूर्वीचा दिव्य संकल्प(जिल्हा वाशिम)
- अमृतेश्वर-रतनगडाजवळील शिल्पाविष्कार(जिल्हा नगर)
- अंतरिक्ष पार्श्वनाथ-शिरपूरचे दिव्यत्व (जिल्हा वाशिम)
- दख्खन तक्त: अर्थात भेट जिंजी किल्ल्याची
- शिवपराक्रमाचा साक्षीदार वेल्लोरचा भुईकोट
- मेहकर येथील मध्ययुगीन दत्त मंदिर (जिल्हा बुलढाणा)
- for new title
- सफर माझी दस्तावेजांची
- एक सहज चिंतन: महाराज आणि शाहिस्तेखान
- औरंगजेब बादशहा इराणच्या बादशहाकडे राजदूत पाठवतो तेव्हा..
- आग्र्याच्या दरबारात शिवशंभू
- 'अहकामे आलमगिरी' अर्थात आलमगिराची आज्ञापत्रे
- इतिहासातील दारूबंदीची एक गमतीदार गोष्ट
- मोहम्मद अली जिना यांचे शेवटचे दिवस
- एक होता रोमेल: दुसऱ्या महायुद्धातील एका तेजस्वी सेनापतीची कथा
- शिवछत्र साल भेटीतून पुण्यातील NDA चे बीजारोपण
- कोंडाजी फर्जंद: बेखोफ छत्रपतिचा दिलफेक योद्धा!
- गुलामितून मुक्ती
- चाकणचा वेढा आणि फ्रान्सचा व्यापारी
- राजश्री साहेबांचे शासन:छत्रपती शंभूराजांचे सर्जेराव जेधे यांना ताकीद पत्र.!
- छत्रपतींनी केला सप्तकोटेश्वराचे जीर्णोद्धार
- छत्रपती शंभुराजे विरचित बुधभूषण-||सरोवरस्य||
- कसा होता टिपू सुलतान..?
- बेइमानीची कथा सांगतो कोथळीगड
- पानिपताच्या अंतरंगातील काही..
- पानिपताचे आवतन देणारा थोर धर्मशास्त्रज्ञ शहावली उल्लाह
- दारा शिकोह: एक पुण्यस्मरण..
- दक्षिण दिग्विजयाचे राजकारण-परराष्ट्र धोरणाचा अनोखा नमुना
- निजामाची विनोदी कथा-हुक्का आणि कॉफीची
- पारगड-चंद्रसूर्य असेतो गड जागता ठेवा!
- रणधूरंदर बाजीराव-भूमि कठीण आणि आकाश दूर!!
- समर्थांचे मनाचे श्लोक आणि मन-समजावंन
- मुल्ला मसीहाचे फारसी रामायण
- युद्धाची बारूद शत्रूच्या गोटात-कुलमुखत्यार राणीयेसूबाई साहेब
- महाराज चीनकडे लक्ष ठेवून आहेत!!
- वडले राजिक-छत्रपती शंभुराजांची गोवा मोहीम!
- सकल शास्त्राचा निशा- राजा सरफोजी भोसले तंजावर
- छत्रपती शिवाजी महाराजांचे मोगलांना खरमरीत उत्तर!!
- शिवरायांची राजनीति शत्रू मध्ये भेद-शिवरायांच्या इंटेलिजन्सची एक कथा!
- कथा पिता-पुत्राची:रामपूरच्या चंद्रावत राजांची!
- वीर सावरकर-युद्धाची बारूद शत्रूच्या शिबिरात!
- समकालीन फारशी साधनातून घडणारे दिव्य शिवदर्शन!
- सावनूरचे नवाब माधवराव पेशव्यांचे मामा..?
- हे राज्य व्हावे ही श्रींची ईच्छा-३७१ वर्षापूर्वीचा दिव्य संकल्प!
- मार्मिक भाष्यकार भीमसेन सक्सेना
- Sub Tab
Featured
- Get link
- X
- Other Apps
कानडा राजा पंढरीचा: प्रवास कर्नाटक ते महाराष्ट्राचा
मित्रांनो,
श्रीविठ्ठल आणि त्याचे क्षेत्र पंढरपूर यांना महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सांस्कृतिक जीवनात आराध्य स्थान आहे. महाराष्ट्रातील संत परंपरे सारखीच संत परंपरा कर्नाटकातही आहे.
पंढरपूर आणि विठ्ठल यांच्यासंबंधी कर्नाटकातही इतिहाससंशोधकांनी भरपूर विवेचन केले आहे. कर्नाटकातील विठ्ठलाची शेकडो देवालये आणि मठामठातील असंख्य मूर्ती, शतकानुशतके कर्नाटकभक्तांची विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरकडे लागणारी रीघ..! मात्र विठ्ठल हा कर्नाटकाचा देव आहे असे जेव्हा कर्णाटकातील लोक आग्रहाने बोलू लागतात तेव्हा त्यांच्या या आग्रहामागे त्यांचे काय प्रतिपादन आहे हे पाहणे आवश्यक आहे. अर्थात पंढरीचा राजा 'कानडा' कसा..? हे जाणण्यासाठी या विषयावर कर्नाटकात जे संशोधन झाले आहे त्याविषयी..
तर,
पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचा उल्लेख पंढरी, पांडुरंग, पंढरीनाथ, विठोबा वगैरे नावांनी होतो. विठ्ठल हे विष्णूच्या अनेक रूपांपैकी एक रूप आहे. कृष्णावताराशी विठ्ठलाचा संबंध जोडण्यात आला आहे.
श्रीक्षेत्र पंढरपूर महाराष्ट्र-
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे देवालय भव्य आहे. देवालयाच्या पूर्व भागात महाद्वार असून, महाराष्ट्रातील संतश्रेष्ठ नामदेव याच्याशी निगडित असलेली 'नामदेवाची पायरी' याच ठिकाणी आहे.
विठ्ठलाची मूर्ती पाहता, स्कंदपुराणातील पुंडरीकपूराच्या विठ्ठलाशी ही मूर्ती जुळते. बृहन्नारदीय पुराणात पंढरपूर नावाचे संस्कृतीकरण होऊन त्याला पांडुपूर असे म्हटले आहे. अशाप्रकारे पंडरिगे या नावाचे पांडुरंग असे नाव झाले.
विठ्ठलाच्या मूर्तीचे शिल्प हे विदिशा येथील गुप्तकालीन शिल्पाशी मिळतेजुळते आहे. पण एवढे जुने नसावे. विठ्ठल आणि रुक्मिणी ही एकमेकांच्या शेजारी नाहीत. रुक्मिणीचे देऊळ जवळच पण वेगळे आहे. पंढरपुरातील दुसरे प्रमुख देवालय चंद्रभागा पात्रातील पुंडलिकाचे होय. भक्तश्रेष्ठ पुंडलीक याची येथे समाधी आहे. पुराणातून पुंडलिकाची आख्याने आली आहेत. त्यापैकी एक असे:
पुंडलीक हा आपल्या स्त्रीच्या सहवासात मग्न होऊन वृद्ध मातापितरांची सेवा करण्याकडे दुर्लक्ष करू लागला. उलट रोहिदास नावाचा संत हा सदैव आपल्या आई-वडिलांच्या सेवेत मग्न असे. त्या वेळी गंगा, यमुना, सरस्वती या तिघी त्याच्यावर संतुष्ट होऊन त्याच्या घरची कामे करू लागत. रोहिदास संत-महतीची ही कथा ऐकून पुंडलिकाला पश्चात्ताप झाला. तोही आपल्या वृद्ध मातापित्यांची मन:पूर्वक सेवा करू लागला. या त्याच्या तपस्येने संतुष्ट होऊन विठ्ठल प्रगट झाला. पण मातापित्यांची सेवा पूर्ण होईपर्यंत तू वाट पाहत राहा, असे म्हणून पुंडलिकाने विठ्ठलाला विटेवर उभे केले. विठ्ठलाने पुंडलिकाला वर दिला.
या वेळेपासून भक्तजनांसाठी म्हणून विठ्ठल हा पंढरपूर येथे विटेवर उभा आहे. 'पुंडलीक वरदा' हे नाव विठ्ठलाला या वेळेपासून मिळाले. पुंडलीक हे नाव महाराष्ट्रात आणि कर्नाटकात चांगलेच रूढ आहे. इतर नावे (पांडुरंग, पंढरी) ही विशेषणे असली तरी रूढ झाली आहेत. पुंडलीक हे भक्ताचे नाव तर पंढरी व पांडुरंग ही क्षेत्राची नावे होत.
पूर्वी भक्त हे विठ्ठल मूर्तीला आलिंगन देऊ शकत असत. इ.स.१८७३ मध्ये गोसावी वेषधारी दुष्टांनी
आलिंगनाचे निमित्त करून मूर्तीला खाली पाडले आणि तिची मोडतोड केली. त्या वेळेपासून देवाला आलिंगन देण्याची पद्धत बंद केली आहे.
विठ्ठलाची व्यवस्था बडवे नावाच्या मंडळीकडे असते. देवळाच्या व्यवस्थेत भाग घेणारी इतर मंडळी म्हणजे सेवाधिकारी. यात पुजारी, बेनारी (मंत्रपठण करणारे), परिपाचक, डिंग्रे (पुराण सांगणारे), दिवटे (दिवटी धरणारे), दिंडे इत्यादीचा समावेश होतो. याशिवाय हरिदास हे संगीतयुक्त स्तोत्रे म्हणत असतात.
विठ्ठल हा कन्नडचा देव-
एके काळी पंढरपूर हे कन्नड राज्यात होते. (राष्ट्रकूट व उत्तर चालुक्य) कर्नाटकात विठ्ठल भक्ती ही प्राचीन असून निदान सहाव्या शतकापासून चालू होती. वैष्णव पंथात विठ्ठल भक्तीचा प्रसार हा निदान नवव्या शतकापासूनच समजावा लागेल. माध्व संप्रदायातील गायक संत हे एकूण एक विठ्ठलभक्त होते. ते पंढरपूरचे वारकरी दिसतात. त्यांना गायक संत (हरिदास) अशी संज्ञा प्राप्त झाली.
या विषयासंबंधी संशोधकांचे (कर्नाटकातील) हे काही विचार पाहा : विठ्ठल हा काही संस्कृत शब्द नव्हे. संस्कृतमधील विष्णू या शब्दाचे प्राकृतमध्ये विष्णू, विष्णुह, वेष्णुह, वेढा असे होत गेले. कन्नड भाषेत हेच रूपांतर विट्टी, विट्टिगा, बिट्टा असे होते. होयसळ राजा विष्णुवर्धन हा पूर्वी बिट्टीदेव या नावाने ओळखला जाई. त्याचे खरे नाव विठ्ठलराय देव असे होते. याचा भाऊ वीरबल्लाळ याने विष्णुदेवाला आपल्या भावाच्या नावावरून विठ्ठलदेव असे संबोधिले व भक्तश्रेष्ठ पुंडलिकाने हे देवालय (पंढरपूरच्या विठ्ठलाचे) बांधले असावे असे महाराष्ट्रातील संशोधक डॉ. माटे हे आपल्या 'टेंपल्स अँड लीजंड्स ऑफ महाराष्ट्र' (महाराष्ट्रातील देवालये आणि दंतकथा) या ग्रंथात सुचवितात, असा उल्लेख श्री. एस. के. रामचंद्र राव यांनी आपल्या 'पुरंदरदाससाहित्यदर्शन' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत केला आहे.
कन्नड शिलालेख आणि दानपत्रे यातून विट्टा, विट्या, ही नावे आढळतात. याचे एक उदाहरण म्हणजे 'साउथ इंडिया इन्स्क्रिप्शन्स' या ग्रंथातील इ. स. ९५९-६० हा शिलालेख पाहावा.
काशिनाथ उपाध्ये यांनी 'विठ्ठल ऋग्मंत्र सारभाष्य' या ग्रंथात विठ्ठल या शब्दाची व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न केला आहे : विट्+ठ+ल = वित्त वेदनं ज्ञानं, तेन ठा: शून्यः, तानलाती स्वीकारोति. अर्थात असा त्यांचा तर्क आहे.
पंढरपूराचे मूळ-
पंढरपूरचे खरे नाव पंडरिगे हे आहे. हा शब्द कन्नड भाषेतील आहे. इ. स. ५१४ च्या एका ताम्रलेखात पांडुरंगपल्ली हे नाव आढळते. या लेखाचे नूतनीकरण राष्ट्रकूज राजा अमोघवर्ष याने इ. स. ८२० मध्ये केल्याचे आढळते.
पंढरपूरच्या देवळात होयसळ राजा सोमेश्वर याने इ. स. १२३६ मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे. त्याचा सारांश असाः
'हा प्रांत जिंकून येथे छावणी मांडून बसलेला राजा सोमेश्वर याने भीमरथी नदीच्या काठावर असलेल्या पंडरिगे या गावी छावणी केली. पंडरिगे विठ्ठल देवाला त्याने अग्रहार अर्पण केला. त्यामुळे भक्त पुंडलिकाचे हृदय कमळाप्रमाणे विकसित झाले.'
बेळगावपासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या बेंडिगिरी येथे इ. स. १२४९ साली कोरलेला एक शिलालेख आहे. या शिलालेखात भीमरथी काठावर असलेल्या पौडेंरिक क्षेत्रवासी विष्णूचा उल्लेख विठोबा म्हणून करण्यात आला आहे.
आणखी एक शिलालेख इ. स. १२७० मधला आहे. पंढरपूरच्या या शिलालेखात केशवपुत्र भानू याने आप्तौर्याम नावाचा (पंढरपूर येथे) सोमयज्ञ केला असे म्हटले आहे.
कर्नाटकातील विठ्ठलभक्तीचा प्रारंभ- कर्नाटकातील विठ्ठलभक्तीचा प्रारंभ अचलानंदांपासून आढळू लागतो. या अचलानंदांना इ. स. ८०१ मध्ये भीमरथी नदीच्या काठावर विठ्ठलाचे दर्शन घडले असे म्हटले जाते. श्री. जी. वरदराजराय यांनी तुखेकेरी या गावी सापडलेल्या एका हस्तलिखिताचा आधार या विषयासंबंधी घेतला आहे. हा उल्लेख त्यांनी आपल्या 'श्रीपाद राजकृती' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत मांडला आहे. वरील उल्लेखावरून अचलानंदांना भीमेच्या काठावर विठ्ठलाची मूर्ती सापडली असावी असा तर्क करता येतो, वैष्णव संतापैकी व्यासराय ब्रह्मण्यतीर्थ आणि श्रीपादराय यांना भीमेच्या काठी विठ्ठलाच्या मूर्ती सापडल्या, असे कर्नाटकातील वैष्णव परंपरा सांगते.
माध्व संप्रदायाचा उदय झाला तो चौदाव्या शतकात. अचलानंद यापूर्वी होऊन गेले. त्यामुळे अचलानंदांना माध्व संप्रदायी न म्हणता भागवत संप्रदायी विठ्ठलभक्त म्हणणे योग्य होईल. अचलानंदांच्या घराण्यातील व्यक्ती आजही विठ्ठलभक्त म्हणून ओळखल्या जातात, आणि त्या वैष्णवांचे चिन्ह असलेले गोपीचंदन धारण करतात.
अचलानंद यांनी विठ्ठल, नरसिंह इत्यादींच्या पूजेची नीट व्यवस्था व्हावी म्हणून नरसिंहपूर या नावाचा गाव वसविला आणि तो शहाण्णव ब्राह्मण कुटुंबांना अग्रहार म्हणून दिला. याशिवाय त्यांनी आपल्या परंपरेप्रमाणे पूजा चालू राहावी यासाठी एक मठही स्थापन केला.
अचलानंदांच्या वंशात पुढील मंडळी होऊन गेली : गोपीनाथदास, मुद्दू विठ्ठलदास, पांडुरंगदास. यांनी पुढे अचलानंदांची विठ्ठलपूजा परंपरेने चालविली.
वर उल्लेखिलेल्या हस्तलिखितात अचलानंदांनी स्थापन केलेले मठ कोठे कोठे होते याची यादी देण्यात आली आहे. ती स्थळे म्हणजे :
(१) पंडरिगे (पंढरपूर?), (२) कळसा (चिकमंगलूर, जिल्हा कर्नाटक), (३) विद्यानगर (नंतरचे विजयनगर), (४) पेनुगोंडा (जिल्हा अनंतपूर-आंध्रप्रदेश), (५) रामेश्वर (तामिळनाडू), (६) काशी (उत्तर प्रदेश), आणि (७) केळदी (बिदनूरजवळ, शिमोगा जिल्हा, कर्नाटक).
हे मठ बहुधा अचलानंदांच्या वंशजांनी स्थापन केले असावेत. अशा मठांची संख्या ७ आहे. अचलानंदांच्या वंशजांना वेळोवेळी इनाम म्हणून मिळालेल्या गावांची व जमिनीची यादी पण वरील हस्तलिखितात दिली आहे. तीत कर्नाटकातील काही गावांची नावे आहेत ती अशी : (१) विठ्ठलदास पाल्य, (२) तुखेकेरी गावाजवळील दासर-हळ्ळी, विठ्ठल देवनहळ्ळी ही स्थळे, (३) कुणीगलजवळ (बंगलोर जिल्हा) हासनपुरा, (४) मागडी तालुक्यातील (बंगलोर जिल्हा) विठ्ठलपुरा.
कानडा विठ्ठलू...मज लाविला वेधू-
कर्नाटकातील या विठ्ठलाच्या महत्त्वाकडे महाराष्ट्रातील संतांचे लक्ष गेले असावे. 'कानडाहो विठ्ठलू कर्नाटकू, त्याने मज लाविला वेधू' ही ज्ञानदेवांची उक्ती प्रसिद्ध आहे.
नामदेव म्हणतात :
'काशिये कनौजा, द्वारके गुणरू-कानडा विठ्ठल्लू पंढरिये.'
'कानडा विठ्ठलवो उभा भिवरे तिरी नाम बरवे, रूप बरवे कानडिया.'
ज्ञानदेवांचा एक कन्नड अभंग आहे असे म्हणतात तो पुढीलप्रमाणे :
“आ, आ, नी केले (एक) मातु केळले (गोष्ट एक) घनीगे मसला आदिने । चलुवने चलुवने-पंढरीराय चलुवने । (अर्थ : पंढरीरायाचे रूप मोहक आहे. मी भाळले आहे.)
कानडी : एल्ले दोरक्याने, एल्ले बारान्ने 'पुंडलिकनो भक्ती गे बंदु आ रखुमादेवीवरा विठ्ठलने...' अर्थ : पुंडलिकाच्या भक्तीला वश झालेला तो रखुमादेवी वर कुठे सापडेल, कुठे भेटेल?
हा उल्लेख एस. के. रामचंद्रराव यांनी 'पुरंदरदास-साहित्यदर्शन' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत केला आहे. हा उल्लेख त्यांना उस्मानिया विद्यापीठातील कन्नड भाषा-विभागाचे प्रमुख प. वा. भीमसेनराव यांच्या लेखात आढळला.
कर्नाटकातील विठ्ठलभक्त संत संप्रदाय-
माध्व संप्रदायाचे संस्थापक मध्वाचार्य आनंदतीर्थ (इ. स. १२३८ ते १३१८) यांनी आपल्या भारत संचारात पंढरपूरला भेट दिली असल्याचा प्रत्यक्ष पुरावा नसला तरी माध्व साहित्यातील पुढील उल्लेखावरून मध्वाचार्यांची पंढरपूर भेट ही तर्कसुसंगत वाटू लागते : त्या प्रांताच्या राजाला त्यांनी ईश असे म्हटले आहे. हा शब्दप्रयोग देवगिरीकर यादव घराण्यातील महादेव यादव नृपती याला उद्देशून असावा. दुसरा पुरावा म्हणजे पुढे तीनशे वर्षांनी पंढरपूरला माध्व पीठाचे स्वामी विद्याधीश (इ. स. १६१९ ते १६३१) यांनी भेट दिली त्यावेळी पूर्वी मध्वाचार्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या स्थळावर मठ होता, तो मोडकळीस आल्यामुळे विद्याधीशांनी त्याचा जीर्णोद्धार केला, असे त्यांच्या चरित्रात आले आहे. तिसरा पुरावाही तितकाच महत्त्वाचा आहे.
मध्वाचार्यांनी इ. स. १३७० च्या सुमारास विठ्ठलाच्या अनेक मूर्ती तयार करून घेतल्या. आपल्या शिष्यांनी या मूर्तीची पूजा करावी म्हणून त्यांनी निरनिराळ्या मठातून या मूर्ती देऊन टाकल्या. या मठांच्या स्थळांची नावे अशी : शिरूर, पुत्तिगे, सुब्रहण्य मठ, त्या मूर्ती अद्यापही पूजेत आहेत.
इतर माध्व संतापैकी श्रीपादराज ब्रह्मण्यतीर्थ आणि व्यासराय ह्यांना ते पंढरपूरच्या यात्रेस गेले असता चंद्रभागेच्या पात्रात विठ्ठलाची मूर्ती मिळाली अशी कथा आहे. व्यासरायांच्या अब्बूर या गावी असलेल्या मठात ती मूर्ती आहे. याच मूर्तीची स्तोत्रे श्रीपादरायांनी अतिशय भक्तिभावाने म्हटली आहेत. ती स्तोत्रे कर्नाटकात प्रसिद्ध आहेत. या विठ्ठलस्तुतीमुळे श्रीपादरायांना श्रीरंगविठ्ठल हे काव्यातले नाव प्राप्त झाले.
माध्व संप्रदायातील प्रकांडपंडित श्रीव्यासराय यांचा विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय (१५०९ ते १५९९) यांनी नवरत्नांचा अभिषेक करून सत्कार केला, हे सर्वश्रूत आहे. व्यासरायांनी विजयनगर येथे तुंगभद्रेच्या काठावर विठ्ठलाचे मंदिर उत्कर्षास आणले. ते विजय विठ्ठलाचे मंदिर म्हणून ओळखले जाते.
व्यासराय इतकेच करून थांबले नाहीत. त्यांनी आपल्या अनेक शिष्यांना त्यांच्या काव्यातून आपल्या नावाबरोबर विठ्ठल असे जोडनाव वापरण्याची आज्ञा केली. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटकातील संतश्रेष्ठ पुरंदरदास यांना पुरंदर विठ्ठल हे नाव व्यासरायांकडूनच मिळाले हे होय.
पुरंदरदासांची विठ्ठलभक्ती ही कर्नाटकात आणि कर्नाटकाच्या बाहेर भारतातील सर्व लहान-मोठ्यांना माहीत आहे. ही भक्त मंडळी आपल्या विठ्ठलावरील काव्यात देवाशी सलगीने, लाडिकपणे वागताना दिसतात. येथे तुकोबारायांची आठवण होते. पुरंदरदासाच्या भक्तिकाव्याचे एक उदाहरण येथे देता येईल :
'हे विठ्ठला, मी तुला त्रिवार शरण आलो आहे. तुझ्यावर रुसून रुक्मिणी ही वेगळी उभी राहिली आहे. भगवंता, तू आपल्या पट्टराणीला (रुक्मिणीला) तिने रुसावे असे काय बरे बोललास? तुला अनेक बिरुदे आहेत. (उदा. चक्रधारी, चक्रपाणी इत्यादी) पण रुक्मिणीच्या बाबतीत तू नेमका शंखाचा का बरे उपयोग केलास? तुझ्या अनेक बिरुदापैकी शंखधारी हे बिरुदच तुला जास्त प्रिय असावे. पुंडलिकाच्या भक्तीची कसोटी पाहण्यास निघालेला तू, जाणूनबुजून विटेवर की रे उभा राहिलास! हे विठ्ठला, तू पंढरी क्षेत्राचा रक्षणकर्ता आहेस.' अशी लाडी लाडी वाणी पुरंदरदासांनी विठ्ठलासंबंधी वापरली आहे.
पुरंदरदास हे बारा वर्षे पंढरपुरी वास्तव्य करून होते. विठ्ठल मंदिरात त्यांच्या नावाने ओळखला जाणारा एक खांब अद्याप आहे. पुरंदरदासांच्या काळातच हरिदास या शब्दाला दास मंडळी म्हणजे दास-कूट हे नाव मिळून कर्नाटकात ते सर्वतोमुखी झाले. हरिदासांच्या मालिकेत श्रीपादरायांपासून पुढे झालेल्या संतमंडळीत बहुतेक जण विठ्ठलाला आराध्यदैवत मानणारे दिसतात. आपल्या नावाबरोबर विठ्ठल हा शब्द ह्या मंडळींनी जोडला. कर्नाटकात विठ्ठलभक्तीचा महापूर श्रीपादराय आणि पुरंदरदास यांच्या काळापासून सुरू झाला तो अद्यापही चालू आहे. विठ्ठलावर अगणित स्तोत्रे गाणारी आणि आपल्या नावाबरोबर विठ्ठल नाव जोडणारी संत हरिदास गायक मंडळी शेकडोंनी होऊन गेली. त्यातील काही नावे पुढे देत आहे : (१) रंग-विठ्ठल, (२) विजय-विठ्ठल, (३) गोपाल-विठ्ठल, (४) हयवदन-विठ्ठल, (५) मुद्दु-विठ्ठल (प्रेमळ विठ्ठल-सुंदर विठ्ठल), (६) रामचंद्र-विठ्ठल, (७) वेणुगोपाल-विठ्ठल, (८) मधवेश-विठ्ठल, (९) मोहन-विठ्ठल, (१०) गुरुविजय-विठ्ठल, (११) हयग्रीव-विठ्ठल, (१२) विरजी-प्राणेश विठ्ठल, (१३) बादरायण-विठ्ठल, (१४) केशव-विठ्ठल, (१५) गुरुगोपाल-विठ्ठल, (१६) नंदगोपाल-विठ्ठल, (१७) श्रीपती-विठ्ठल, (१८) व्यास-विठ्ठल, (१९) नरसिंह-विठ्ठल, (२०) जगन्नाथ-विठ्ठल, (२१) रघुपती-विठ्ठल, (२२) भूवराह रघुपती-विठ्ठल, (२३) श्रीपती-विठ्ठल, (२४) नंदेश्रीपती-विठ्ठल, (२५) श्रीनिधी-विठ्ठल, (२६) नंदेश्रीनिधी-विठ्ठल, (२७) श्रीवर-विठ्ठल, (२८) तीर्थपाद-विठ्ठल, (२९) मृदु मोहन-विठ्ठल, (३०) श्रीरमापती-विठ्ठल, (३१) कमलेश-विठ्ठल, (३२) कमलापती-विठ्ठल, (३३) श्रीश-विठ्ठल, (३४) श्रीकेशव-विठ्ठल, (३५) श्रीश प्राणेश-विठ्ठल, (३६) गुरु श्रीश-विठ्ठल, (३७) भीमेश-विठ्ठल, इत्यादी शेकडो हरिदास गेल्या पाच शतकात होऊन गेले. ही परंपरा अद्याप चालू आहे.
याच काळात कर्नाटकाच्या वैष्णव मठातील अनेक पीठाधीश पंढरपूरला भेट देऊन काही काळ वास्तव्य करून विठ्ठलावर अनेक स्तोत्रे रचून गेले. त्या काळातील शिलालेखातून पंढरपूर, पांडुरंग, पंढरीभट्ट, विठ्ठप्पा, विठ्ठला अशी लाडकी नावे कर्नाटकात विठ्ठल देवाला उद्देशून वापरलेली आढळतात. विठ्ठलाच्या पायांशी कर्नाटक आणि महाराष्ट्र यांची अशीही भक्ती.!.. ज्याला नाही काही क्लुप्ती.!!
.. म्हणून विठ्ठल कर्नाटकाचा आहे... विठ्ठल महाराष्ट्राचा आहे..! खरेतर भक्त महाराष्ट्र वा कर्नाटकाचा आहे, मात्र विठ्ठल त्याच्या भक्तांचाच.!!!
संदर्भ-
समग्र सेतुमाधवराव पगडी,खंड चौथा
PANDURANGA VITHOBA in South-
The two illustrations in the accompanying plates (figs. 39 and 40) show another form of standing Vishnu, known as Panduranga or Vithoba. The characteristic feature of the or image is that it has two arms which, being bent at the elbow, are placed on its hips. A poem in praise of this form of Vishnu, entitled Pandurangāshtaka, is attributed to Sankarāchārya of about the eighth century A.D.
-South Indian images of gods and goddesses-Krishna Sastri
।।फक्तइतिहास।।
Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..
Popular Posts
कोंडाजी फर्जंद - बेखौफ छत्रपतीचा दिलफेक योद्धा...
- Get link
- X
- Other Apps
किल्ले बाळापूर-वर्हाडातील शंभूराजांची जहागीर
- Get link
- X
- Other Apps
एक सहज चिंतन- महाराज आणि शाहिस्तेखान
- Get link
- X
- Other Apps
अद्भूत साक्षात्कार- लोणार...
- Get link
- X
- Other Apps
हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा...३७१ वर्षांपूर्वी चा तो दिव्य संकल्प
- Get link
- X
- Other Apps
जानेफळ: इतिहास पुरुषांच्या भेटीचा दुर्लभ योग..!
- Get link
- X
- Other Apps
श्रीवर्धन- हरिहरेश्वर एक नयनरम्य भेट..
- Get link
- X
- Other Apps
अज्ञातवासातील बार्शी टाकळी येथील कालिंका देवी मंदिर-
- Get link
- X
- Other Apps
गणपतीचा वाडा:शतकापूर्वीचा गणेशोत्सव- मैराळडोह
- Get link
- X
- Other Apps
राजुरा: स्त्रीशक्तीचा शौर्य स्तंभ'
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट