Skip to main content

Featured

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

  कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले. काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली. औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या सुभेदारांचे मुख्य सल्लागार क

शिवकालातील लॉकडाऊन आणि आपत्ती व्यवस्थापन


आज सकल मानव समाज कोरोनाच्या भिषण संकटात सापडला आहे. तो असा शत्रू आहे की, त्याच्याशी लढण्याचे प्रभावी अस्त्र मानवाकडे नाही. अमेरीकेसारखी बलाढ्य राष्ट्रे हतबल ठरली आहेत. शिवछत्रपतींनी आपल्या आयुष्यात आपल्यापेक्षा शतपटींनी मोठ्या अशा अनेक गनिमांना परास्त केले. अनेक संकटांवर मात केली. सार जग त्यांच्या निती आणि व्यवस्थापनाला मुजरा करते. मग अशा या कोरोनाच्या भिषण संकटात चला शोध घेऊन, छत्रपतींच्या नितीचा त्यांच्या अमोघ तंत्राचा.!

पन्हाळ्याचे लॉकडाऊन आणि गनिमीकाव्याचे तंत्र-अफजलखानाच्या संकटावर मात केल्यावर स्वराज्यावर पुन्हा नव्याने प्रचंड मोठे संकट आले ते सिद्दी जौहरचे.! विजापूरचा सरदार सिद्दी जौहरने प्रचंड मोठ्या सैन्यानिशी पन्हाळ्याला वेढा दिला.(मार्च सन १६६०) महाराज पन्हाळ्यावरच होते आणि साधारणपणे सहा महिने ते या वेढ्यात अडकून पडले.! जसा आज समस्त मानव समाजाला कोरोनाचा वेढा पडलाय. त्यावेळी महाराज व त्यांची माणसे जसे पन्हाळ्याच्या वेढ्यात लॉक डाऊन झाली. तसेच आज आम्ही या कोरोनाच्या वेढ्यामुळे घरात लॉकडाऊन झालो आहात.! काळ वेगळा असला तरी संकटे ती संकटेच असतात. फक्त स्वरूप बदलले आहे. मग महान नितीतज्ञ शिवछत्रपतींनी असे कोणते नियोजन व व्यवस्थापन केले ते आम्ही बघायला हवे.

महाराजांना वेढ्यातून काढण्यासाठी सरनोबत नेतोजी पालकरांनी वेढ्यावर हल्ला चढवला, जंग-जंग पछाडले, हरप्रयत्न केले मात्र त्यांना जोहरचा वेढा काही फोडता येईना. तसेच आज कोरानाचा विळखा आम्हाला फोडता येईना.

पाऊसधारा बरसू लागल्या मात्र सिद्दी जोहरचा वेढा काही सैल झाला नाही. सिद्दी पुरता जिद्दीलाच पेटला होता. अशा या बलाढ्य शत्रूच्या वेढ्याला सरळ आक्रमण करून फोड़णे अशक्य आहे हे महाराजांनी ओळखले.

त्यांनी आपले निमीकाव्याचे तंत्र वापरायचे ठरवले. जेव्हा बलाने शत्रूला समोरासमोर परास्त करता येत नाही तेव्हा गनिमीकाव्याच अस्त्र वापरावे ही महाराजांची निती. महाराजांनी गनिमीकाव्याने संकटावर मात केली. आपल्या अमोघ गनिमीयुद्धाच्या तंत्राने त्यांनी सिद्दी जौहरच्या विळख्यातून स्वतःची आणि स्वराज्याची सुटका करून घेतली आणि पन्हाळगड सोडुन विशाळगडाची वाट धरली.

आम्हीसुद्धा कोरोनाशी मुकाबला करायचा तो याच गनिमीकाव्याच्या तंत्राने, बचावात्मक रितीने ! कोरोनापासून दूर राहून, तोंडाला मास्क लाऊन, सोशल डिस्टसींग पाळून आणि वारंवार हात धुऊन.!

आम्ही आज हतबल आहोत, कोरोनाशी अग्रेसिव्ह लढाई करु शकत नाही. जसे महाराजांना पन्हाळ्याचा वेढा फोडणे कठीण जात होते म्हणून त्यांनी गनिमी काव्याने या संकटावर मात केली. आम्हीसुद्धा मास्क लाऊन, सोशल डिस्टसिंग पाळून कोरोनापासून बचाव करायला पहिजे असे या इतिहासाचे उपयोजन आहे.


पुण्याचे लॉकडाऊन आणि पूर्वनियोजन-

स्वराज्यावर जेव्हा सिद्दी जौहरचे संकट आले व महाराज जेव्हा पन्हाळ्याच्या किल्ल्यात अडकले त्याच सुमारास दुसऱ्या बाजूने स्वराज्यावर शाहिस्ताखानाचे संकट चालून आले. अमिरुल उमरा शास्ताखानाला औरंगजेबाने स्वराज्य नष्ट करण्यासाठी पाऊण लाखांची फौज दिली. तो पुण्यात दाखल झाला. (सन १६६० च्या ९ में) त्यानेही स्वराज्यात हाहाकार माजवला, गावे लूटली, जाळपोळ चालवली. अगदी अडकित्यात सापडावे तशी स्वराज्याची अवस्था झाली. अर्थात पूर्ण प्रांतात लॉकडाऊन झाले. मग महाराजांनी काय केले बघा..


गनिमापासून दूर रहा- कोरांना पासून दूर रहा-

पुण्यात पडलेली शाहिस्तेखानाची छावणी अफाट हाती. तीच्या गरजाही मोठ्या होत्या. खान्यापिन्याच्या गरजेपायी पुणे प्रांत ओस पडला होता. दररोज मोगल फौजा पुण्याच्या विविध मुलखात धाडी टाकून गुरे-दोरे, दाणावैरण,धन-धान्य लुटून नेत. लेकर-बाळही सुरक्षिात राहिली नाही. सर्वत्र त्यांची धावणी सुरु होती. महाराजांची शक्ती त्यांच्या गनिमी तंत्रात आणि हेरखात्यात होती. त्यांचे हेर पूर्ण मुलूखातल्या शत्रूच्या अचूक आणि ताज्या बातम्या गडावर आणत. आता मोगल फौजा रोहिडखोऱ्यात धावनीस जात असल्याच महाराजांना हेरांकडून कळल होत. संकटापूर्वीच अचूक बातमी असल्यास व्यवस्थापन करण शक्य होत. त्यांनी रोहिडखोऱ्याचे देशमुख बाजी सर्जेराव जेधे यांना तात्काळ खलिता पाठवून रयतेस जपण्याची सख्त आज्ञा दिली. ते या पत्रात म्हणतात. -

सर्जाराऊ जेधे देशमुख ता. रोहिडखोरे प्रती राजश्री शिवाजीराजे ।

मोगल प्रस्तुत तुमच्या खोऱ्यात धावणीस येत असल्याचे जासूदांनी समाचार आणीला आहे. तरी तुम्ही आपल्या खोऱ्यातील गावो गावी ताकिद देऊन माणसे लेकरेबाळे समेत तमाम रयतसी घाटाखाले बांका जागा(सुरक्षित जागा) असेल तेथे पाठवणे. जेथे गनिमाचा आजार (शत्रूचा त्रास) पहुचेना ऐशा जागीयास पाठवणे. या कामात हयगय न करणे...ऐसियास तुम्हाकडून अंतर पडिलीयावरी मोगल जे बाद(मनुष्य) धरुन नेतील त्याचे पाप तुमच्या माथा बसेल ऐसे समजोन गावाचा गाव हिंडोनु रातीचा दिवस करून लोकासी घाटाखाली जागा असेल तेथे पाठविणे. या कामास दिरंग न करणे. तुम्ही आपला हुशार असणे. सेतपोत(शेती) जतन करावया जे असतील त्यासही तुम्ही सांगणे की डोंगरावर आसीरा(आश्रय) घेणे. गनिम(शत्रू) दुरुन नजरेस पडताच त्याचे धावणीची वाट चुकवून पलोन जाणे. तुम्ही आपले जागा हुशार असणे. मोर्तब सूद, मर्यादय विराजते । (शिपसासं खं१ले९१५)

प्रस्तुत प्रत्रात महाराजांनी बाजी सर्जेरावांना आपल्या खोऱ्यातील लोकांना मोगलांच्या धाडीपासून घाटाखाली योग्य जागा पाहून सुक्षित न्या असा तातडीचा हुकूम फर्मावला आहे.

महाराजाचे हे नियोजन आणि व्यवस्थापन आम्हाला आजही उपयोगी आहे. कारण कोरोना सारख्या बलाढ्य संकटाला(गनिमाला) आम्ही तोंड देऊ शकत नाही. म्हणून वरील महाराजांचा आदेश आम्हाला जणू संदेश देऊ पाहतो की...गनिम दुरुन नजरेस पडताच त्यांच्या धावणीची वाट चुकवून पलोन जाणे -अर्थात कोरोनाच्या संपर्कात येऊ नका,त्याला सामोरे जाऊ नका, स्वत:चा बचाव करा .

तुम्ही आपले जागा हुशार असणे-आपल्या जागेवर सावध असा, रयतेस गनिमाचा आजार(त्रास) पोहाचना ऐशा जागीयास पाठवणे- अर्थात जेथे कोरोनाचा आजार पोचनार नाही अशा सुरक्षित जागेवर म्हणजेच आपल्या घरात राहा. असाच संदेश यातून प्रकट होतो. कारण दोन्ही संकटे आहेत व त्यासाठी महाराजांचे आपत्ती व्यवस्थापन अप्रतिम असे आहे. असे हे शिवकालातील लॉक डाऊन आणि त्याचे आपत्ती व्यवस्थापन.!

पुरंदरचे लॉकडाऊन आणि पूर्वनियोजन-

शाहिरतारखानाचे प्रचंड संकट टळतनाही तोच पून्हा स्वराज्यावर त्याहीपेक्षा मोठे मिर्झा राजे जयसिंगाचे संकट आले. बहिर्जी नाईकाकडून मिझाराजांच्या हालचालीची अचूक बातमी महाराजांना पोचली होती. ऐंशी हजार एवढी मोठी फौज आणि तोफखाना घेऊन मिर्झाराजे येत होते. (जानेवारी १६६०) स्वराज्यावर युद्धाचे ढग दाटून आले. अर्थात पून्हा लॉकडाऊन.!

महाराजांनी दरबार भरवून सर्व सरदार- शिलेदारांना स्वराज्यावर येणाऱ्या या संकटाची जाणीव करुन दिली. तसेच या संकटाचा सामना करण्याचे नियोजनही त्यांनी केले. त्यांनी सर्व गडकोटांना व सुभेदारांना पत्रे पाठवून कळवले की, 'मिर्झाराजा जयसिंग व पठाण दिलेरखान असे बाकी फौज घेऊन येत आहेत. तुम्ही जागोजाग सावध हुशार असणे. दानागोटा, गवतकाडी, बारुदगोळा साठवून त्यावरीध्यान राखणे. आम्ही खासेच तुरंत गडदाखल होत आहोत.'

पुरंदर आणि त्याचा जोड किल्ला वज़्रगड अशा दोन्ही किल्ल्यांना शत्रूचा वेढा पडला.! पुरंदरावराभोवती सैन्यसागर निर्माण झाला. पण पुरंदर भक्कम होता दिड हजार जंगेबहाद्दर महार, कहार, कोळी, रामोशी सैनिकांच्या आणि किल्ल्लेदार मुरारबाजींच्या इमानाने. महाराजांनी हे संकट ओळखून पूर्वीच सर्व गडावर धान्य, वैरण, औषधी आणि शत्रूशी लढयाण्यासाठी आणि बचावासाठी शस्त्रसाठा करुन ठेवला होता.

शिव छत्रपतींची संभाव्य संकटाला ओळखून वागण्याची निती आम्ही समजून घ्यायला पाहिजे. जसे शत्रू आपल्या किल्ल्यावर हल्ला करुन त्यांना वेढा घालू शकतो अशी संभाव्यता आणि भवितव्यता ओळखून महाराज आपल्या गडावर धान्यसाठा व जिवनावश्यक गोष्टी जसे औषधी, जनावरांना वैरण, माणसांना धान्य आणि शत्रूला तोंड देणारी बारुद आणि शस्त्रे यांचा मुबलक साठा ठेवत. तसेच आम्ही सुद्धा जगात पसरणाया या कोरोनाच्या संकटाला ओळखून अन्न-धान्य, औषधी व अत्यावश्यक गोष्टी गोळा करुन ठेवाव्या. कारण एकदा कोरोनाचा वेढा पडला मग बाहेर निघणे अशक्य होऊन जाते हे आम्ही पाहिले आहे. तसेच शत्रूशी लढणारी शस्त्र म्हणजेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्याच्याशी लढण्यासाठी जसे आम्ही तोंडाला मास्क लावणे, वारंवार हात धुवून काढणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी केल्या पाहिजे.

महाराजांचे पूर्वनियोजित आपत्ती व्यवस्थापन आणि निधी नियोजन-

आगामी संकट आणि आपत्ती यांचा विचार करण्याची महाराजांची दूरदृष्टि थोर होती हे आपण अनेक उदाहरणांतून पाहिले आहे. तसंच एक उदाहरण अतीदिव्य असे आहे. बघा संकटकालात स्वराज्यातील अनेक भागांना शत्रूचा जाच होई. मग अशा मुलखास जे मोगलांच्या स्वारीच्या धोक्यात असत त्यांना महाराजांनी आर्थीक सहाय्य व्हावे करीता काही रोख रक्कम खजीना करुन ठेवन्याची आज्ञा दिली होती. त्याचा उल्लेख शिवकालिन दफ्तरात 'जाबीता तह' असा आलेला आहे.

सन १६७२ च्या अशा जाबीता तहात एकूण होन एक लाख पंचविस हजार रोख एवढे आपत्तीग्रस्त गावांकरीता मुक्रर करण्यात आले होते. यामध्ये कुडाळ, राजपूर, कोळे, दाभोळ, पुणे, जावळी, कल्याण, भिवंडी, इंदापूर व सुपे या महालांचा उल्लेख आहे. यातील तेरा हजार होन हे पुण्यासाठी तर पंधरा हजार होन हे दाभोळ साठी मुक्रर करण्यात आले होते. विशेष म्हणजे ही रक्कम मोगलांचे वेढे पडल्यावर उपयोगी आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनासाठीच मुक्रर केलेली आहे, ती गरज न पडल्यासही राजभाग(सरकारी कामासाठी) म्हणून खर्च करण्यात येऊ नये असा महाराजांचा कडक आदेश होता.! असे हे जाणते राजे आणि अशी ही त्यांची रयतमाया, दूरदृष्टि आणि नियोजनवृत्ती थोर..!!

असेच जसे किल्ल्यांना वेढे पडायचे तसे आजही आम्हाला संकट वेढे घालतात. कोरोनाच्या या संकटात आम्ही शिवछत्रपतिं प्रमाणे सबुरीने आणि युक्तीने कार्य साधून या वेढ्यातून मार्ग काढला पाहिजे. स्वराज्यावरील संकट आणि त्यावर महाराजांनी केलेली मात ही शिवनिती आम्ही समजली पाहिजे.!

म्हणूनच इतिहास वाचला पाहिजे, कारण इतिहासाचा ध्यास हा तो जिकिरीचा ध्यास, ज्यातून कळे भविष्याचा कयास..!! धन्यवाद...जोहार! 

-प्रा. रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

#lockdown

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts