Search This Blog
बाजे लष्कराच्या ये छावणीत आपले स्वागत असे हुजूर..
- छावणी
- सफर माझी स्थळांची
- अज्ञातवासातील बार्शी टाकळी येथील कालिंका देवी मंदिर जिल्हा अकोला
- अद्भूत साक्षात्कार- लोणार.!(जिल्हा बुलढाणा)
- कलेचा अप्रतिम नमुना साकेगाव येथील साकेश्वर मंदीर(जिल्हा बुलडाणा)
- भेट कवी कलश यांच्या वाड्याला(जिल्हा कोल्हापूर)
- कान्नव बंगला-कारंजा येथील एका पुराण पुरूषाची भेट(जिल्हा अकोला)
- किल्ले बाळापूर-शंभुराजांची वर्हाडातील जहागीर(जिल्हा अकोला)
- जेव्हा थडगं बोलू लागतं-वाशीम येथील एका ब्रिटिश कालीन SP'चे घाडगे(जिल्हा वाशिम)
- टोका येथील सिद्धेश्वर मंदिर-उत्तरेतील शिल्पकलेचा आविष्कार(जिल्हा औरंगाबाद)
- किल्ले बाणकोट-कथा सांगतोय आर्थर पॉईंट ची
- रेवदंडा व कोरलाई-पोर्तुगीज खंडारे नव्हे ती आमुची शौर्य प्रतीके(जिल्हा रत्नागिरी)
- भुलेश्वर-माळशिरस एक अप्रतिम अनुभव(जिल्हा पुणे)
- स्त्रीशक्तीचा शौर्य स्तंभ-राजुरा (जिल्हा वाशिम)
- श्रीवर्धन हरिहरेश्वर-एक नयनरम्य भेट!
- सातगाव भुसारी मंदिर समूह (जिल्हा बुलढाणा)
- केशवाची एक प्राचीन मूर्ती: कुपटा (जिल्हा वाशिम)
- गणपतीचा वाडा:मैराळडोह-शतकापूर्वीचा दिव्य संकल्प(जिल्हा वाशिम)
- अमृतेश्वर-रतनगडाजवळील शिल्पाविष्कार(जिल्हा नगर)
- अंतरिक्ष पार्श्वनाथ-शिरपूरचे दिव्यत्व (जिल्हा वाशिम)
- दख्खन तक्त: अर्थात भेट जिंजी किल्ल्याची
- शिवपराक्रमाचा साक्षीदार वेल्लोरचा भुईकोट
- मेहकर येथील मध्ययुगीन दत्त मंदिर (जिल्हा बुलढाणा)
- for new title
- सफर माझी दस्तावेजांची
- एक सहज चिंतन: महाराज आणि शाहिस्तेखान
- औरंगजेब बादशहा इराणच्या बादशहाकडे राजदूत पाठवतो तेव्हा..
- आग्र्याच्या दरबारात शिवशंभू
- 'अहकामे आलमगिरी' अर्थात आलमगिराची आज्ञापत्रे
- इतिहासातील दारूबंदीची एक गमतीदार गोष्ट
- मोहम्मद अली जिना यांचे शेवटचे दिवस
- एक होता रोमेल: दुसऱ्या महायुद्धातील एका तेजस्वी सेनापतीची कथा
- शिवछत्र साल भेटीतून पुण्यातील NDA चे बीजारोपण
- कोंडाजी फर्जंद: बेखोफ छत्रपतिचा दिलफेक योद्धा!
- गुलामितून मुक्ती
- चाकणचा वेढा आणि फ्रान्सचा व्यापारी
- राजश्री साहेबांचे शासन:छत्रपती शंभूराजांचे सर्जेराव जेधे यांना ताकीद पत्र.!
- छत्रपतींनी केला सप्तकोटेश्वराचे जीर्णोद्धार
- छत्रपती शंभुराजे विरचित बुधभूषण-||सरोवरस्य||
- कसा होता टिपू सुलतान..?
- बेइमानीची कथा सांगतो कोथळीगड
- पानिपताच्या अंतरंगातील काही..
- पानिपताचे आवतन देणारा थोर धर्मशास्त्रज्ञ शहावली उल्लाह
- दारा शिकोह: एक पुण्यस्मरण..
- दक्षिण दिग्विजयाचे राजकारण-परराष्ट्र धोरणाचा अनोखा नमुना
- निजामाची विनोदी कथा-हुक्का आणि कॉफीची
- पारगड-चंद्रसूर्य असेतो गड जागता ठेवा!
- रणधूरंदर बाजीराव-भूमि कठीण आणि आकाश दूर!!
- समर्थांचे मनाचे श्लोक आणि मन-समजावंन
- मुल्ला मसीहाचे फारसी रामायण
- युद्धाची बारूद शत्रूच्या गोटात-कुलमुखत्यार राणीयेसूबाई साहेब
- महाराज चीनकडे लक्ष ठेवून आहेत!!
- वडले राजिक-छत्रपती शंभुराजांची गोवा मोहीम!
- सकल शास्त्राचा निशा- राजा सरफोजी भोसले तंजावर
- छत्रपती शिवाजी महाराजांचे मोगलांना खरमरीत उत्तर!!
- शिवरायांची राजनीति शत्रू मध्ये भेद-शिवरायांच्या इंटेलिजन्सची एक कथा!
- कथा पिता-पुत्राची:रामपूरच्या चंद्रावत राजांची!
- वीर सावरकर-युद्धाची बारूद शत्रूच्या शिबिरात!
- समकालीन फारशी साधनातून घडणारे दिव्य शिवदर्शन!
- सावनूरचे नवाब माधवराव पेशव्यांचे मामा..?
- हे राज्य व्हावे ही श्रींची ईच्छा-३७१ वर्षापूर्वीचा दिव्य संकल्प!
- मार्मिक भाष्यकार भीमसेन सक्सेना
- Sub Tab
Featured
- Get link
- X
- Other Apps
“खस कम जहां पाक”
मित्रांनो,
छत्रपती शंभूराजांच्या काळात अनेक सरदार त्यांना सोडून मोगल बादशहा औरंगजेबाच्या पक्षात सामील झाले. मृत्यूचे भय आणि वतनाचा मोह.!
शंभूराजांना सोडून गेलेल्या अनेक सरदारांपैकी आपण येथे एक महत्त्वाचे उदाहरण घेऊया. ते नामांकित मराठा सरदार म्हणजे कान्होजी शिर्के जे गणोजी शिर्के यांचे चुलत बंधू होते. कान्होजी शिर्के हे सन १६८२ पासूनच औरंगजेब बादशहाच्या सेवेत रुजू झाल्याचे दिसते.
प्रथम ३० सप्टेंबर १६८२ च्या मोगल दरबारातील अखबार सांगतात-
खानजान बहादुर हा यावेळी रामशेज च्या किल्ल्याला वेढा देऊन बसला होता. कान्होजी शिर्के यास हुकूम झाला की त्याने बहादूर खानाच्या फौजेत राहावे.(मोगल अखबार क्र. ३२६)
यानंतर २४ ऑक्टोबर १६८२ च्या मोगल दरबारातील नोंदीप्रमाणे-
“मीर वहदत गुर्जबर्दार(अधिकारी) कान्होजीच्या (शिर्के) बरोबर असलेले प्यादे चाकरीत ठेवण्यासाठी गेला होता. त्याच्या लिहिण्यावरून समजले की मावळे जमातीच्या प्याद्यांना चाकरीत ठेवावे असा हुकूम झाला आहे, परंतु संभा(छत्रपती शंभुराजे) तिकडील खोरे बंद करून प्याद्यांना येऊ देत नाही.”
अर्थात छत्रपती शंभूराजांनी कोकणची खोरी अडवून ठेवली होती. त्यामुळे कान्होजीस मावळे शिपाई गोळा करणे कठीण जात होते.
असो,
छत्रपती शंभूराजांचे औरंगजेब बादशहाशी युद्ध सुरू झाले ते तळकोकणच्या अर्थात कल्याणच्या रणांगणाने. या युद्धात पहिला सेनापती उतरला तो म्हणजे हसनअलीखान होय. त्याला अपयश आल्याने बादशहाने रणमस्तखानाची नेमणूक केली.
४ नोव्हेंबर १६८२ ची मोगल दरबाराची एक नोंद सांगते की-
रणमस्तखान हा तळकोकण जिंकण्यासाठी निघाला असताना खानजहानबहादुर खान घाटात थांबून त्याला कोकणात उतरण्यास मदत करीत होता. यावेळी त्याच्याबरोबर कान्होजी शिर्के सैन्यसह हजर होते. यावेळी कान्होजी च्या तैनातीत ९००० प्यादे नेमले होते. (मो.द.अ.३६४)
मात्र तळकोकणच्या अवघड वाटा आणि प्रतिकूल निसर्ग यामुळे मोगलांच्या या फौजेला रसदेची तंगी होती. पुढे रणमस्तखानाने त्या भागात सुरक्षात्मक पवित्रा घेऊन गढीचे बांधकाम सुरू केले. अरबी समुद्राद्वारे कल्याणच्या खाडीतून येणारी रसद पोच होईल अशी धडपड तो करू लागला.
सारांश,
कान्होजी शिर्के १६८२ पासून मोगल सेनापतींच्या सोबत शंभूराजांच्या विरुद्ध मोहिमेत कार्यरत असताना दिसतात. मात्र त्यांचे चुलत बंधू गणोजी शिर्के अर्थात शंभूराजांचे मेहुणे हे अद्याप तरी बादशहाला सामील झाले नव्हते. गणोजी शिर्के अखेरपर्यंत शंभूराजांशी निष्ठावान राहिले. मात्र अखेरीस त्यांचे आणि शंभूराजांचे युद्ध घडून आले ते कवी कलश यांच्यामुळे. आणि शिर्क्यांचे हे बंड मोडून काढण्यासाठी शंभूराजांना रायगड उतरून जावे लागले. खेळण्याचा बंदोबस्त करून शंभूराजे कवी कलशासह संगमेश्वर मुक्कामी थांबले असताना मोगल सरदार मुकर्रबखानाने अचानक झडप घालून त्यांना कैद केले.
अर्थात सन १६८९ पर्यंत म्हणजे शंभूराजांची कैद आणि राष्ट्रासाठी बलिदान होईपर्यंत कान्होजी शिर्के विविध मोहिमांमध्ये होते. त्यानंतर काही वर्षे हिंदवी स्वराज्याला भयंकर कष्टाची गेली. मात्र छत्रपती शंभूराजांच्या बलिदानाच्या राखेतून प्रचंड ज्वाला निर्माण झाला आणि राजाराम महाराजांच्या नेतृत्वात संताजी आणि धनाजी या सेनापतींनी रणांगण फिरविले.
या सुमारास गणोजी शिर्के जे मोगल बादशहाकडे चाकरीत होते ते जिंजीच्या वेढ्याच्या सुमारास मोगलांचा पक्ष सोडून राजाराम महाराजांकडे स्वराज्यात परत गेले.
तर कान्होजी शिर्के यास विशेष कामगिरी नसल्याने वा त्यांची गरज उरली नसल्याने बादशहा तर्फे मिळणारी जहांगीर तनखा सुरळीत नसल्याची दिसते. या कारणामुळे आणि विशेष म्हणजे मराठ्यांचे बळ वाढल्याने कान्होजी शिर्के आता बादशहाचा पदर सोडून पाहात असल्याचे दिसते.
याविषयी मोगल सरसेनापती जुल्फीकारखान याने औरंगजेब बादशहाला लिहून कळविले होते. त्याविषयीची औरंगजेब बादशहा सेनापती जुल्फीकारखान याला कान्होजी शिर्के विषयी मोठे मार्मिक बोलून जातो.
बादशहा लिहितो की-
“तुम्ही (जुल्फिकारखान) लिहिलेल्या पत्रात पुढील मजकूर आहे : जहागीर तनखा न मिळाल्यामुळे
राव कान्हू (कान्होजी शिर्के) हा अस्वस्थ आहे. जहागिरीसंबंधी त्याची विनंती तुम्ही पाठविली आहे. बादशहांनी आज्ञा केली की, दोन्ही परगण्यांचा (जहागीर म्हणून मागितलेल्या, यांत मंगळवेढे असावे.) वसूल काय आहे हे कळविण्यात यावे. कान्होजी हा तळकोकणचा आहे. तेथे त्याला वतन देता येईल. तनख्यास अनुसरून कान्होजीपाशी पुरेसे पथक नाही.
कान्होजीने विनंती केली आहे की, “मी निवृत्त होईन, एका कोपऱ्यात जेथे मला वाटेल तेथे मी जाऊन राहीन. मला कोणी त्रास देऊ नये. मी बसल्या ठिकाणाहून बादशहाचे इष्ट करीन.”
बादशहांनी यावर आज्ञा केली की, “बरे झाले पीडा गेली.(खस कम जहां पाक) कचरा नष्ट झाला. वातावरण स्वच्छ झाले. कान्होजीला बडतर्फ करण्यात यावे.”(अहकामे आलमगिरी)
असो,
मोगलांच्या सेवेत असलेल्या कान्होजी शिर्के याच्या संबंधीचे औरंगजेब बादशहाचे हे उद्गार मोठे बोलके आहेत. खरे तर बादशहाला शंभूराजांच्या पक्षातील सरदार केवळ फोडून त्यांची शक्ती कमी करायची होती. कान्होजी शिर्के येथे एक उदाहरण आहे. यांच्यासारखीच गत निंबाळकर, माने, मोरे, पांढरे अशा अनेक सरदारांची झाली. या मराठा सरदारांची बादशहाने कधीच किंमत केली नाही. खुद्द बादशहाच्या बोलण्यावरून हे सरदार त्याच्यासाठी म्हणजे छावणीतील ‘खस’ होय.
छत्रपती राजाराम- ताराबाईंचा पक्ष बलवत्तर झाल्यावर ही सर्व मंडळी पुनश्च स्वराज्यात सामील झाली..!
शेवटी सत्ता ही सर्वश्रेष्ठ आणि राजकारण अक्षय्य..! अशी ही व्यवहार नीती जपणारी मंडळी. मात्र निष्ठा ही व्यवहारातून निर्माण होत नाही, ती व्यक्त होते त्यागातून आणि बलिदानातून...म्हाळोजी घोरपडे आणि कवी कलश यांच्याप्रमाणे..!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।
Faktitihas, Ganoji Shirke, Kanhoji Shirke
Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..
Popular Posts
कोंडाजी फर्जंद - बेखौफ छत्रपतीचा दिलफेक योद्धा...
- Get link
- X
- Other Apps
किल्ले बाळापूर-वर्हाडातील शंभूराजांची जहागीर
- Get link
- X
- Other Apps
एक सहज चिंतन- महाराज आणि शाहिस्तेखान
- Get link
- X
- Other Apps
अद्भूत साक्षात्कार- लोणार...
- Get link
- X
- Other Apps
हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा...३७१ वर्षांपूर्वी चा तो दिव्य संकल्प
- Get link
- X
- Other Apps
जानेफळ: इतिहास पुरुषांच्या भेटीचा दुर्लभ योग..!
- Get link
- X
- Other Apps
श्रीवर्धन- हरिहरेश्वर एक नयनरम्य भेट..
- Get link
- X
- Other Apps
अज्ञातवासातील बार्शी टाकळी येथील कालिंका देवी मंदिर-
- Get link
- X
- Other Apps
गणपतीचा वाडा:शतकापूर्वीचा गणेशोत्सव- मैराळडोह
- Get link
- X
- Other Apps
राजुरा: स्त्रीशक्तीचा शौर्य स्तंभ'
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट