Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

वाशीम जिल्ह्यातील ब्रिटिश स्थापत्यच्या आठवणी...





मित्रांनो, वाशिम, मेहकर व कारंजा ही ब्रिटिशकालीन शहरे. ब्रिटिशकालीन कारंजा मेहकर या तत्कालीन डाक मार्गावरील एक डाग घर (rest house) म्हणजे चांडस येथे असलेली ब्रिटिश कालीन इमारत होय. 

ब्रिटिश अधिकाऱ्याच्या प्रवास मार्गातील या प्रशासकीय दप्तरात प्रशासकीय कामाबरोबर राहण्याची सोय होत असे.

मालेगाव वाशिम रोडवर सुद्धा अमानी तसेच मालेगाव अकोला रोडवर मेडशी येथेही डाग घर इमारती होत्या. पण त्यापैकी मेडशी येथील इमारत संपूर्ण नामशेष झाली असून अमानी येथील इमारत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अमानी येथील इमारतीत बरीच वर्षे पोलिस परिवहन अधिकारी कार्यालय होते. अशा या इमारती काही काळ सार्वजनिक बांधकाम खात्या करिताही वापरण्यात आल्या. मात्र भारतीय दप्तरांच्या जाण्यानंतर तेथील वर्दळ संपली आणि फक्त इतिहास उरला.

प्रस्तुत वास्तू प्रशस्त उंच आणि तत्कालीन ब्रिटिश प्रशासन स्थापत्यची आठवण करून देते. लाकडी छताची उंच दालन, दगडी चौकोनी तळखड्यावर लाकडी खांब अशी इमारतीची वैशिष्ट्ये. इमारतीच्या मागे खंड अवस्थेत काही खोल्या व चर्च सदृश्य इमारत बघायला मिळते.

मेहकर जात असताना बऱ्याचदा हटकून नेहमीच या इमारतीकडे मी बघायला जातो. दरवर्षी ढासळत जाणारी तिची अंगे आता पार संपण्याच्या मार्गावर आहेत.

असो ब्रिटिश स्थापत्याची आणि प्रशासकीय व्यवस्थेची साक्ष देणारी इमारत प्रतीक्षेत आहे मातीच्या मिठीत जाण्यासाठी..! शेवटी इतिहास आहे, कधी वाचून तर कधी अनुभवून जगण्याचा..! आणि इतिहास ब्रिटिशांचा असला तरी काय झालं माती तर आमची आहे.!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।





#faktitihas, #washim

वाशीम जिल्ह्यातील ब्रिटिश कालखुना- जेव्हा थडगं बोलू लागतं..

वाशीम जिल्ह्यातील ब्रिटिश कालीन बंगला





Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts