Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

शंभूराजेकालिन हनुमंताचे देवालय व रामनवमी उत्सव


छत्रपति शंभुराजे संत-सज्जनांचा व धर्म संस्कृतीचा नितांत आदर करीत.
समर्थांच्या निर्वाणानंतर त्यांच्या चितास्थानी हनुमंताचे देवालय बांधण्याचा आदेश शंभूराजांनी आपल्या अधिकाऱ्यास दिला होता.
त्यासाठी त्यांनी कर्णाटकातून मूर्ती बोलाविली होती.
देवालयासाठी, नित्यपूजेसाठी व समर्थ शिष्यांसाठी राजांनी खर्चाची मोईन मुक्रर केली.  दिवाकर गोसावी यांच्या विद्यमाने हा खर्च करीत जावा असा आदेश त्यांनी जावळीचा देशाधिकारी कासी रंगनाथ यास १३ मार्च १६८२ रोजी दिला.
श्री समर्थ स्थापित चाफळ येथील श्रीराममूर्ती

तसेच रामनवमीचा उत्सव चाफळ किंवा सज्जनगडी व्हावा याविषयी दिवाकर गोसावी व उद्धव गोसावी यांच्यात एकमत होत नव्हते. मात्र राजांनी रामनवमीचा उत्सव समर्थांनी ठरविल्याप्रमाणे नित्यनियमाने चाफळ येथेच होईल असा निर्वाळा दिला. तसे सज्जनगडाच्या जिजोजी काटकर या हवालदारास व दिवाकर गोसावी यांना कळविले.
ते पत्र -
शंभु छत्रपती- वेदमुर्ती दिवाकर गोसावी
श्रीस्वामि सज्जनगडी पूर्णावतार केला. ते स्थली हनुमंताचे देवालय करवीले आहे...सुबासुबाहून धर्मादाये ईनाम देविला तो आणऊन देवास व समुदायास पाववीत जाणे. श्रीरघुनाथ देवालय चाफळी आहे, तेथिल नित्यपूजा व रथोत्सव सनदेप्रमाणे येथासांग करीत जाणे.

श्री समर्थ समाधी सज्जनगड


संदर्भ- संभाजीराजे पत्र क्र. ६७
||फक्तइतिहास||

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts