आपला पक्ष वाढवत असताना हिटलरला या काळात स्ट्रासर हा प्रतीस्पर्धी निर्माण झाला होता. हिटलर लॅन्डसबर्ग तुरूंगात असताना नाझी संगटनेत ग्रेगार स्ट्रासर या तरूणाचे प्रस्त बरेच वाढले होते.
आपल्या पक्षिकासाठी स्ट्रासरने आणखी एक सहकारी निवडला. ऱ्हाइनलँडमधून आलेल्या या तरूनाच नाव होते पाॅल जोसेफ गोबेल्स. हिटलरच्या प्रचारयंत्रणेचा हाच तो जगदविख्यात अधिकारी.
गोबेल्सचा जन्म १८९७ साली झाला. त्याचा बाप गिरणीत फोरमन होता. वयाच्या २४ व्या वर्षी त्याने हायलेडबर्ग विश्वविद्यालयातून पि.एच्.डी मिळविली. डॉ गोबेल्स तसा बुटका व सामान्य यष्ठीचा होता. तो पायाने अधू होता. १९२२ साली त्याने प्रथम हिटलरचे भाषण एेकले व तो नाझी पक्षाकडे खेचला गेला. पहिली तीन वर्षे त्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते मात्र एकदा स्ट्रासरने त्याला सभेत भाषण करताना बघितले. तेव्हा गोबेल्सचा प्रचारकार्यासाठी उपयोग करण्याचे त्याने ठरविले. शिवाय गोबेल्सचे विशवविद्यालयीन शिक्षणही पूर्ण झालेले होते. संघटणेत तोच सर्वात जास्त शिक्षित होता. शिवाय स्ट्रासरलाही चांगला सहाय्यक हवाच होता. म्हणून त्याने गोबेल्सला पुढे केले.
गोबेल्सला लॅटिन व ग्रीक भाषांचे चांगले ज्ञान होते. तत्वज्ञान, इतिहास व वाड्मय हे त्याचे विषय. त्याने Michel ही कादंबरी तसेच Wanderer व Lonesome Guest ही कलानाटके लिहली. एवढे गुण असूनही वृत्तपत्रव्यवसायात शिरण्याचे त्याचे प्रयत्न फोल ठरले. त्याला कारण त्याच्या पायाचा आजार. वयाच्या सतराव्या वर्षी त्याच्या डाव्या पायाचे हाड झडू लागले.(osteomyelitis) शस्त्रक्रिया विफल ठरल्याने तो पाय आखूड झाला. त्यामुळे युद्धातही त्याला भाग घेता आला नाही.
असो, पायात व्यंग असल्याने महत्वकांक्षेचा जोर बुद्धीस देणारा गोबेल्स नाझी पक्षात स्ट्रासरचा सहकारी होता. नाझी पाक्षिकातून तो लिहत असे. पण तोही स्ट्रासरप्रमाणे कट्टर समाजवादी होता. कामगार व पददलित वर्गासाठी झटणारा हा पक्ष आहे असे तो मानत असे. पण तो जस जसा हिटलरच्या समिप गेला तसा तो त्याचा विरोधक बनला. पण पुढे त्याच्यात असा काही बदल झाला ज्याने तो हिटलरभक्त बनला.
ते झाले असे की, १९२५ मध्ये जर्मनीतील मोठ्या जहागीऱ्या व वतने नष्ट करावी यासाठी कम्युनिस्टांनी चळवळ आरंभिली होती. गोबेल्स व स्ट्रासर हे समाजवादी असल्याने त्यांनी कम्युनिस्टांना सहकार्य देण्याचे ठरवले होते. पण या चळवळीस नाझी पक्षाने पाठींबा द्यावा की नाही हा प्रश्न सर्वानुमते सभेत ठरवला जाणार होता.
मात्र बाब अशी होती की नाझी पक्षाला द्रव्यसहाय्य देणारे बरेच मिरासदार-जहागिरदार होते. मग त्यांचाच पैसा खाऊन वतने नष्ट करायला पक्ष कसे सांगणार ? राजकारण हे असेच असते, जे दिसते तसे नसते.
प्रश्नाचा निकाल लावण्याकरिता स्ट्रासरने पक्ष सदस्यांची सभा बोलावली. २२/११/१९२५ रोजी झालेल्या सभेत हिटलरल हजर राहिला नाही. त्याने धूर्तपणे आपला प्रतिनिधि पाठविला. सभेत कम्युनिस्टांना सहकार्य देण्याचे ठरवण्यात आले. गोबेल्स तर रागाने म्हणाला- हिटलरला पक्षातूनच काढून टाका...!!!"
हिटलरलने हे फक्त बघितले. अखेर गोबेल्स बच्चा होता. हिटलरचा अात्मविश्वास जबरदस्त होता. त्याने चार महिन्यात बामबर्ग' येथे पक्षाची सभा पुन्हा बोलाविली. या सभेला स्ट्रासर व गोबेल्स हजर राहीले. हिटलरने भाषणातुन सभा जिंकली. मात्र गोबेल्स ला धक्काच बसला. त्यादिवशी त्याने अापल्या डायरीत लिहीले -
"...हिटलर दोन तास बोलत होता. कोणीतरी माझ्यावर प्रहार करावे तसे मला वाटले. हा हिटलर अाहे तरी कसा ? त्याची मते ,सारेच भयानक...!
पण असे असुनही हिटलरने गोबेल्सला जिंकले. पक्ष्यात मोठेपणा मिळाला कि भलेभले पगड्या फिरवतात, हा राजकारणातला अनुभव अर्थातच हिटलरला माहीत होता. त्याने लगेच म्युनिच येथे होणाऱ्या सभेत बोलण्यासाठी गोबेल्सची निवड केली. या सभेत हिटलर नंतर फक्त गोबेल्सच बोलणार होता. आणि मात्रा अचूक लागली!!!
आपला हा केवढा मोठा सन्मान असे गोबेल्सला वाटू लागले. त्याने आपल्या डायरीत लिहीले-
"....आज हिटलरचे पत्र आले. उद्याच्या सभेत मी बोलणार आहे. माझे हृदय इतक्या जोराने स्पंदन करीत आहे की, ते फुटेल की काय असे वाटते...."
८ एप्रिल रोजी सभा झाली. त्यादिवशीच गोबेल्सने डायरीत लिहीले-
"...मी बोलायला उभा राहिलो, हिटलर शेजारी होता. मी उभा राहताच टाळ्यांनी प्रचंड स्वागत झाले. भाषण संपले तेव्हा हिटलरने मला मिठी मारली.."
आणि एेकेकाळचा हिटलरद्वेष्ठा गोबेल्स काही दिवसातच त्याचा भक्त बनला. २० एप्रिल रोजी हिटलरच्या जन्मदिवशी त्याला पाठवलेल्या पत्रात गोबेल्सने लिहले-
"मी तुमच्याकडून पुष्कळ शिकलो आहे.."
एवढेच नाहीतर पक्षाच्या वृत्तपत्रात(,Voelkische Beobachter) लेख लिहून त्याने स्ट्रासर लाईन सोडल्याचे जाहिर केले.
१९२५ च्या ऑक्टोबर मध्ये हिटलरने गोबेल्सला बर्लीन येथे संघटनेतील उच्च अधिकारपद दिले. आणि आता खुद्द त्यालाच बर्लीन मधिल कम्युनिस्टांचा व सोशालिस्टांचा दाब मोडून काढण्याची महत्वाची कामगिरी देण्यात आली. आपल्या जबरदस्त प्रचार यंत्रणेने गोबेल्सने हिटलरला जर्मनीचा प्रेषित बनविले. पुढे १९३३ मध्ये हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर बनल्यावर हा गोबेल्स त्याचा प्रचारमंत्री म्हणून काम पाहू लागला. असा तो डॉ गोबेल्स! स्ट्रासर पून्हा कधितरी.
आधार- कानिटकर व वाळींबे यांचे ग्रंथ
नाझी भस्मासूराचा उदयास्त, हिटलर, वार्सा ते हिरोशिमा
||फक्तइतिहास||
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete