जोझिला !
ला अर्थात खिंड! हिमालयाच्या कुशीत एक तरूण मुलगा ओठातून शीटी मारत, दगड फेकत स्वच्छंदपणे या भागातून जात होता. चौकीवर असलेले पाकीस्तानी सैनिक या मुलाकडे, हा मुर्ख येथे काय करत असावा ? या नजरेने बघत होते. पण हा तरूण वाटल्याप्रमाणे कुणी माथेफिरू नव्हता. इतरांना मुर्ख बनवणारा तो खरा डोकेबाज होता. चक्क भारतीय सैनिकांसाठी तो काही दारूगोळा आपल्या ब्लँकेटमध्ये लपवून नेत होता. एवढ्या जोखिमीचे काम करताना मात्र मोठ्या हुशारीने पाकीस्तानी सैनिकांना संशय येऊ नये म्हणून शीटी मारत, दगड फेकत आपण माथेफिरू असल्याचे भासवीत होता. जोझिला खिंडीच्या भागातील एका भारतीय चौकीवरचा दारूगोळा संपला होता. अन् तेथून भारतीय लष्कराचा मुख्य तळ ४०० मीटरवर होता, पण रस्त्यात पाकची चौकी होती. विनादारूगोळ्याने हालाखित पडलेल्या त्या चौकीवर या तरूणाने मात्र मुख्य तळावरूण दारूगोळा पोचवला होता.
जोझिला खिंड तब्बल १२ हजार फुट उंच! मात्र अतिशय अरूंद अशीच. १४ ऑगस्ट (१९४८) रोजीच घुसखोरांनी जोझिलापर्यंत मजल मारून ते ताब्यात घेतले होते. जोझिलाच्या एका कडेला उंच असा चबुतरा रिज तर दुसऱ्या बाजूला उत्तुंग असा मुकंद रिज होता. दोन्ही पहाडींवर शत्रू अत्याधुनिक शस्त्रे घेऊन दबा धरून होता. स्कार्दू जिंकल्यावर पाकीस्तानने लेह जिंकण्यासाठी जोझिलावर लक्ष केंद्रीत केले होते. दुसरीकडे भारताला हिवाळा सुरू होण्यापूर्वी जोझिला खिंड ताब्यात घेणे भाग होते. कारण एकदा हिवाळा सुरू झाला की मग मार्च पर्यंत कोणतीही लष्करी कारवाई शक्य नव्हती. आणि त्या काळात शत्रू आपली शक्ती वाढवून मजबूत होणार हे नक्की. त्यामुळे भारताला कोणत्याही परिस्थितीत हिवाळा सुरू होण्यापूर्वी जोझिलावर तिरंगा फडकवायचा होता. आणि ही जोखिम सोपवण्यात आली होती- ७७ पॅरा ब्रिगेडचे ब्रिगेडीयर अटल यांच्यावर!
ऑगस्ट च्या शेवटी जोझिलाच्या पायथ्याशी बालटाल येथे भारतीय सौन्याची जमवाजमव सुरू झाली होती. जोझिलाच्या दोन्ही बाजूंनी हल्ला करण्याचे ब्रिगेडीयर अटल यांनी योजीले होते. मनालीहून रवाना करण्यात आलेल्या कॉलमला 'चपाती कॉलम' हे सांकेतीक नाव देण्यात आले होते. यात चारशे खेचरे व १००० हमाल होते. तर लेहवरून याच सुमारास 'अर्जुन कॉलम' रवाना करण्यात आला होता.
जोझिलाच्या चबुतर रिजवर शत्रू ३.४ इंची लहान तोफा, ३.७ इंचाच्या होवित्झर तोफा व मशिनगन्स होत्या. शेजारच्या 'मशिनगन रिजवरही' शत्रूचा ताबा होता. एकूण तोफ-मशिनगन्सने युक्त असलेला शत्रू १६ हज्जार फुट उंचावर होता तर त्याचा सामना करावयास निधड्या छातीचा भारतीय सौनिक सपाट मैदानात लढणार होता. जोझिला खिंड ताब्यात घेण्यासाठी हे युद्ध त्यांना द्ंकणे भाग होते!
ब्रिगेडीयर अटल आपल्या योजनेवर अखेरचा हात फिरवीत होते. ठरल्याप्रमाणे गोरखा रेजीमेंटने बोलकुलवरून द्रासमार्गे चबुतरा रिजवर हल्ला चढवायचा होता. तर जाट व मराठा रेजीमेंट जोझिलाच्या मुकंद रिजवर हल्ला करणार होती. मात्र याचवेळी शत्रूचे लक्ष अन्यत्र वेधण्यासाठी खानाबल येथे असलेली ५/११ गोरखांची एक कंपनी सुरूमार्गे कारगीलला जाऊन कारवाई करणार होती.
३ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता भारतीय सैन्याचे जोझिला जिंकण्यासाठी ऑपरेशन "डक' सुरू झाले. ठरल्याप्रमाणे गोरखा, जाट व मराठा रेजीमेंट निघाल्या होत्या.
गोरखांनी बोटकुलगंज खिंड ताब्यात घेतली होती, मराठ्यांनीही आपले लक्ष गाठले होते. तर मुख्य कॉलम जोझिलाकडे सरकत होता. अटलने शत्रूला चकवण्यासाठी सुरू-कारगीलकडे पाठवलेला कॉलमही चांगली प्रगती करत होता. पण नेमके याच क्षणी एक प्रतीकूल घटणा घडली. डाव्या बाजूने जोझिलावर कूच करीत असलेल्या गोरखा रेजीमेंट समोर एक प्रचंड हिमनदी आडवी आली. त्यांना पुढे जाता येत नव्हते. त्यातच दुसरीकडे शत्रूने पून्हा काही जागा काबीज करून मराठ्यांनाही हटवीले होते. ऑपरेशन डक' ला हा मोठा सुरूंग लागवा होता. ब्रिगेडीयर अटलने गोरखांची एक कंपनी कोटकुलात ठेऊन बाकी सैन्य बालटालच्या तळावर गोळा केले होते. जोझिलावर नव्याने हल्ला करण्याची योजना तयार झाली होती. मुख्य हल्ला मराठा व जाट करणार होते तर गोरखा राखिव राहणार होते. या पायदळाच्या मदतीला तोफखाना व वायुदलाची मदत येणार होती. १२ सप्टेंबरला ऑपरेशन डक' पून्हा सुरू होणार होते.
यावेळी मुकंद रिज जिंकण्याची जबाबदारी ५-मराठावर होती. कारण पहिल्या हल्ल्यात त्यांना या भागाची ओळख झाली होती. तर उजवी टेकडी- चबूतरा रिजवर ३-जाट हल्ला करणार होती.
१२ सप्टेंबर, कारवाईचा दिवस उजाडला. सकाळी ९ पासून पावसाला व हिमवर्षावास सुरूवात झाली होती. यामुळे स्वारीचा बेत एक दिवस पुढे ढकलण्यात आला. १३ सप्टेंबरच्या रात्री१० वाजता मराठा व जाट सैन्ये आपापल्या तळावरून निघाले. मराठ्यांना प्रतिकार होत नव्हता. मात्र काळोखात एक गफलत होऊन गेली. टेकडीचे एक लहान टोक मराठ्यांना शिखर वाटले व त्यावर त्यांनी ताबा मिळवला. पण दिवस उजाडताच शत्रू शिखरावर असल्याचे त्यांना दिसले. पण रणात चूका दुरूस्त होत नसतात. मुकंद रिजवर बसलेल्या शत्रूने त्यांच्यावर जबरदस्त हल्ला सुरू केला.....
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट