२६ फेब्रुवारी १९२४ रोजी मियुनिच येथे बव्हेरीयातील (जर्मनीतील एक प्रांत) सत्ता उलथवून टाकण्याचा कट केल्याच्या आरोपाखाली तीन प्रमुख बंडखोरांवर खटला सुरू झाला. जर्मनीतील आणि जगातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांचे प्रतिनिधी या खटल्याचा वृत्तांत घेण्यासाठी म्युनिचला जमले होते. तीन आरोप कोर्टात हजर होते. ते म्हणजे लुडेन्डॉर्फ, अॅडॉल्फ हिटलर आणि रोएम. हर्मन गोअरींग व रूडॉल्फ हेस हे दोघे ऑस्ट्रीयात पळून गेले होते. न्यायाच्या कामकाजाला सुरूवात होताच हिटलरने न्यायालयाला सांगितले-
'झालेल्या घटणेची सर्व जबाबदारी माझी एकट्याची आहे, असे असले तरी मी केलेली गोष्ट दुष्कृत्यात जमा होऊच शकत नाही. १९१८ साली ज्यांनी जर्मन देशाशी हरामखोरी केली, त्याच्याविरूद्ध उठावणी करणे हा देशद्रोह कसा असू शकेल ?
ज्या घटणेची जबाबदारी हिटलर स्वीकारत होता ती घटणा घडून आता चार महिने उलटले होते. ८ नोव्हेंबर १९२३ रोजी हिटलरने आपल्या नाझी स्वयंसेवकांसह सरकारी इमारतीला गराडा घातला होता. इमारतीच्या व्यासपिठावर जाऊन त्याने तख्तपोशीकडे रिव्हॉल्वर झाडून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले व गर्जना केली-
"६०० सशस्त्र स्वयंसेवकांनी इमारतीला गराडा दिलेला आहे. बव्हेरीयन सरकार आम्ही बडतर्फ केले असून लवकरच क्रांतीकारकांचे सरकार स्थापन होत आहे."
बव्हेरीयन सरकारचे प्रमुख जनरल काहर, लॉसॉव्ह आणि सिसेर यांना बंदुकीच्या धाकावर त्याने बंडास पाठींबा देण्यास भाग पाडले होते. मात्र रात्र उलटताच दुसऱ्या दिवशी या सरकार प्रमुखांनी आपला पाठींबा काढून हिटलरला देशद्रोह गुन्ह्यांतर्गत कैद करवले. हिटलरचे बंड फसले !
मात्र महत्त्वकांक्षी माणसे इतक्या सहजासहजी इतिहासजमा होत नाहीत. राजनितीचे छक्केपंजे त्यास माहित होते. आपल्या अटकेचे त्याने असे भांडवल केले की त्याच्या जोरावर नाझी पक्ष नुसता सावरला नाहीतर वायमर प्रजासत्ताकाच्या उरावर ठाण मांडून बसला.
कोर्टात हजर असलेला तत्कालिन पत्रकार शिरर म्हणतो-
'त्याला नेहमीची चूक करायची इच्छा नव्हती. नेहमी अशा तऱ्हेच्या खटल्यात आरोपी सांगतात की, आम्हाला काही माहीत नाही,आमचा कसला उद्देश नव्हता.. यामुळे मध्यमवर्गीयांच्या अशा कार्याची हानी होते. आपल्या कृत्याचे समर्थन करण्याचे धाडस त्यांच्याजवळ नसते. न्यायाधिशासमोर उभे राहून ते सांगू शकत नाहीत की, हो आम्ही हे केले व हेच करण्याचा आमचा उद्देश होता. आम्हाला हे राज्य उलथवायचे होते.'
पण हिटलरने हे केले !
जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या या खटल्यात हिटलरने ताठपणे सांगीतले., "मी एकटा सर्व जबाबदारी स्वीकारतो परंतु यामुळे मी गुन्हेगार ठरत नाही. १९१८ च्या देशद्रोह्यांविरूद्ध केलेला उठाव हा गुन्हाच ठरू शकत नाही."
तसेच हिटलरने बव्हेरीयन सरकारचे प्रमुख जनरल काहर, लॉसॉव्ह आणि सिसेर यांना उद्देशून हिटलर म्हणाला- आम्ही गुन्हेगार तर आम्हाला पाठींबा देणारे हे तीघे कोण?
हिटलरला उत्तर देताना जनरल लॉसॉव्ह याने कोर्टाला सांगीतले की,
"या डोके फिरलेल्या, पूर्वी सैन्यात ढोल बडवणाऱ्या माणसाशी संगनमत करून कट करायला मी काही बेकार सैनिक नव्हतो. एका राज्य सरकारचा मी सैन्यप्रमुख आहे. सरकारचा मंत्री आहे."
या हेटाळणीला हिटलरने भर कोर्टात चपराक दिली व म्हणला-
"माझ्यावर विश्वास ठेवा. एखादे मंत्रीपद मिळवणे एवढ्याच एका क्षुल्लक गोष्टीकरता आयुष्यात कष्ट करणारा मी नाही. एखाद्या माणसाने केवळ मंत्री होउन इतिहासजमा व्हावे यात कसला मोठेपणा आहे ? न जाणे एखाद्या वेळेस मला मरणानंतर एखाद्या मंत्र्याशेजारीच पुरले न जावे म्हणजे मिळवली., तीच एक भीती आहे. माझे ध्येय यापेक्षा खूपच मोठे आहे. मी हे करीन आणि यात यश आले तर त्यापुढे मंत्रीपद मला तरी अतिक्षुद्र वाटेल."
पुढे बोलताना हिटलर म्हणाला-
"मी जेव्हा प्रथम रिचर्ड वॅगनरच्या थडग्याजवळ उभा राहिलो, तेव्हा या माणसाविषयीच्या आदराने भारावून गेलो होतो. त्याने आपल्या थडग्यावर आपली बिरूदे लिहण्यास मरण्यापूर्वीच मनाई केली होती. फक्त 'वॅग्नर' या साध्या नावात सर्वकाही आहे. काय आहे त्या बिरूदावलीत ? मी पूर्वी लष्करात ड्रमर होतो यात लाज कसली ? मी वॅगनरचे संगीत वाजवीत होतो. या थोर संगीतज्ज्ञाशी माझा यामुळे संबंध आला यातच मी धन्य झालो !'
अखेरीस हिटलर न्यायाधिशांवर आपली नजर रोखून म्हणाला-
" महाराज, आमचा न्याय करणारे, आपण हो कोण ! इतिहासिद्ध न्यायदेवतेने हा न्याय केव्हाच करून ठेवला आहे !"
हिटलर तुरुंगात एक राजकीय कैदी म्हणून होता. त्यामुळे त्याला वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. याच काळात त्यानं एक पुस्तक लिहण्याचं ठरवलं. सुरूवातील त्याने स्वत: पुस्तक टाईप केलं पण नंतर त्याला याचा कंटाळा आला. अशातच रूडॉल्फ हेस हा पण कारागृहात आल्याने काम सोपे झाले.
पुढे हेच पुस्तक हिटलरचं आत्मचरित्र म्हणून प्रसिद्ध झालं. नाव होतं 'MEIN KAMPF' माझा लढा. सहा महिन्यानंतर नियमानुसार पॅरोलवर त्याची सुटका झाली. आणि आपला लढा त्याने पुनश्च सुरू ठेवला.
Mein kamf
नाझी भस्मासूराचा उदयास्त
मित्रांनो, हिटलर भस्मासूर होण्यापूर्वी त्याचा त्याग व राष्ट्रभक्ती अभ्यासण्यासारखी अशीच आहे. म्हणूनच कधी भस्मासूराची चरित्रे हाताळावी लागतात ती मानूस म्हणून..!
||फक्तइतिहास||
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट