Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

इतिहास नाही तो गुरूच..!

नेपोलियन बोनापार्ट याने सेंट हेलेना बेटावर कारावासात असताना आपल्या मुलाला जे अखेरचे पत्र लिहिले त्यात म्हणटले आहे -
"इतिहास नीट मनन करने यासारखा गुरू नाही. ज्याला आयुष्याचे तत्वज्ञान म्हणतात, ते इतिहासाच्या वाचनानेच निर्माण होते."

अडाल्फ हिटलर आपल्या इतिहास शिक्षकविषयी म्हणतो-
"माझे इतिहास शिक्षक Dr.Leopold मला लाभले हे माझे सद्भाग्य होय. त्यांची आठवण आली की माझे डोळे पाणावतात."
पस्तीस वर्षांनी म्हणजे 1938 मध्ये जेव्हा हिटलरने आस्ट्रीयाचा कब्जा घेतला तेव्हा तो आस्ट्रीयाच्या दौर्यावर आला होता. त्याला कळले की Dr.Leopold हे क्लागेनफुट" या गावी आहेत. तो त्यांच्या घरी गेला. दोघांनी तासभर जुन्या आठवणी काढल्या. त्यांच्या खोलीबाहेर निघताना हिटलर आपल्या सहकार्यांना म्हणाला-
" या म्हातारबांनी मला जे काही दिल, त्याची तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही."
आपल्या इतिहास शिक्षकाला नम्रपणे भेटून हिटलरने आपल्या सहकार्यांच्या मनात एकच महत्त्वाची गोष्ट बिंबवली ती म्हणजे -
आपला इतिहास वाचला, तर देश वाचेल ।।।।

-Mein kamf
-नाझीभस्मासुराचा उदयास्त (वि.ग.कानीटकर)

||फक्तइतिहास||

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts