Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

वरवंड येथील चुनडे यांचा वाडा-

 


मित्रांनो, जानेफळ(janefal-Mehekar) हे मध्ययुगीन काळातील महत्त्वाचे शहर.! तसेच त्या लगतचा परिसर हा सुद्धा मध्ययुगीन कालखंडाची साक्ष देणारा आहे. प्राचीन मंदिरातून आणि थोराड वाड्यांतून येथील इतिहास अनुभवता येतो. या क्षेत्राचा ऐतिहासिक अभ्यास करत असताना वरवंड येथील एका टोलेजंग वाड्याची भेट मला घडून आली. आता वाड्याची संस्कृती नामशेष झाली असली तरीही काही गावांमध्ये असा एखादा वाडा आपले आयुर्मान टिकवून नव्या काळाच्या आव्हानांना भक्कमपणे दोन हात करत आपली प्रचंड शरीर यष्ठि धारण करत ठासून जमिनीवर खडा आहे.!!

वरवंड हे जानेफळ येथून साधारणपणे पाच किलोमीटर अंतरावर असलेले लहानसे गाव. या गावांमध्ये सुरेश भाऊ चुनडे यांचा वाडा बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहे. 

प्रस्तुत वाडा हा १९ व्या शतकात बांधलेला असून याची पूर्वीचे मालक मूलचंदजी लालचंदजी नहाटा हे या भागातील मोठे जमीनदार होते. त्यानंतर श्री सुरेश भाऊ चुनडे यांच्या आजी सखुबाई चंद्रभान चुनडे यांनी १९७२ मध्ये हा वाडा खरेदी केला.

वाड्याचा विचार करता याचे आकारमान साधारणपणे ५६ बाय ५६ फूट असे आहे. वाडा साधारणपणे दोनशे वर्षे जुना असावा. वाड्याचा पाया संपूर्ण दगडी बांधणीचा असून त्यावर वीट बांधकाम केलेले आहे. या वाड्यामध्ये शेकडा अधिक दरवाजे आणि खिडक्या आहेत. वाडा तीन मजली असून त्याचे छत साधारणपणे ३६० लोखंडी पत्रांनी व्यापलेले आहे. वाड्याला दोन्ही बाजूस दोन असे मुख्य प्रवेशद्वार आहेत. यापैकी एका बाजूस विटांच्या भिंतीमध्ये प्रचंड मोठे लाकडी कलाकुसर असलेले सुंदर द्वार आहे. तर दुसऱ्या बाजूस कमानदार खिडक्यांच्या मधोमध लाकडी कलाकुसरीचे द्वार आहे. या दोन्ही प्रवेशद्वारांवर अतिशय नाजूक लाकडी नक्षी साकारलेली आहे. लाकडी चौकटी सुद्धा बारीक-सारीक नक्षीने ललिभूत आहेत.

प्रवेशद्वारावर चौकटीच्या दोन्ही बाजूस लाकडी अश्वमुख लावलेले आहेत. तसेच उतरत्या छताच्या कोपऱ्यावर लाकडी कोरीव मोर/ बदक शिल्प लावलेली आहे.




या दोन प्रवेशद्वारांशिवाय वाड्याच्या एका बाजूस लाकडी बनावटीचे द्वार आणि त्यावरील गच्ची असे अप्रतिम टावर बनवलेले आहे. या टावर वरील गॅलरी आणि तेथील तीन खिडक्या सुबक कलाकुसरीने नटलेल्या आहेत. वरील गच्ची तोलून धरणाऱ्या समांतर लाकडी स्तंभावर सुद्धा अतिशय सुबक कोरीव काम केलेले आहे. खरे तर एवढे सुबक कोरीव काम पाहिल्यावर कारंजा येथील जैनांच्या काष्टसंघ मंदिराची आठवण होऊन जाते. वाड्याची ही बाजू पाहून त्याच्या गतकालातील ऐश्वर्य संपन्नतेची साक्ष मिळते. 

वाड्याच्या प्रवेशद्वारांना प्रचंड लांब आगळ आहेत. वाड्यात प्रवेश केल्यावर अनेक लागतात त्यापैकी एका भुयारी जिन्याने खाली असलेल्या अंबरखान्याकडे जाता येते. हा अंबरखाना साधारणपणे आठ बाय बारा फूट आकाराचा असून तो जमिनीपासून पंधरा फूट खोल आहे. अंबरखाना किंवा धान्य कोठा हे वाड्याच्या वस्तू रचनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जमिनीखाली खोल भागात असल्याने येथील तापमान वर्षभर सारखी राहते. अर्थात कंट्रोल कंडिशन मध्ये धान्य साठवण्याची ही तत्कालीन वैज्ञानिक पद्धत होय. 

असो, वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दोन्ही बाजूस जिने आहेत. या दोन्ही जिन्याने दोन्ही बाजूच्या दालनांमध्ये जाता येते. या कक्षांपैकी एकामध्ये चंद्र तर दुसऱ्यामध्ये सूर्य देवतेची प्रतिमा भिंतीवर चुन्यामध्ये कोरलेली आहे. याशिवाय चुण्यामध्ये कोरलेला एका घोडेस्वाराचे अंकण केलेले आहे. या दोन्ही कक्षांना सुंदर गॅलरी आहेत जेथून दूर गावाबाहेरील नजारा नजरेस पडतो.



या दोन्ही कक्षांच्या मधोमध एक कक्ष आहे. येथून वरील मजल्यावर जिन्याने जाता येते. एकूणच हे सर्व कक्ष मातीने लेपण्याचे काम आता सुद्धा या कुटुंबाद्वारे केल्या जाते. दुसऱ्या बाजूस असलेल्या कक्षामध्ये सुद्धा गॅलरी आहे. या गॅलरीचे सर्व लाकडी काम सुभकतेने केलेली आहे. येथे एक मुख्य द्वार व छोटी कमानदार गवाक्ष आहेत. सर्व गेणाऱ्यांना अतिशय सुंदर ओतीव बिडाच्या जाळ्या आहेत. असा हा वाडा म्हणजे या परिसरातील एक प्रमुख पुराणपुरुष होय.! वाड्याचे मालक श्री सुरेश भाऊ चुनडे यांच्या सहकार्याबद्दल मनस्वी आभार..!








मित्रांनो, ब्रिटिश काळाच्या उत्तरार्धात गावागावातील प्रतिष्ठितांनी आपला सरंजाम आणि ऐश्वर्या व्यक्त करण्यासाठी अशा भव्यवाड्यांची निर्मिती केली. तत्कालीन वैशिष्ट्यपूर्ण वास्तुशिल्प रचना, वास्तू कला, सुरक्षा, एकत्रित कुटुंब पद्धती आणि लोकसंस्कृतीचे सार्थ दर्शन या वाड्यातून होते.!

नेत्ररुपी आपल्या असंख्य कमानदार गवाक्षांतून आणि पांढऱ्या कायेतून, चंद्र-सूर्य प्रतिमेतून आणि टोलेजंग टॉवर मधून, काळजात शिरणाऱ्या भुयारातून आणि अंगा खांद्यावर तोलून धरलेल्या अनेक गॅलरी मधून हा इतिहास पुरुष आजही सिंहाप्रमाणे व्यक्त होतो आहे.!

२२-५-२०२५

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

Comments

  1. Dhiraj Rajendra NahataMay 25, 2025 at 1:40 PM

    अतिशय सुंदर वर्णन या वाड्या बद्दल केलेलं आहे. यात काही शंका नाही.
    सोबत काही गोष्टीचा यामधे उलेख करावा, असं माझं वैयक्तक मत आहे!
    जसं की हा वाडा कोनी बांधला?यामधे कोण कोण वास्तव्यास होते?कोणत्या वर्षी हा वाडा हस्तांतरित झाला?
    कारण की ज्यांनी बांधला त्यांना पण याच श्रेय जात !
    नाहीं तर इतिहास पूर्ण कळणार कसा?
    हा तर अर्धवट इतिहास होईल.

    ReplyDelete
    Replies
    1. हा वाडा श्री लालचंद जी नहाटा यांनी बांधला आहे, त्यांचा उल्लेख केलेला आहे मात्र बांधकामाविषयी माहिती प्राप्त झाली नसल्याने टाकता आली नाही.

      Delete
  2. खूप छान प्रकारे वाड्याचे वर्णन केलेले आहे

    ReplyDelete
  3. खूप सुंदर प्रकारे वाड्याचे वर्णन केलेले आहे खरंच याद्वारे जुन्या वास्तू का बांधण्यात आल्या होत्या त्यांची रचना कशी केली होती त्या काळात देखील त्यांनी कसा वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवला होता यामार्फत सर्वच अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये सामोरे येते. नवीन पिढीला जुन्या वास्तु विषयी आवड होण्यासाठी, इतिहासाची जागृती व रुची निर्माण होण्याकरता हे अत्यंत उपयुक्त आहे. 🙏🏻💐💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. आपले मनस्वी धन्यवाद

      Delete
    2. नेहमी प्रमाणेच अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून या वाड्या विषयी माहिती दिली.धन्यवाद सर.

      Delete
    3. खरोखर खूप छान वर्णन केले आहे वाडा जसा आहे तसेच हुबेहूब वर्णन केले आहे खूप खूप धन्यवाद सर

      Delete
  4. श्री लालचंद जी नाहटा है त्या काळचे जज न्यायाधीश होते व त्या काळात वरवंड हे गाँव खुप समृद्ध होते जुने जानते लोक यांच्या बाबतीत खुप एकावे असे वाटते त्याचे राहनीमान व काम करण्याचे धाडस खुप चांगले होते त्या काळात ही वास्तु तैयार करण्यात आली ती आज पर्यंत पन चांगली आहे आधुनिक युगात सीमेंट चे बांधकाम होतात पन त्या मधे समस्या खुप आहेत आता तरी या जुन्या बांधकाम चे संशोधन होऊन त्या मधून नवीन कही तरी निघावे या आपन केलेल्या हवेली चे संशोधन व रेखाचित्र खुप छान आहे आपले मनस्वी अभिनंदन भाऊ

    ReplyDelete
  5. निलेश नाहटा

    ReplyDelete
  6. Old is always Gold Very nice photo graphy and captured all small small detailing in this Era House and Bahut hi sunder Explanation diye hai Is puratini House ka 😊

    ReplyDelete

Post a Comment

... मग कशी वाटली पोस्ट

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts