Search This Blog
बाजे लष्कराच्या ये छावणीत आपले स्वागत असे हुजूर..
- छावणी
- सफर माझी स्थळांची
- अज्ञातवासातील बार्शी टाकळी येथील कालिंका देवी मंदिर जिल्हा अकोला
- अद्भूत साक्षात्कार- लोणार.!(जिल्हा बुलढाणा)
- कलेचा अप्रतिम नमुना साकेगाव येथील साकेश्वर मंदीर(जिल्हा बुलडाणा)
- भेट कवी कलश यांच्या वाड्याला(जिल्हा कोल्हापूर)
- कान्नव बंगला-कारंजा येथील एका पुराण पुरूषाची भेट(जिल्हा अकोला)
- किल्ले बाळापूर-शंभुराजांची वर्हाडातील जहागीर(जिल्हा अकोला)
- जेव्हा थडगं बोलू लागतं-वाशीम येथील एका ब्रिटिश कालीन SP'चे घाडगे(जिल्हा वाशिम)
- टोका येथील सिद्धेश्वर मंदिर-उत्तरेतील शिल्पकलेचा आविष्कार(जिल्हा औरंगाबाद)
- किल्ले बाणकोट-कथा सांगतोय आर्थर पॉईंट ची
- रेवदंडा व कोरलाई-पोर्तुगीज खंडारे नव्हे ती आमुची शौर्य प्रतीके(जिल्हा रत्नागिरी)
- भुलेश्वर-माळशिरस एक अप्रतिम अनुभव(जिल्हा पुणे)
- स्त्रीशक्तीचा शौर्य स्तंभ-राजुरा (जिल्हा वाशिम)
- श्रीवर्धन हरिहरेश्वर-एक नयनरम्य भेट!
- सातगाव भुसारी मंदिर समूह (जिल्हा बुलढाणा)
- केशवाची एक प्राचीन मूर्ती: कुपटा (जिल्हा वाशिम)
- गणपतीचा वाडा:मैराळडोह-शतकापूर्वीचा दिव्य संकल्प(जिल्हा वाशिम)
- अमृतेश्वर-रतनगडाजवळील शिल्पाविष्कार(जिल्हा नगर)
- अंतरिक्ष पार्श्वनाथ-शिरपूरचे दिव्यत्व (जिल्हा वाशिम)
- दख्खन तक्त: अर्थात भेट जिंजी किल्ल्याची
- शिवपराक्रमाचा साक्षीदार वेल्लोरचा भुईकोट
- मेहकर येथील मध्ययुगीन दत्त मंदिर (जिल्हा बुलढाणा)
- for new title
- सफर माझी दस्तावेजांची
- एक सहज चिंतन: महाराज आणि शाहिस्तेखान
- औरंगजेब बादशहा इराणच्या बादशहाकडे राजदूत पाठवतो तेव्हा..
- आग्र्याच्या दरबारात शिवशंभू
- 'अहकामे आलमगिरी' अर्थात आलमगिराची आज्ञापत्रे
- इतिहासातील दारूबंदीची एक गमतीदार गोष्ट
- मोहम्मद अली जिना यांचे शेवटचे दिवस
- एक होता रोमेल: दुसऱ्या महायुद्धातील एका तेजस्वी सेनापतीची कथा
- शिवछत्र साल भेटीतून पुण्यातील NDA चे बीजारोपण
- कोंडाजी फर्जंद: बेखोफ छत्रपतिचा दिलफेक योद्धा!
- गुलामितून मुक्ती
- चाकणचा वेढा आणि फ्रान्सचा व्यापारी
- राजश्री साहेबांचे शासन:छत्रपती शंभूराजांचे सर्जेराव जेधे यांना ताकीद पत्र.!
- छत्रपतींनी केला सप्तकोटेश्वराचे जीर्णोद्धार
- छत्रपती शंभुराजे विरचित बुधभूषण-||सरोवरस्य||
- कसा होता टिपू सुलतान..?
- बेइमानीची कथा सांगतो कोथळीगड
- पानिपताच्या अंतरंगातील काही..
- पानिपताचे आवतन देणारा थोर धर्मशास्त्रज्ञ शहावली उल्लाह
- दारा शिकोह: एक पुण्यस्मरण..
- दक्षिण दिग्विजयाचे राजकारण-परराष्ट्र धोरणाचा अनोखा नमुना
- निजामाची विनोदी कथा-हुक्का आणि कॉफीची
- पारगड-चंद्रसूर्य असेतो गड जागता ठेवा!
- रणधूरंदर बाजीराव-भूमि कठीण आणि आकाश दूर!!
- समर्थांचे मनाचे श्लोक आणि मन-समजावंन
- मुल्ला मसीहाचे फारसी रामायण
- युद्धाची बारूद शत्रूच्या गोटात-कुलमुखत्यार राणीयेसूबाई साहेब
- महाराज चीनकडे लक्ष ठेवून आहेत!!
- वडले राजिक-छत्रपती शंभुराजांची गोवा मोहीम!
- सकल शास्त्राचा निशा- राजा सरफोजी भोसले तंजावर
- छत्रपती शिवाजी महाराजांचे मोगलांना खरमरीत उत्तर!!
- शिवरायांची राजनीति शत्रू मध्ये भेद-शिवरायांच्या इंटेलिजन्सची एक कथा!
- कथा पिता-पुत्राची:रामपूरच्या चंद्रावत राजांची!
- वीर सावरकर-युद्धाची बारूद शत्रूच्या शिबिरात!
- समकालीन फारशी साधनातून घडणारे दिव्य शिवदर्शन!
- सावनूरचे नवाब माधवराव पेशव्यांचे मामा..?
- हे राज्य व्हावे ही श्रींची ईच्छा-३७१ वर्षापूर्वीचा दिव्य संकल्प!
- मार्मिक भाष्यकार भीमसेन सक्सेना
- Sub Tab
Featured
- Get link
- X
- Other Apps
टाकळी ढोकेश्वर लेणी..
मित्रांनो,
सातव्या शतकानंतर दख्खनमध्ये राष्ट्रकूटांच्या स्थापनेनंतर शैव परंपरेला प्रमुख आधार मिळाला. कैलास लेणं हे त्यातील प्रमुख.! मात्र त्यापूर्वी बदामीच्या(वातापी) चालुक्यांनी विष्णू देवतेस प्रमुख मानले. तरी काही सम्राटांनी शिवाची उपासना केली. त्यापैकी टाकळी ढोकेश्वर हे गुफा मंदिर बदामी चालुक्यांच्या उत्तर कालखंडात सातव्या शतकाच्या मध्यात घडलेले अप्रतिम लेणे.
टाकळी ढोकेश्वर हे महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुकातील गाव आहे. टाकळी ढोकेश्वर गावापासून पाच-सहा किलोमीटर दूर एका डोंगरावर स्थित आहे टाकळी ढोकेश्वर लेणं. त्यासमोरून वळणं घेत वाहत जाते काळु नदी.!
तर पायथ्यापासून डोंगरावर जाण्यासाठी साधारणपणे २०० पायऱ्या खड्या स्वरूपात चढाव्या लागतात. चढताना मध्यभागी उजवीकडे समाधीचा चौथारा असून त्यासमोर महादेव मंदिर आहे. खरे तर हे समाधी मंदिर असावे. कारण पूर्वी शिवभक्त व्यक्तीच्या समाधीवर पिंड आणि पादुका निर्माण केली जात असे. द्वारावर थोडेफार कोरीव काम आहे. काही ठिकाणी पुष्प कोरलेले आहेत.
शरभ शिल्प-
समाधी मंदिराच्या विरुद्ध दिशेला अर्थात चढून जाताना डाव्या बाजूस साधारणपणे दोन फूट बाय दीड फूट आकाराच्या चौकोनी दगडावर शरभ कोरलेला आहे. अर्थात हे शिल्प तेथे पडलेले आहे म्हणजे ते इतर कुठले किंवा मुख्यद्वारावरील शिल्प असावे. शरभ शिल्प प्रामुख्याने मध्ययुगीन काळात द्वारावर लावण्याची प्रथा असे. शरभ हा शिवाचा अंश अवतार जो पुराण कथेनुसार निर्माण झाला विष्णूचा नरसिंह अवतार संपवण्यासाठी. पुराण कथेनुसार हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर नरसिंहाचा क्रोध शांत झाला नाही. अशावेळी देवतांनी शिवाकडे धाव घेतली आणि शिवाच्या अंश रुद्रापासून शरभ निर्माण झाला. पंखरूपी सिंह अवतार शरभ नरसिंहाचा अवतार संपवितो.!
या कथेनुसार जर विचार केला तर शरभ अर्थात शक्तीवरील परमशक्ती.! मध्ययुगीन कालखंडात शरभ हे किल्ल्यावर किंवा वास्तूंवर शक्तीचे प्रतीक म्हणून कोरण्यात आले. त्याचप्रमाणे लेण्याकडे जाणाऱ्या महाद्वारावर सत्तेच्या कालखंडात सर्वोच्च अधिसत्ता दर्शविणारे हे शरभ शिल्प कोरले गेले असावे.
याशिवाय प्रस्तुत मंदिर लेणे हे शिवाचे आहे त्याचेही प्रतीक म्हणून शरभ असावे.
पूर्व चालुक्य बदामीचे ज्यांच्या गुफा मंदिरांमध्ये विशेष करून विष्णू अवतार आणि प्रतीके बघायला मिळतात. विशेष करून वराह ज्याने पृथ्वी वाचवली. त्यावरून राजांनी स्वतःला पृथ्वी वल्लभ म्हणून घेतले. पश्चात राष्ट्रकूट आणि पुढील राजवटीमध्ये शिवाचे मुख्य देवता म्हणून प्राप्त झालेले स्थान आपल्याला राष्ट्रकूट राजनिर्मित वेरूळचे कैलास लेणे व अनेक गुंफा मंदिरात शिव पिंडी व शिव अवतार प्रतिमांमधून लक्षात येते.
गुफा मंदिरे ही भक्तीची केंद्रे असली तरी राजाचे त्या देवतेशी असलेले विशेष नाते, अनुग्रह यातून दर्शवण्याचा प्रयत्न केला जात असे. पर्यायाने पंडित, पुजारी, यात्रेकरू यांना राजाश्रय मिळत असे. मंदिरे ही राजसत्तेच्या शक्तीची प्रतीके म्हणून पाहिली जात.
असो,
मुख्य द्वाराजवळ डाव्या भिंतीवर देवनागरी मध्ये अस्पष्ट शिलालेख जो अलीकडच्याच काळात जीर्णोद्धाराच्या संदर्भातील असावा. द्वारातून प्रवेश केल्यानंतर पूर्वभिमुख गुफेचे दर्शन घडते. अंगणात एक उंच दीपमाळ आहे. येथून खाली पाहिल्यास सुंदर काळू नदी वळण घेत धरणाकडे जाताना दिसते.
गंगा यमुना-
गुहा मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी उजव्या आणि डाव्या बाजूस सुंदर कोरीव काम केलेले दिसते.
दक्षिणेकडे म्हणजे डाव्या बाजूस यमुना जिच्या पायाशी कुर्म, तर आपल्या उजव्या बाजूस म्हणजे उत्तरेकडे गंगा स्त्री रूपात दर्शविण्यात आल्या आहेत. ही दोन्ही शिल्पे सुंदर असून साधारणपणे सहा ते सात फूट उंच आहेत.
कुर्मावर स्वार यमुना |
मगरीवर स्वार गंगा |
मध्ये प्रवेश केल्यानंतर समोर मध्यभागी नंदी आहे. सभा मंडपाप्रमाणे दिसणारा हा भाग आयाताकृती आहे. या संपूर्ण सभा मंडपाचा भार चार प्रमुख भव्य प्रचंड स्तंभावर असून पैकी दोन स्तंभ गर्भगृहासमोर आहेत व दोन स्तंभ प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात आहेत. चारही स्तंभ सुबक कोरीव कामाने नटलेले आहेत. स्तंभ भाग आयताकृती असून त्यावर मध्यभागी भक्तगण कोरलेले आहेत. भक्तगणांच्या शेजारी विरुद्ध मुख केलेले सिंह कोरलेले आहेत. स्तंभाच्या वरील भागात सुंदर घटपल्लव आहे. घट गोलाकार असून त्यावर रेषांनी युक्त नक्षी आहे, त्यामधून बाहेर पडणारे पर्ण शोभायमान आहेत.
समोर दिसणारे पूर्वाभिमुख गाभाऱ्यामध्ये शिवपिंडी आहे. या गाभाऱ्याला प्रदक्षिणामार्ग आहे.
सभा मंडपाच्या दोन्ही बाजूस सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. डाव्या बाजूस शिव, वीरभद्र आणि सप्तमातृका कोरलेल्या आहेत तर उजव्या बाजूस अष्टभुज तांडव शिव शिल्प तर शेजारी पार्वती परिचर कोरलेले आहेत.
सप्तमातृकां विषयी-
डाव्या बाजूस असलेल्या भिंतीवर शिव रुद्र, सप्तमातृका आणि गणेश शिल्प कोरलेली आहेत. या सर्व प्रतिमा स्वतंत्र पिठासनावर असून त्यांच्या खाली त्यांची वाहने कोरलेली आहेत. डावीकडून उजवीकडे पाहता-
वीरभद्र- बैलासह, ब्राह्मी-हंसासह, महेश्वरी- बैलासह, कौमरी- मोरसह, वैष्णवी- गरुडसह, वराही-वराहासह, इंद्राणी- हत्तीसह, चामुंडी- कोल्ह्यासह, गणेश- थाळीभर मोदकांसह आहेत.
सप्तमातृकांच्या वरील भागामध्ये सुपीकता आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून आम्रपर्ण शाखा फळांसह कोरलेल्या आहेत.
सप्तमातुकांच्या संदर्भात वनवासी चे कदंब हे त्यांना मुक्ततेच्या देवता म्हणून पाहात असत. पूर्व चालुक्यांपासून सप्तमातृकांची मांडणी गुफा मंदिरातही होऊ लागली.
सप्तमातृका पॅनल |
शिव तांडव शिल्प व पार्वती शिल्प-
उत्तर दिशेस अर्थात आपल्या उजव्या बाजूस दोन हे प्रमुख शिल्प आहेत. शिव तांडव शिल्प भव्य आणि सुंदर आहे. शिवाच्या आठ भुजांमध्ये विविध आयुधे साकारलेली आहेत. त्याच्या उजव्या हातात नाग आणि डमरू आहेत तर डाव्या हातात त्रिशूल असून इतर हात अभय मुद्रेत आहे. खाली गणेश आणि कार्तिकेय आहेत.
शिवाच्या उजव्या बाजूस पार्वती दोन परिचारकासह बसलेली आहे.
शिव तांडव शिल्प |
गर्भगृह प्रवेशद्वार-
गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस उंच शैव द्वारपाल खडे आहेत. डाव्या बाजूच्या द्वारपालाच्या शेजारी बैठक मारलेला निधी देवता आहे. तर दोघांच्या मध्ये छातीवर हात दुमडलेली आणि डोक्यावर त्रिशूळाची टोके असलेली एक आकृती काळभैरची प्रतिमा असू शकते जी स्थानिकांनी शनिदेव म्हणून बदलली आहे.
निधीच्या वरील भागात डमरूधारी गण चामर ढाळीत आहेत.
प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस असलेल्या द्वारपालाच्या शेजारी हातामध्ये मोठी पिशवी पकडलेली प्रतिमा आहे बहुदा हे सुद्धा खडे असलेले कुबेर देवता निधीचे शिल्प असावे.
प्रदक्षिणामार्ग-
प्रदक्षिणा मार्गाने जाताना सुरुवातीस अंधारात डाव्या बाजूस एका कक्षामध्ये गणेश, विष्णू, उमा-महेश्वर अशी अनेक मूर्ती शिल्प ठेवलेली आहेत. बहुदा याच परिसरातील ती असावी मात्र जिर्णोद्धार करताना येथे साठवून ठेवलेली दिसतात. पुढे गेल्यावर काही विरगळ दिसतात. त्यापैकी एकामध्ये काही स्वार झालेले योद्धे दिसतात, ज्यांना वीरमरणा नंतर कैलाशयामध्ये स्थान मिळाले हे दर्शविण्यासाठी शिवपिंड कोरण्यात आलेली आहे.
दुसऱ्या एका विरगळमध्ये मध्यभागी ढाल तलवार घेऊन लढणारा वीर आहे. त्याला सुद्धा मरणानंतर कैलासातत स्थान मिळाले त्याचे प्रतीक शिवपिंडी कोरण्यात आली आहे.
तिसऱ्या वीरगळ मध्ये केशरचनेवरून लढवय्या स्त्रीचे शिल्प दिसते.
असो,
प्रदक्षिणा मार्गाने फिरून येताना उत्तर बाजूस प्रचंड मोठा अखंड पाषाणात कोरलेला नंदी आहे. म्हणजे गाभाऱ्याच्या समोर पूर्व भागात असलेला नंदी हा मुख्य नंदी नसावा.
वीरगळ |
गर्भगृह-
गर्भगृहाच्या आत एका नैसर्गिक चौथर्यावर शिवलिंग कोरलेले आहे. त्या शेजारी कुठून तरी आणलेले हनुमानाचे शिल्प ठेवलेले आहे.
परिसर-
पूर्वभिमुख गुफेच्या अंगणात मध्ययुगीन काळातील दीपस्तंभ आहे. उत्तर दिशेस चालत गेल्यावर पाण्याची टाके कोरलेले आहे. या पाण्याच्या टाक्यात पाणी जमा होण्यासाठी भीस्ती कोरलेली आहे. पावसाळ्यात डोंगरावरचे पाणी या भिस्तीद्वारे टाक्यांमध्ये जमा होते.
याशिवाय खडकाच्या नऊ फूट उंचीवर एक कक्ष कोरलेला आहे. या कक्षाला जाण्यास पायऱ्या नाहीत. नैसर्गिक खाचांमध्ये पाय देऊन कक्षामध्ये जाता येते. कक्षामध्ये चढून गेल्यानंतर आत डाव्या बाजूस छोट्या मार्गाने उतरल्यास तळघर लागते. मी त्यामध्ये चढून प्रवेश केला. कक्षामध्ये अंधार असून वटवाघळांच्या विष्ठेचा वास होता. ध्यान साधनेसाठी किंवा व्यवस्थापकांसाठी या कोरीव कक्षाची निर्मिती झाली असावी.
असो,
राजवंशी राजे व सामंत या आश्रयदात्यांनी भक्ती आणि शक्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनादिकालापासून अस्तित्वात असलेल्या पर्वतांच्या खडकांमध्ये मठांची खोदाई करण्यासाठी पैसा पुरवला. शिल्पकारागिरांची अनेक पथके तेथे वर्षानुवर्षे राबली. अखेर राजवटी नष्ट झाल्या, राज्ये संपली पण कलाकारांची ही सत्ता आजही आमच्या मनावर अधिराज्य गाजवते.! जरी राज्ये आणि कला दोन्ही मानवनिर्मित.!
असा हा टाकळी ढोकेश्वराचा आविष्कार म्हणजे मंगलमय शिवाच्या सानिध्यात सुंदर कलेची आणि शाश्वत सत्तेची जाणीव अर्थात सत्यम-शिवम्-सुंदरम्
असं हे ढोकेश्वराचं लेणं अर्थात निरागस सौंदर्याचं देणं.! सतराशे वर्षानंतरही जिथे आजही कातळ रूपी निसर्गात मानवाच्या दिव्य कल्पना हस्तकलेतून प्रकटू लागतात आणि पारलौकिक आकृत्या जिवंत होऊन जातात..!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।
Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..
Popular Posts
कोंडाजी फर्जंद - बेखौफ छत्रपतीचा दिलफेक योद्धा...
- Get link
- X
- Other Apps
किल्ले बाळापूर-वर्हाडातील शंभूराजांची जहागीर
- Get link
- X
- Other Apps
एक सहज चिंतन- महाराज आणि शाहिस्तेखान
- Get link
- X
- Other Apps
अद्भूत साक्षात्कार- लोणार...
- Get link
- X
- Other Apps
हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा...३७१ वर्षांपूर्वी चा तो दिव्य संकल्प
- Get link
- X
- Other Apps
जानेफळ: इतिहास पुरुषांच्या भेटीचा दुर्लभ योग..!
- Get link
- X
- Other Apps
श्रीवर्धन- हरिहरेश्वर एक नयनरम्य भेट..
- Get link
- X
- Other Apps
अज्ञातवासातील बार्शी टाकळी येथील कालिंका देवी मंदिर-
- Get link
- X
- Other Apps
गणपतीचा वाडा:शतकापूर्वीचा गणेशोत्सव- मैराळडोह
- Get link
- X
- Other Apps
राजुरा: स्त्रीशक्तीचा शौर्य स्तंभ'
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
... मग कशी वाटली पोस्ट