Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

दिवाळीत मुलांनी बांधावे किल्ले...

 



दिवाळीत किल्ले बनवतात हे सर्वांना ठाऊक आहे पण त्याचा एखादा संदर्भ शिवकालात मिळतो का, तर होय. खुद्द शिवछत्रपती बालपणी युद्धावर जाणे, लढाईचा खेळ खेळणे आणि किल्ले बनवणे असे खेळ खेळत असल्याचा उल्लेख शिवभारतकार कवी परमानंद हे आपल्या ग्रंथाच्या सातव्या अध्यायात करतात.

ते म्हणतात-


स एष किल कुर्वाणः शिशुश्शार्दुळ शाब्दितम् । पार्श्ववर्ती स्नेहपात्रीमपिधात्रीमभीषयत् ॥२३॥

अभ्रांतोपिभ्रमरवद् भ्रमिं भ्रांतः कदाचन । हृष्टो हय इवहेषामहलेषत कदाचन ॥२४॥

उच्चैरुदचरेद्दन्ति बृंहितानि कदाचन ॥२५॥

पूरयद्भिर्धरांद्यां च गभीरमधुरस्वरैः । सोभिमानपरोभेरीमन्वकार्षीत् कदाचन ॥२६॥

मृतकूटान्यपि तुंगानि कारयन् स किशोरकैः । इमानि ममदुर्गाणीत्यवोचत कदाचन ॥२७॥


अर्थात- तो (बाल शिवबाराजे) जवळ उभा राहून एकदम वाघासारखी गर्जना करून आपल्या प्रेमळ दाईस सुद्धां भेवडावीत असे. तो भ्रमरहित असूनहि कधीं भ्रमराप्रमाणे गरगर फिरत असे; हर्षभरित होत्साता कधीं घोड्याप्रमाणें खिंकाळत असे. कधी हत्तीप्रमाणे मोठ्याने चीत्कार करी; आपल्या गंभीर आणि मधूर स्वराने आकाश आणि पृथ्वी दुमदुमवून सोडीत तो कधी ऐटीनें दुंदुभीसारखा

आवाज करी. कधी मुलांकडून मातीची उंच शिखरे च करवून 'हे माझे गड' असे म्हणे.


..असे हे शिवबा राजांचे खेळणे ज्यांनी पुढे हिंदवी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि आपल्या दैदिप्यमान पराक्रमाने आणि अजोड दुर्ग बांधणीच्या कौशल्याने सकल पृथ्वीस अचंबित करून सोडले.- शिवभारत

.. दिवाळीच्या सुमारास कोकणमध्ये फिरला असाल तर घरोघरी वा बागेत मुलांनी बनवलेले सुंदर मातीचे किल्ले बघायला मिळतात. अलीकडे आपल्याकडेही किल्ले बांधणीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. मुलांच्या क्रिएटिव्हिटीला भरपूर वाव आणि इतिहासाचा सहज अभ्यास याद्वारे होतो. शिवाय मातीशी नातं घडून येतं. याच बीजरूपी संकल्पनातूनच उद्याचे विश्व साकार होईल.! म्हणून घरच्या बालराजाला त्याचं राज्य घडवू द्या..!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts