Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

शनिवार तेली: बेने इस्रायली-

मित्रांनो खरे तर इजराइल विषयी आता सर्वांनाच सर्व काही माहित आहे. पण दररोज घडणाऱ्या घटना इतिहासाला साद घालतात म्हणून..

वि.ग. कानिटकर यांच्या “इजराइल युद्ध युद्ध आणि युद्धाच” या ग्रंथातून इजराइलच्या जन्माची आणि युद्धाची कथा समजू लागते.

हिब्रू बाइबल नुसार ईश्वराने अब्राहम आणि त्याच्या वंशजांना 'ईश्वर भूमि' देण्याचे वचन दिले होते. आणि मान्यतेनुसार तो भाग मिस्र नदी आणि यूफ्रेट्स नदीच्या मध्यभागी आहे.

ऑटोमन आक्रमणानंतर इजिप्तच्या मुलूखातून परागंदा झालेले यहुदी(ज्यू) जगभरात पसरले. दुसऱ्या महायुद्धाच्या माऱ्याने त्यांची बरीच स्थलांतरे झाली. जगाच्या पाठीवर भटक्या अवस्थेत फिरणारी ही जमात अरबी सागरातून पश्चिम किनाऱ्यावर येऊन स्थायिक झाली. बरीच वर्षे त्यांनी मुंबई, ठाणे आणि कोकण या इलाख्यात तर दक्षिणेतील बंदरी भागात सुखाने काढली. या इजरायली लोकांना ‘बेने इजरायली’ म्हणून ओळखले जाई. बेने अर्थात मुलं, म्हणजेच इजराइलचे पुत्र. कोकण किनारपट्टी लगत स्थायिक झालेली ही मंडळी तेलाचा व्यवसाय करू लागली. यहुदि लोकांचा शनिवारी धार्मिक ‘शाबाथ’ पाळण्याचा दिवस असतो. त्यादिवशी ही मंडळी कोणतीही काम न करता देवाची आराधना करत असतात. हळूहळू त्यांना ‘शनिवार तेली’ म्हणून ओळखले जाऊ लागले. दोन किंवा तीन पिढ्या महाराष्ट्रात एकरूप होऊन वावरणारी ही मंडळी अगदी पुणेरी मराठी बोलू लागली. सन 1948 मध्ये जेव्हा इजराइल देशाची निर्मिती झाली तेव्हा जगभरातील या यहुदिंना आपल्या मायदेशी परतण्याचे आवाहन करण्यात आले. इजराइल ला गेलेली ही मंडळी मात्र भारतीय संस्कार, पुरणपोळीचा त्योहार आणि मराठी भाषेचा अभिमान सोबत घेऊन गेली. इजराइल मध्ये त्यांनी मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी पुढील पिढीला मराठी भाषा शिकवणेही सुरू केले आणि आपल्या नव्या पिढीला महाराष्ट्रीयन संस्कृतीची ओळख करून दिली. आज अशा महाराष्ट्रीयन यहुदींच्या कित्येक मुलाखती आपल्याला बघायला आणि वाचायला मिळतात. यातील बऱ्याच लोकांची आडनावे सुद्धा मराठी आहेत हे विशेष. आपल्या आठवणी सांगताना ते आपण कधी महाराष्ट्रात होतो आणि आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांनी भरभरून प्रेम दिले ही गोष्ट ते मोठ्या अभिमानाने सांगतात. तसेच हा इतिहास पुढील पिढीला समजावा यासाठी प्रयत्न करतात.

दुसऱ्या बाजूने इजराइलला जन्मापासून कित्येक वर्ष भारताने न दिलेली मान्यता, इजराइल देशच्या विरोधाची भूमिका हा सुद्धा इतिहास आहे. पण आता इजरायली दुतावास भारतात आहे अर्थात इजराइल देशाला भारताने मान्यता देऊन बरीच वर्षे झाली त्याही पुढे इजराइलचे आणि भारताचे संबंध सुधारले आहेत. पण याचा अर्थ आज भारत पॅलेस्टाईन चा विरोध करत आहे असा होत नाही. वोट बँक साठी इजरायली येहुदींचा किंवा पॅलेस्टाईनी अरबांचा द्वेष आता भारत करत नाही. हीच भारतीय परराष्ट्र धोरणाची सर्वोच्च बुद्धिमत्ता आहे.! खरंतर ‘वसुधैव कुटुंबकम’...

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts