Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

सातशतक ग्रंथातून रामस्तुती..



सातशतक या दिव्य ग्रंथाची रचना करताना छत्रपती शंभुराजे म्हणतात..

सीता पग नष चंद की भजि कै संभ समाज ।

सातशतक ग्रंथहि रच्यो,संतन के हित काज ॥

अर्थात: सीतेच्या चरणाच्या नखचंद्रास आराधून शंभु राजांनी समाजाच्या व साधूसंताच्या हितासाठी सातशतक ग्रंथाची निर्मितीकेली आहे. शंभुराजे म्हणतात की माझे मन संताच्या हितासाठी भ्रमर झाले आहे.

मो मन मधुकर संत हित भऱ्यो ग्रंथ रसविंद ।

चित्रकूट के सिर्लान जे फूल पग अरविंद ॥

अर्थात छत्रपती शंभुराजे म्हणतात: 

यात चित्रकुटमधील प्रभु राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या पवित्र चरणाच्या प्रभावाने जे पारिश्रमिक फूल तेथील दगडावर फुलले तोच हा प्रेम रस होय.

सो रस पाइ छके महा सनकादिक सुक सेस ।

संभराज षगराज ,मुनि ,गिरजा ,गिरा गणेश ॥

अर्थात छत्रपती शंभुराजे म्हणतात: तो रस प्राशन करून शुक्राचार्य, शेषदेव, सनकादिक मुनि तसेच खगराज गरूड, गिरीवरकन्या पार्वतीदेवी, सरस्वती, गणेश तसेच शंभुराजे संतुष्ट झाले.

उपालंभ कहि विनैकहि, जगत सीष कहि ध्यान ।

बह्म निरूपम कुछ कहरो,जाते बाढत ग्यान ॥

अर्थात छत्रपती शंभुराजे म्हणतात:  उपहासात्मक बोलण्यापेक्षा जगाच्या शिकवणुकीकडे माझे लक्ष आहे. काही ब्रह्मनिरूपणात्मक सांगण्याची माझी इच्छा आहे, त्यामुळे ज्ञानवृध्दिही वाढते.

- छत्रपती शंभुराजे कृत सातसतक

छत्रपती शंभूराजांच्या अंतकरणातील दिव्य भाव या शब्द रूपाने प्रकट होतात. यातून एका वीर योद्धाच्या अध्यात्मिक मनाची थोरवी प्रकटते.

।।फक्तइतिहास।।

Comments

Post a Comment

... मग कशी वाटली पोस्ट

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts