Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

अथजलस्य-जल ||


जल म्हणजे जीवन जल म्हणजे प्राण. सर्वांचे प्राणी कंठाशी आनणार्या वरूणराजाची वाट सगळेच पाहतात, व अखेर तो जलधारा म्हणून बरसू लागतो. सर्वांना तॄप्त करतो. या जलराजा बद्दल शंभूराजे बुधभूषणम् मध्ये म्हणतात-

शैत्यं नामगुणस्तवैव तदनुस्वाभाबिकीस्वच्छता
किं ब्रूम शुचितां व्रजन्प्यशुचय: सडेनंयस्यापरे!
किं वात: परमास्नुषे,स्तुतिपरं संजीवनंजींवता
त्वं चेन्नीचपथेनगच्छ्सि, पय: कस्त्वां विरोद्भुं क्षम: ॥

अर्थात,
शीतलपणाच्या गुणावरूनच तुला शैल्य हे नाव मिळालेआहे. त्यानुसारच तुझे शरीरही स्वाभाविकपणे स्वच्छआहे. फार काय तर अपवित्र असे सर्वच तुझ्या संगतीमुळे पवित्र मानल्या जातात. एवढेच काय तर वाराही अत्यंत संतुष्ट होऊन अनेक जीवनांना संजीवनी देणारा असे तुला मानतो. इतके असूनही तू गर्व न धरीता खालच्या पातळीवर वाहतोस. तेव्हा हे जला तुला कोण अडवू शकणार.? तू धन्य आहेस.
- छत्रपती शंभूराजे, बुधभूषणम् ,श्लोक १६८॥
||फक्तइतिहास||

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts