Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

महाराजांनी औरंगजेबास सांगितलेले एक अनमोल तत्वज्ञान...



मित्रहो, लंडनच्या राॅयल एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथात एक फारसी हस्तलिखित आहे. या ग्रंथाचे नाव " खुतूते शिवाजी " म्हणजे शिवाजीची पत्रे असे आहे. या हस्तलिखिताची आणखी एक प्रत कलकत्ता येथील एशियाटिक सोसायटीत आहे.  सर जदुनाथ सरकार यांनी त्याची प्रत तयार करून आपल्या संग्रही ठेवली. तीची फोटो प्रत मुंबई च्या सरकारी दफ्तरखान्यात बघावयास मिळते. त्यात अशी बत्तीसपत्रे आहेत.

मोदींनी विश्व सुफी संम्मेलनात जो जगाला उपदेश दिला तो छत्रपतींनी ३४७ वर्षांपूर्वी दिला होता.
सन १६७९ मध्ये औरंगजेब बादशहाने हिंदु प्रजेवर जिझिया कर लादला होता. त्याच्या निषेधार्थ शिवाजीमहाराजांनी औरंगजेबास एक पत्र लिहले ते मोठे महान तत्वज्ञानाचे आहे. महाराज म्हणतात-

.....एक हितचिंतक म्हणून मी आपणांस सांगत आहे.
नुकतेच माझ्या कानावर अाले आहे की, माझ्यावरील मोहिमांमुळे आपला खजीना रिता होत चालला आहे. तो भरून काढण्यासाठी आपण हिंदूंवर जिझिया कर लादला आहे.
बादशहा सलामत, आपल्या साम्राज्याचा संस्थापक अकबर, जहांगीर व शहाजहान यांनी सर्व जमातीशी शांततेने व समभावाने वागन्याचे उत्कृष्ठ धोरण स्विकारले म्हणूनच त्यांची भरभराट झाली.
बादशहा सलामत, कुराणात परमेश्वरास रब्बुल आलमिन (विश्वनाथ) म्हणटले आहे.रब्बुल मुसलमिन(मुसलमानांचा नाथ) नव्हे.
हिंदू आणि मुसलमान म्हणजे त्या दैवी संपदेचे दोन अविष्कारच..परमेश्वराने निर्माण केलेल्या या चित्रावर रेघोट्या ओढू पाहणे म्हणजे त्या चित्रकारावर(परमेश्वरावर) दोषारोपन करणे होय...
धार्मीक द्वेश बाळगणारा आणि कट्टरपणा दाखविणारा प्रत्येकजण हा परमेश्वराच्या आदेशाची अवज्ञा करणारा होय.

असे हे पत्र बादशहाच्या दांभिकपणावर परखड मत व्यक्त करणारे व कानउघडणी करणारे असून मोठे गंभिर तत्वज्ञान व निर्भेळ सत्य यात दडलेले आहे.
संदर्भ- खुतूते शिवाजी/सेतूमाधव पगडी खं.३

||फक्तइतिहास||

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts